आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व शिक्षक यांची नोंदणी
Registration of schools and trainee headmasters and teachers for school health program training under Ayushman Bharat Yojana
प्रशिक्षण
दिवस चौथा (दि २६ मार्च २०२२)
दिवस तिसरा (दि २५ मार्च २०२२)
दिवस दुसरा(दि २४ मार्च २०२२)
दिवस पहिला (दि २3 मार्च २०२२)
School Health & Wellness Programme ;- भारत सरकारने
आयुष्मान भारत योजनेंतर्गत संपूर्ण देशात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण
मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय यांचेमार्फत शालेय आरोग्य कार्यक्रम
(School Health & Wellness Programme) सुरु केला आहे.
तदनुषंगाने राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या
समन्वयाने आपल्या राज्यातील ठाणे, जालना, पालघर, नाशिक, यवतमाळ, हिंगोली, अहमदनगर या सात जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते
१२ वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासकीय अनुदानित
शाळांमध्ये सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- या अंतर्गत उपरोक्त जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी
पर्यंतच्या शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासकीय अनुदानित प्रकारच्या
प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, एक पुरुष शिक्षक व एक महिला शिक्षिका
असे एकूण तीन व्यक्तींना आरोग्यवर्धिनी दूत (School Health and Wellness
Ambassador) म्हणून online प्रशिक्षण देण्यात
येणार आहे.
- जिल्हातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व
प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी माध्यमिक/प्राथमिक यांनी समन्वयाने आपल्या
जिल्ह्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
शाळा व शासकीय अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक, एक पुरुष
शिक्षक व एक महिला शिक्षक (ज्या शाळेत महिला शिक्षक नाही त्या शाळेतील दोन पुरुष
शिक्षक) यांची १००% नोंदणी दि. १८/०३/२०२२ ते २२/०३/२०२२ या कालावधीत करणे
अनिवार्य आहे.
- नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण दि.२३/०३/२०२२ ते २६/०३/२०२२ या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सदर प्रशिक्षणासाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य/घटकसंच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- प्रशिक्षणाचे वेळापत्रक यथावकाश पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाईल.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत शालेय आरोग्य कार्यक्रम (School Health
Programme) प्रशिक्षणासाठी शाळा व प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक व
शिक्षक यांनी खालील लिंकवर नोंदणी करावी.
नोंदणीसाठी लिंक: https://shp.scertmaha.ac.in
TAG-school health programme,school health programme ppt,school health programme pdf,school health programme wikipedia,school health programme definition,school health programme launched in india,school health programme objectives,school health programme in nepal,school health programme in nigeria pdf,school health programme in Maharashtra,शालेय आरोग्य कार्यक्रम
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS