मुंबई व ठाण्यामधील पहिली ते नववीच्या शाळा बंद | Schools I to IX closed in Mumbai
तसेच इयत्ता 10 वी आणि 12 वी चे वर्ग चालू राहतील. इयत्ता अकरावी देखील बंद राहणार आहे.काही
दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या
पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांची गैरसोय होऊ नये यासाठी
खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुंबई महापालिकेने (एमएमसी)
म्हटले आहे. पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका
आयुक्त इक्बाल चहल यांनी शाळांबाबत निर्णय घेतला आहे. ऑफलाइन शाळा बंद करूनही
ऑनलाइन शाळा सुरू राहणार आहेत.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण
विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. बैठकीत
कोरोनाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुंबई आणि आजूबाजूचा परिसर
वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळेच राज्यातील
शाळा बंद न करता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड
यांनी दिल्या आहेत.
स्थानिक पातळीवर संक्रमणाची परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आधीच देण्यात आले आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url