राज्य मंडळाच्या इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.
इयता 10 वी व इयत्ता 12 वीच्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना
Measures to prevent malpractice during 10th and 12th exams
राज्य मंडळाच्या इयता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षेवेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी खालील प्रमाणे
उपाययोजना करण्यात येत आहेत.
१) विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास
अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.
२) विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी 10
मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या
सत्रामध्ये सकाळी 10.20 पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये
दुपारी 02.50 पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक
राहील.
३) विद्यार्थी अपरीहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर
परीक्षा सुरू होतेवेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10.30 वा. व दुपारच्या सत्रामध्ये दुपारी03.00 वा. पर्यंत
आल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांची तपासणी करुन
विद्यार्थ्यांस विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात
येईल.
४) परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये
सकाळी 10.30 नंतर व दुपार सत्रामध्ये दुपारी 03.00 नंतर
कोणत्याही परीस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार
नाही.
५) परीक्षा दरम्यान व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्नपत्रिकेचा काही
भाग प्रसारित झाल्याचे निदर्शनास आल्याने, प्रश्नपत्रिका फोटो काढून
वा अन्य मार्गाने प्रसारित होऊ नये यासाठी विद्यार्थी, शिक्षक,
पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांना मोबाईल बाळगण्यास व वापरण्यास
प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
६) याबाबत राज्यमंडळ पुणे यांनी दि. १५ मार्च, २०२२
रोजी सूचना निर्गमित केल्या आहेत.
७) या संदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि
जिल्हाधिकारी यांना जास्तीत जास्त दक्षता पथके कार्यान्वीत करुन परीक्षा केंद्र | उपकेंद्राना
वारंवार भेटी देऊन परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी
यथोचित कार्यवाही करण्या संदर्भात निर्देश दिले आहेत.
८) परीक्षाकेंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नये
याची खबरदारी घेणेकरीता राज्यातील सर्वच परीक्षाकेंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये
अधिकचा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची विनंती मा.गृहमंत्री. महाराष्ट्र राज्य यांना
केली आहे. यानुसार गृह विभागामार्फत राज्याचे पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त, मुंबई
यांना याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
दिनांक १५ मार्च, २०२२ रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकाराबाबत दैनिक महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ऑनलाईन वृत्त प्रकाशित केले आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता, जयभद्रा बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गिरनेर तांडा संचलित, लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निलजगांव, ता. पैठण जि. औरंगाबाद येथे दि. १५ मार्च, २०२२ रोजी इ. १० वीच्या मराठी विषयाच्या पेपरच्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवित असल्याचे निदर्शनास आले असून, सदर प्रकरणी शाळेचा मंडळ संकेतांक व मंडळ मान्यता रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS