जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम घेणे.
जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम
Jagatik Mahaila Divas (Women's Day Week) Program at school level
IWD2022जागतिक महिला दिन : ८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या
सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा
केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची
कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली.
समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न
करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात 'जागतिक महिला दिन'
साजरा केला जातो. यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व
स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित
करण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
याचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च, २०२२
ते दिनांक १२ मार्च, २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा
करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला आहे. या निमित्त राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत.
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त शुभेच्छा संदेश
जागतिक महिला दिनानिमित्तजबरदस्त मराठी भाषण
वरील उपक्रमात सहभागी होऊन #महिलादिन२०२२,
#womensdaymh2022 या #hashtag चा उपयोग करुन
उपक्रमाशी संबधित व्हिडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर (Facebook,
Instragram, Twitter) वर अपलोड करावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS