राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे. संदर्भिय शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १०
शाळासिध्दी कार्यक्रमांतर्गत शाळांचे सन २०२१-२२ स्वयंमूल्यमापन पूर्ण करणे
Completion of self-assessment of schools in the year 2021-22 under Shaala Siddhi program
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक
शाळांचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे
महत्त्वाचे असून शैक्षणिक, भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता
वाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शाळासिध्दी हा कार्यक्रम
सुरू केलेला आहे. त्यानुसार राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा, नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धी वेबपोर्टलवर करणे आवश्यक आहे. संदर्भिय
शासन निर्णयानुसार दरवर्षी राज्यातील १००% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे.
- ·
शाळासिध्दी कार्यक्रमासाठी निपा, नवी
दिल्ली यांच्या www.shalasiddhi.niepa.ac.in या
वेबपोर्टलवरील सन २०२१-२२ च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरु झाली आहे.
- ·
सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे सन २०२१-२२
मधील स्वयंमूल्यमापन पूर्ण करून त्याची माहिती दि. ३० एप्रिल, २०२२
पर्यंत शाळासिद्धी वेबपोर्टलवर भरावयाची आहे.
- ·
शाळासिध्दी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती www.shalasiddhi.niepa.ac.in
वेबपोर्टलवर आहे. वेबपोर्टलचा वापर कसा करावा यासाठी वेबपोर्टलवर
माहिती ( USERMANUAL) देण्यात आली आहे. यासोबत मराठी
माध्यमाची शाळासिद्धी पुस्तिका देखील उपलब्ध आहे.
- ·
शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन संपूर्ण
मार्गदर्शक व्हिडिओ खाली दिलेला आहे.
सर्व शाळांनी सन २०२१-२२ मधील स्वयंमूल्यमापन सदर वेबिनार मधील निपा, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांनुसार पूर्ण करावे.
शाळा सिद्धी माहिती | Shalaa Siddhi information
सन २०२१-२२ चे शाळांचे स्वयंमूल्यमापन करतांना
मुख्याध्यापकांनी शाळासिध्दीची स्वतंत्र संचिका करून त्यात USERNAME आणि PASSWORD स्वत:च्या ताब्यात ठेवावे.
मुख्याध्यापकांची बदली झाल्यास कार्यभार हस्तांतरणाच्यावेळी सदर संचिका पुढील
मुख्याध्यापकाकडे हस्तांतरीत करावी.सन २०२१-२२ चे स्वयंमूल्यमापनपूर्ण केलेल्या
शाळांनी त्याची हार्ड कॉपी सदर संचिकेत लावावी व असे दरवर्षी करावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS