जागतिक महिला दिनानिमित्त जबरदस्त मराठी भाषण | Marathi speech on the International Women's Day
जागतिक महिला दिनानिमित्त जबरदस्त मराठी भाषण
Marathi speech on the occasion of International Women's Day
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित व
त्यांच्या अस्तित्वासाठी आजही लढणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींनो
प्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....
दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात
साजरा करण्याचे येतो. ८ मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वास्रोद्योगातील
काम करणार्या महिलांनी सामुहिकपणे मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.त्यांनी कामाचे
तास कमी करणे,सुरक्षितता इत्यादी मागण्या केल्या. जगाच्या इतिहासात अशाप्रकारे
स्रियांनी संघटीत होऊन केलेला हा पहिलाच मोठा संघर्ष मनाला जातो.
पुढे 1910 मध्ये विविध देशातील महिला
प्रतिनिधी सहजगत्या यांनी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात
यावा असा ठराव पास झाला, तेव्हापासून 8 मार्च हा दिवस
स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
स्त्री ही क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता आहे.तिला आई,बहीण,मुलगी,पत्नी,मैत्रीण,मावशी,आजी इत्यादी अनेक नाती हळुवारी जोपासावी लागतात.स्त्री ही सृष्टीचे जीवन चक्र अविरतपणे चालू ठेवण्याचे कार्य करते आहे. प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा स्त्री असते. स्त्री शिवाय कुटुंब नाही व कुटुंबाशिवाय समाज नाही.सासर व माहेरच्या दोन्ही घरांना नकळतपणे जोडते.स्त्री आपले मुल संस्कारशील ,अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते.मुल पोटात वाढवण्यापासूनते सुसंस्कृत व्यक्ती घडवण्या पर्यंत जबाबदारी स्त्री विनातक्रार पार पडते त्यामुळे साने गुरुजी व छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक महान पुरुष घडले.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे ढाल बनते.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या सारखे थोर पुरुष महान कार्य करू शकले.
स्त्री फक्त कुटुंबासाठी झटत नाही तर झाशीच्या राणी
लक्ष्मीबाई ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यासारख्या अनेक स्त्रीया मायभूमीच्या
रक्षणासाठी रणरागिणी झाल्या सावित्रीबाई फुले लग्नानंतर शिकून भारताच्या पहिल्या
महिला शिक्षिका बनल्या.त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अतुलनीय योगदान दिले.
International Women’s Day Competition 2022
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे गावच्या
सरपंचपदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ति आघाडीवर आहे.भारताच्या प्रथम
महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,अंतराळवीरांना
कल्पना चावला, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ,समाजसेविका रमाबाई रानडे ,पहिल्या
महिला पोलीस अधिकारी किरण बेदी ,समाजसेविका मदर तेरेसा,गायिका लता
मंगेशकर,अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पायलट सरला ठाकराल तसेच महिला
खेळाडू पी टी उषा,सायना नेहवाल, स्मृती मानधना इ.अनेक स्त्रीयांनी आपल्या
क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले आहे.
आज स्त्रीचा गौरव केला जातो पण तरीदेखील महिलांच्या समोर
अनेक समस्या आ वासून आहेत. स्त्री भ्रूणहत्या,लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा,जुन्या
चालीरीती इ.समस्या पदोपदी महिलांना भेडसावतात.त्या समस्या जर दूर केल्या तर नक्कीच
स्त्रीयांचे कार्यक्षेत्र विस्तारेल.
महिलानो,आजच्या आधुनिक युगात तुम्ही स्वतःपासून बदल करा.कारण पुढची पिढी कशी घडवायची हे तुमच्याच हातात आहे.तुम्ही अखंड प्रेमाचे व प्रेरणेचा स्रोत आहात.स्वतः खंभीर रहा.जीवनात येणाऱ्या संकटाचा जिद्दीने सामना करा.कधीही वाईट गोष्टींचा संग धरू नका;कारण जगण्यासाठी नव्हे तर या पृथ्वीतलावर जन्म घेण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो.स्त्री शक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती,माणूस,म्हणून बनून दाखवा.आपले वाचन ,लेखन,इ.छद जोपासून नेहमी आनंदी रहा.कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटावा.आत्मनिर्भर बना.ईश्वराने दिलेला सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातल बळ कमी होवू देवू नका.थोर स्त्रीयांची विचार, चरित्र सदैव स्मरणात ठेवा.
नारी तू घे अशी
उंच भरारी
फिरून पाहू नकोस
माघारी
धन्यवाद.....
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास
TAG-जागतिक महिला दिनानिमित्त भाषण,जागतिक
महिला दिनाचे भाषण,जागतिक महिला दिनानिमित्त मराठी भाषण,जागतिक महिला दिनाचे भाषण,जागतिक महिला दिन भाषण,जागतिक महिला दिन भाषण मराठी,जागतिक महिला दिनावर
भाषण,जागतिक महिला दिनानिमित्त मराठी भाषण
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
खूप मस्त भाषण आहे ....मी माझ्या कॉलेज मध्ये महिला दिननानिमित्त हेच भाषण घेणार आहे...😁🤞
धन्यवाद...🙏