शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ व शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये नव्याने प्रकाशित होणारे व अंतिम वर्ष असणारी पाठ्यपुस्तकांची माहिती Textbooks to be newly
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ व शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये नव्याने प्रकाशित होणारे व अंतिम वर्ष असणारी पाठ्यपुस्तकांची माहिती
Textbooks to be newly published and final year in academic year 2022-2023 and academic year 2023-2024
१) शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ (जून २०२२) पासून इयत्ता १
लीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके मराठी माध्यमाच्या
विदयार्थ्यांसाठी मराठी सृजनबालभारती भाग १ ते भाग ४ पुनर्मुद्रण करून तसेच उर्दू
माध्यमाच्या विदयार्थ्यांसाठी उर्दू सृजनबालभारती भाग १ ते भाग ४ मुद्रण करून
उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
२) शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ (जून २०२२) पासून सोबत
जोडलेल्या परिशिष्ट 'अ' नुसार पाठ्यपुस्तके
नव्याने प्रकाशित करून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
३) इयत्ता ७ वी ते इयत्ता १२ वीच्या विदयार्थ्यांकरीता
कार्यपुस्तिका (प्रात्यक्षिक नोंदवही) सोबत जोडलेल्या परिशिष्ट 'ब'
नुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
४) इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वीच्या विदयार्थ्यांकरीता सोबत
जोडलेल्या परिशिष्ट 'क' नुसार स्वाध्याय
पुस्तिका नव्याने प्रकाशित करून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
५) शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) पासून इयत्ता २
रीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विदयार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक
पाठ्यपुस्तके सृजनबालभारती भाग १ ते भाग ४ पुनर्मुद्रण करून विदयार्थ्यांना उपलब्ध
करून देण्याचे प्रस्तावित आहे.
वरील प्रमाणे प्रकाशित होणा-या पाठ्यपुस्तकांबाबतची नोंद
राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर
सर्व संबंधितांनी घ्यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS