इ.10 वीच्या विद्यार्थ्यासाठी “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन tips for successful exam preparation,10 quick tips for successful exam preparation
इ.10 वीच्या विद्यार्थ्यासाठी “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
online guidance session on "Successful Exam Preparation" for 10th
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि.२३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे.
सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi 10 या संकेतस्थळावर विषय व माध्यमनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आलेल्या आहेत.
दिनांक / वेळ | विषय | LIVE लिंक |
---|---|---|
बुधवार, २३/०२/२०२२ दुपारी ३ ते ४:३० | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ | https://youtu.be/lwXeYdSY_LM |
गुरुवार, २४/०२/२०२२ दुपारी ३ ते ४:३० | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ | https://youtu.be/Rjd5N7PFilQ |
शुक्रवार, २५/०२/२०२२ दुपारी ३ ते ४:३० | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ | https://youtu.be/2DpF3qVxttM |
सोमवार, २८/०२/२०२२ दुपारी ३ ते ४:३० | विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ | https://youtu.be/NvFMY0Ezemo |
मंगळवार, ०१/०३/२०२२ दुपारी ३ ते ४:३० | परीक्षेची यशस्वी तयारी | https://youtu.be/0YtknXBrCKo |
सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राची माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, शिक्षक, पालक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS