क्रीडागुण सवलत कार्यपध्दतीमध्ये एकसुत्रता व सुलभता यावी याकरीता खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना,sports marks in ssc 2022,sports marks in ssc 2021,sports
इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू
विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरिता मार्गदर्शक सुचना
Guidelines for giving extra sports marks to the students
of 10th and 12th exam
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक
शालांत प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या खेळाडू विद्यार्थ्यांना
सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पात्र
खेळाडूंना क्रीडागुणाची सवलत देण्याबाबत मार्गदर्शक सुचनांनुसार कामकाज
करण्याबाबतच्या सुचना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत.
क्रीडागुण सवलत कार्यपध्दतीमध्ये एकसुत्रता व सुलभता यावी याकरीता खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत.
- इयत्ता १० वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ७ वी अथवा ८ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे.तसेच इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.
- इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ ते ८ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ९ वी अथवा १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षातील सहभागाची अट लागू राहणार नाही.
- इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुणांची सवलत घेतली असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना इयत्ता ६ ते १० वी मध्ये शिकत असताना मिळविलेल्या क्रीडाप्राविण्यास इयत्ता १२ वी करीता क्रीडागुणांची सवलत देय असणार नाही. अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असताना मिळविलेली क्रीडागुण मिळण्यासाठीची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे. अशा खेळाडू विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या वर्षातील क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.
- इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुण सवलतीचा लाभ घेतला असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुण सवलतीचा लाभ घेतलेल्या खेळाव्यतीरिक्त अथवा प्राविण्याव्यतीरिक्त अन्य खेळातील अथवा अन्य स्तरावरील क्रीडागुण सवलतीसाठी पात्र कामगिरी असली तरीही इयत्ता १२ वी मध्ये पुनश्च क्रीडागुणांचा लाभ देता येणार नाही. त्यासाठी इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असतानाची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, कार्यालयास प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव स्वीकारुन, त्यावर शासन निर्णयातील तरतुदी व संदर्भीय पत्रे याद्वारे आवश्यक कार्यवाही करावी व पात्र प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करावेत. तसेच पात्र खेळाडू विद्यार्थी सवलत गुणांपासून वंचित राहु नयेत याची दक्षता घ्यावी.
TAG- sports marks in ssc 2022,sports marks in ssc 2021,sports marks in hsc 2021,sports marks in hsc 2022,sports marks in hsc 2022 maharashtra board,sports marks in hsc 2022 maharashtra board,sports marks in ssc 2020,sports marks in ssc 2020 gr,sports marketing,sports marketing history
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS