Use 10 simple tips to get good marks in English subject इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला छोट्या टिप्स सांगण
इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवण्यासाठी वापरा 10 सोप्या टिप्स
Use 10 simple tips to get good marks in English subject
भीती दूर करण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी
आज आम्ही तुम्हाला छोट्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा आधार घेऊन तुम्ही
इंग्रजी विषयात चांगले मार्क मिळवू शकता.
- 1.उतारा आणि कविता वाचून जे प्रश्न सोडवायचे असतात यामध्ये तुमचं वाचन कौशल्य विकसित करणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त उतारे डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. या प्रश्नांना सर्वात जास्त वेळ जातो त्यामुळे प्रत्येक उतारा किंवा कवितेचे प्रश्न किती मिनिटांत सोडवायचे ते ठरवून घ्या. ती वेळ झाली की पुढच्या प्रश्नाकडे जा.
- 2. प्रश्न पत्रिकेचं स्वरूप आणि एकूण प्रश्नासाठी असलेले गुण लक्षात घेऊन त्यानुसार प्रश्नाचं उत्तर लिहिताना वेटेज द्यावं.
- 3. व्याकरणाचा विषय मार्क मिळवून देणारा असतो. त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा.
- 4. धड्याचं नाव, लेखकाचं नाव आणि त्यातील पात्र लक्षात ठेवा.
- 5.आपल्या स्वतःच्या शब्दात सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. व्याकरणाची काळजी घ्या आणि शब्दलेखन तपासा
- 6.मॉक टेस्ट किंवा मागील वर्षाचे पेपर शक्य तितके सोडवा.
- 7. कवितेच्या आणि उतारातल्या ओळी उत्तर म्हणून जशाच्या तशा लिहू नका त्याचा परिणाम गुणांवर होतो.
- 8. येत नसेल तर प्रश्न तात्पुरता सोडून पुढे जा. पुढचे प्रश्न सोडवा. शेवटच्या 30 मिनिटांत संपूर्ण पेपर तपासून पाहा. जो भाग राहिला आहे तो लिहा. अवघड न येणारे प्रश्न सोडवण्यात जास्त वेळ गेला तर उत्तरपत्रिका अर्धवट राहाते.
- 9. उत्तर पत्रिका स्वच्छ ठेवा. खाडाखोड अथवा ओव्हरराईट सारख्या चुका टाळा. सुटसुटीत शुद्ध आणि चांगलं लिहिण्यावर भर द्या.
- 10. आत्मविश्वास ठेवा. योग्य विश्रांती घ्या. आणि सोप्या शब्दात पण आपल्या भाषेत उत्तर पत्रिकेत लिहा.
इंग्रजी कृतिपत्रिका कशी सोडवावी? | How
to solve English worksheets?
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS