उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल- २०२२ साठी केंद्र संचालक,परीक्षक,लेखी परीक्षा,विभागीय
दहावी व बारावी परीक्षा मार्च-एप्रिल- २०२२ साठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध
Guide for 10th and 12th exams March-April-2022 published
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ यांच्या कडून कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल- २०२२ साठी केंद्र संचालक,परीक्षक,लेखी परीक्षा,विभागीय मंडळ स्तर मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे.
- · मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची लेखी परीक्षा दि. ०४/०३/२०२२ ते दि.३०/०३/२०२२ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) ची लेखी परीक्षा दि.१५/०३/२०२२ ते दि.०४/०४/२०२२ या कालावधीत प्रचलित पध्दतीने (ऑफलाईन) आयोजित करण्यात येत आहेत.
- · शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशीराने सुरू झालेल्या आहेत. तद्नंतर काही ठिकाणी त्या वेळोवेळी बंद ठेवाव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखानाचा सराव पुरेसा होऊ न शकल्यामूळे लेखी परीक्षेतील पेपरचा वेळ या परीक्षेला ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे व ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढविण्यात आला असून त्यानुसार अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
- · या जादा वेळेव्यतिरिक्त पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जादा वेळेसह इतर सर्व सुविधा व सवलती कायम राहतील.
- · सदर लेखी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना २५ टक्के कपात केलेला अभ्यासक्रम वगळून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा दयावी लागणार आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS