२० फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली | Scholarship examination to be held on 20th February postponed
२० फेब्रुवारी रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
Scholarship
exam to be held on 20th February postponed
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा
परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह
ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ०१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.
परंतु शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र
भरणेकरीता दिनांक १५ जानेवारी, २०२२ ते ३१ जानेवारी, २०२२ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली होती.
अर्ज भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने दि. २०/०२/२०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व विद्यार्थी, शिक्षक,पालक नोंद घ्यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url