महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक, श्रेणी, त
अंतर्गत मूल्यमापन 2021-22 साठी विशेष
मार्गदर्शक सूचना
Instructions for Internal Evaluation 2021-22
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना
१. अ) कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर इ. १० वी ची
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित पध्द्तीप्रमाणे तसेच
यासंदर्भात मंडळामार्फत देण्यात आलेल्या विशेष सूचना विचारात घेवून आयोजित करण्यात
येतील. सदर परीक्षा दिनांक २५/०२/२०२२ ते दिनांक १४/०३/२०२२ या कालावधीत आयोजित
करण्यात येतील. प्रयोगवही (जर्नल) उपरोक्त कालावधीत सादर करावे.
महत्वाचे- मंडळाने उपरोक्तप्रमाणे निर्धारित केलेल्या
कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य
कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी
परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन इ. परीक्षा देऊ न शकल्यास अशा
विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि.०५/०४/२०२२ ते दिनांक २२/०४/२०२२
या कालावधीत आयोजित करण्यात यावी. Out of Turn चा कालावधी
उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल. त्यामुळे Out of Turn साठी
स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.
ब) इ. १० वी ची प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी,अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा घेण्याची
जबाबदारी संबंधित माध्यमिक शाळांना देण्यात येत आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक,
श्रेणी, तोंडी, अंतर्गत
मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखडयानुसार तसेच कोविड-१९
विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात घेऊन निर्धारित कालावधीत पार पाडावी.
२. कोविड-१९ विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता बहुतांश
माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू ठेवण्यास कमी कालावधी
मिळाल्याने निर्धारित प्रात्यक्षिके पूर्ण करणे शक्य झाले नाही. सदर बाब विचारात
घेऊन माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेतंर्गत अंतर्गत मूल्यमापन
असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षेबाबत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.
- अ) कोविड-१९ विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेऊन विज्ञान व
तंत्रज्ञान तसेच अन्य प्रात्यक्षिक असलेल्या विषयांसाठी यावर्षासाठी निर्धारित
केलेल्या / किमान ४०% प्रात्यक्षिकांचा सराव घेण्यात यावा. तसेच मंडळाने दिलेल्या
सूचना विचारात घेवून प्रात्यक्षिक | गृहपाठ, प्रात्यक्षिक वही व प्रकल्प यासाठी गुणदान करावे.
- ब) या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परिक्षक संबंधित माध्यमिक शाळेतूनच घेण्यात यावेत. ज्या शाळेत एका विषयासाठी एकापेक्षा अधिक विषय शिक्षक उपलब्ध नाहीत तेथे त्याच उपलब्ध विषय शिक्षकाने अंतर्गत व बहिस्थ परिक्षकाचे काम करावे.
३. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण आणि शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र
व गृहशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा हया प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा/
प्रात्यक्षिकांवर आधारित बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणीद्वारे मूल्यमापन या स्वरूपात
घेण्यात येतील.
४. माध्यमिक शाळेतील सर्व संबंधीतांनी कोविड-१९ विषाणू
प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन
करणे बंधनकारक असेल.
५. उपरोक्त कालावधीत माध्यमिक शाळांमध्ये पिण्याच्या
पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय, अधिक
सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्वतःची पाण्याची बाटली व
सॅनिटायझर सोबत ठेवावे. तसेच मास्क व लेखन साहित्य (उदा-पेन, पेन्सिल, कंपास इ.) सुध्दा स्वतःसोबत आणावे.
६. कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावासंदर्भातील सूचनांचे पालन
करण्याच्या दृष्टिने उपलब्ध जागेचा विचार करून कमी विद्यार्थी संख्येच्या बॅचेस
तयार कराव्यात.
७. विद्यार्थ्यांना व अन्य घटकांना शाळेत प्रवेश देताना
त्यांचे तापमान मोजण्यात यावे तसेच शाळेतील संपूर्ण कालावधीत विद्यार्थी व सर्व
संबंधितांनी मास्क वापरणे अनिवार्य राहील.
८. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक
अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करावे.
९. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी परीक्षा दालनात
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS