आदर्श शाळांमधील उपक्रमांवर आधारित "सृजनरंग" या ई अंकाचे ऑनलाईन प्रकाशन Online publication of the e-Aank "Srujanarang" based on activities in Adarsh sc
आदर्श शाळांमधील उपक्रमांवर आधारित "सृजनरंग" या ई अंकाचे ऑनलाईन प्रकाशन
Online publication of the e-Aank "Srujanarang" based on activities in Adarsh schools
Adarsh schools ;- शाळांमधील भौतिक सुविधांचा तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास
करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. भौतिक सुविधांच्या विकासामध्ये स्वतंत्र
शौचालये,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत
असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण,
क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या सुविधांचा समावेश
राहील. तर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना
शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध
करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या ग्रंथालयामध्ये
पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपिडिया
उपलब्ध असतील. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक
कार्यक्रमही याअंतर्गत राबविले जातील.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा
आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अंतर्गत आदर्श
शाळांमधील उपक्रमांवर आधारित "सृजनरंग" या ई अंकाचे ऑनलाईन प्रकाशन
दिनांक 6 एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.तरी या प्रकाशनासाठी शिक्षण
क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्वांनी बघावे असे आहवान करण्यात आलेले आहे.
"सृजनरंग (Srujanarang)" या ई अंकाचे ऑनलाईन प्रकाशन
- · दिनांक – 6 एप्रिल २०२२
- · वेळ – दुपारी ४ वाजता.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS