सन 2024-25 मध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित
सन २०२४- २५ या शैक्षणिक सत्रात आरटीई टक्के शाळा
प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत
दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला
आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक
बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्ष
नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी
वयोमर्यादा दिनांक डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे
प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय | दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय |
---|---|---|---|
प्ले ग्रुप / नर्सरी | १ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०२१ | ३ वर्ष | ४ वर्ष ५ महिने ३० दिवस |
ज्युनियर केजी | १ जुलै २०१९ - ३१ डिसेंबर २०२० | 4 वर्ष | ५ वर्ष ५ महिने ३० दिवस |
सिनियर केजी | १ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०१९ | 5 वर्ष | ६ वर्ष ५ महिने ३० दिवस |
इयत्ता १ ली | १ जुलै २०१७ - ३१ डिसेंबर २०१८ | 6 वर्ष | ७ वर्ष ५ महिने ३० दिवस |
- पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता
आहे,
किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे
सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे.शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त
वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही.
- शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही. आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केलेली आहे.
परिपत्रक डाऊनलोड (२२ फेब्रुवारी २०२४)
परिपत्रक डाऊनलोड
परिपत्रक डाऊनलोड (3 मार्च २०२२)
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url