राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत 1 एप्रिल पासून सुधारणा करण्यास
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
Increase
in rates of transport allowance for state government employees
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या
दरांत 1
एप्रिल पासून सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत
मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
- 1. एस-20 व
त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात 5400 रुपये व
इतर ठिकाणी 2700 रुपये
- 2. एस-7 ते
एस-19 स्तरासाठी अनुक्रमे 2700 व 1350
रुपये
- 3. एस-1 ते
एस-6 स्तरासाठी 1000 व 675 रुपये
उपरोक्त एस-1 ते
एस-6 या वेतन स्तरामधील 24 हजार 200
रुपये व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी
समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत
कर्मचाऱ्यांना 2700 रुपये व इतर ठिकाणी कार्यरत
कर्मचाऱ्यांना 1350 रुपये इतका वाहतूक भत्ता मिळेल.
तसेच अंध, अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित
असणाऱ्या तसेच मुकबधीर /श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र
कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे वाहतूक भत्ता राहील.
- 1. एस-20 व
त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी समूहात 10 हजार 800
रुपये व इतर ठिकाणी 5400 रुपये
- 2. एस-7 ते
एस-19 स्तरासाठी अनुक्रमे 5400 व 2700
रुपये
- 3. एस-1 ते
एस-6 स्तरासाठी 2250 व 2250 रुपये अशी सुधारणा असेल.
एस-1 ते एस-6 या वेतन स्तरामधील 24 हजार 200 व त्यापेक्षा जास्त वेतन आहरित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समूह, नागपूर नागरी समूह व पुणे नागरी मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5400 रुपये व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना 2700 रुपये
इतका वाहतुक भत्ता अनुज्ञेय राहील. यासाठी 700 कोटी रुपये
इतका खर्च अपेक्षित आहे.
शासन निर्णय
वाहतूक भत्ता वाढ GR 2022
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS