⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बालकांचे पहिले द्विवर्षिक नियतकालिक ‘Children’s Lives’ साठी लेख किंवा चित्रे पाठविणे

Children's Lives, the first biennial magazine

बालकांचे पहिले द्विवर्षिक नियतकालिक  ‘Children’s Lives’ साठी लेख किंवा चित्रे पाठविणे

Submitting articles or pictures for Children's Lives, the first biennial magazine

बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचेमार्फत बालकांचे पहिले द्विवार्षिक नियतकालिक  ‘Children’s Lives’ ची दुसरी आवृत्ती जुलै, २०२२ ला प्रकाशित होणार आहे.  त्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी कोविड-१९ महामारीचे दुसरे वर्ष आणि त्यामुळे भारतीय उपखंडात बालकांचे शिक्षण व बालपण यावर आलेला व्यत्ययसंबंधी लेख आणि / किंवा चित्रे पाठविण्याबाबत सूचित केले आहे. 

विद्यार्थ्यांना खालील  विषयावर लेख आणि/ किंवा चित्रे पाठविता येतील.

१) कोविड-१९ कालावधीतील अनुभव : आव्हाने आणि धोके.

२) कोविड-१९ कालावधीतील ऑनलाईन शिक्षणाचे अनुभव.

३) कोविड-१९ कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुलभ अध्ययनासाठी प्रभावी सूचना आणि उपाय

४) कोविड-१९ संदर्भात इतर सूचना व अभिप्राय

लेखन स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचना  :

  1. ·        विद्यार्थ्यांचे लेखन कविता, कथा, लेख, निबंध इ. स्वरुपात असावे.
  2. ·        शब्द मर्यादा : ४०० ते ५०० शब्द.
  3. ·        फक्त Word Document अपलोड करता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपले आई/वडील, पालक, शिक्षक यांचे सहकार्य घेता येईल.
  4. ·        लेखन विद्यार्थ्यांचे स्वत: लिहिलेले असावे. अन्यत्र कोठूनही कॉपी केलेले असू नये तसेच ते यापूर्वी कोठेही प्रकाशित झालेले असू नये.
  5. ·        विद्यार्थ्यांचे लेखन हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असावे. सर्वोत्तम 6 लेख विद्यार्थ्यांच्या मासिकाच्या पुढील आवृत्तीत प्रकाशित करण्यात येईल. लेखन हिंदी भाषेत असेल तर त्याचा अनुवाद इंग्रजीत करण्यात येईल.
  6. ·        विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, वय, संपर्क क्रमांक आणि शाळा/ महाविद्यालय (शैक्षणिक संस्था) यांचा लेखावर व मेलमध्ये उल्लेख असावा.

चित्रकला स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचना :

  • 1.       विद्यार्थी रेखांकन कागद, चित्रकलेचा कागद किंवा कोणत्याही प्रकारचा A4/ A3 आकाराचा कागद वापरू शकतील.
  • 2.     चित्रासाठी शाई, वॉटर कलर, ऑईल कलर किंवा कोणतेही रंग प्रकाराचा वापर करता येईल. विद्यार्थ्यांनी .JPEG या format मध्ये आपले चित्र अपलोड करू शकतात.
  • 3.     विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, वय, संपर्क क्रमांक आणि शाळा/ महाविद्यालय (शैक्षणिक संस्था) यांचा लेखावर व पाठविण्यात येणार्‍या मेलमध्ये उल्लेख असावा.  चित्राला विद्यार्थ्याने स्वत:चे नाव दिलेले असावे. उदा. Mahesh.jpeg

 

सदर नियतकालिकासाठी १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येईल. विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करण्यात येईल.

  • ·        गट  १) १० वर्षाखालील विद्यार्थी 
  • ·        गट २) ११ ते १८ वर्षाचे विद्यार्थी

विद्यार्थ्यांना त्यांचे लेख/ चित्र childrenfirst.jocl@gmail.com या मेल आय.डी. वर दि. ३१ मार्च, २०२२ पर्यंत पाठविता येतील. विद्यार्थ्याने पाठविलेले लेख, चित्र यांचा विद्यार्थ्यांचे नाव, वय, संस्था यासह कोठेही, कोणत्याही स्वरुपात प्रकाशित करण्याचा अधिकार बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांना असेल याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात यावे.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम