आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based Sanchamanyataविद्यार्थ्यांचे आधार क्रमांक घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमा
आधार क्रमांक आधारित संचमान्यता |Aadhar number based
Sanchamanyata
शैक्षणिक वर्ष सन २०२१-२०२२ ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे करण्याचे शासनाने संदर्भिय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती (Interim) संचमान्यता दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीस राज्यात आधार क्रमांक असलेली विद्यार्थी संख्या ८७%असून सर्व १००% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक घेण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करणे योग्य होईल.
- दि. ३०/१२/२०२१ रोजीच्या शाळेच्या पटावर नोंद असलेले परंतु सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांचे दि. ३१/०३/२०२२ पर्यंत आधार क्रमांक अपडेट झाल्यानंतर आधार क्रमांक नोंद केलेले विद्यार्थी संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.
- डुप्लीकेट (Duplicate) आधार क्रमांक
असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा (data) शाळास्तरावर दुरूस्त
करण्याची कार्यवाही करावी व डुप्लीकेट (Duplicate) आधार
क्रमांक राहणार नाहीत याची खात्री करावी.
- नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या
विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची
प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करुन व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य
शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या
संचमान्यतेकरीता ग्राह्य धरण्यात यावेत.
- ज्या विद्यार्थ्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत आधार क्रमांक मिळालेला नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.
- ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक उपलब्ध नाही व त्याने आधार क्रमांकासाठी नोंदणी देखील केलेली नाही असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करुन असे विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावेत.
वरील क्र. १ ते ५ मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार सर्व शाळांची
पडताळणी समितीमार्फत करण्यात यावी.
६.१ सदर पडताळणीकरीता संपूर्ण राज्यामध्ये पुढीलप्रमाणे
पडताळणी समिती असेल.
- · शिक्षण विस्तार अधिकारी- संबंधित बीट स्तर [समिती प्रमुख]
- ·
केंद्र प्रमुख-संबंधित केंद्र/ मनपा, नपा
क्षेत्रातील प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य सचिव
- · अंगणवाडी पर्यवेक्षिका- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य
- · आरोग्य कर्मचारी- संबंधित कार्यक्षेत्र [सदस्य]
६.२ वरील समितीने केंद्रातील प्रत्येक शाळेस समक्ष भेट
देवून सर्व विद्यार्थ्यांची खात्री दि. ३१/०३/२०२२ पर्यंत करावी व या
पत्रासोबतच्या नमुन्यात प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन
अधिकारी यांचेकडे सादर करावे. त्याची एक प्रत केंद्र शाळेवर जतन करुन ठेवावी.
६.३ सदरील प्रमाणपत्र व विहीत माहिती सरल पोर्टलवरील केंद्र
प्रमुख यांच्या लॉगीनवरुन अपलोड/नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल त्यावेळी अपलोड
करावे.
६.४ गटशिक्षणाधिकारी / प्रभाग अधिकारी / प्रशासन अधिकारी
यांनी सरल पोर्टलवर पटाची खात्री दि. ०५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करावी.
६.५ वरील प्रमाणे सुविधा ही केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२
साठी लागू राहील.
संच मान्यता अंतिम झाल्यानंतर प्रचलित शासन निर्णय /
परिपत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने समुपदेशन घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि.
३१/०५/२०२२ पूर्वी करावे.
महत्त्वाचे | लिंक्स |
---|---|
आधार क्रमांक आधारित संचमान्यता परिपत्रक | डाऊनलोड |
प्रमाणपत्र PDF | डाऊनलोड |
विद्यार्थी पड ताळणी प्रपत्र (इ १ ली ते १० वी ) | डाऊनलोड |
विद्यार्थी पड ताळणी प्रपत्र (इ ११ ली ते १२ वी ) | डाऊनलोड |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS