डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी,डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध लेखन मराठी,घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी | Dr. Babasaheb
Ambedkar Essay Marathi
हिंदू समाजव्यवस्थेत बदल व्हावा
म्हणून झटणारे थोर समाजसुधारक, भारतीय राज्यघटने शिल्पकार
वर्षानुवर्षे अंध:कारात खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाला विकासाचा आत्मोद्धाराचा
प्रकाश दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ या दिवशी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील
मंडणगड जवळील आंबवडे हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव.
डॉ. आंबेडकर यांचा जन्म महार
जातीमध्ये झाला. त्याकाळी हिंदू समाजव्यवस्थेच्या उतरंडीतील सर्वांत तळाची महार
जात समजली जात असे . सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण देणारा स्पृश्य
समाज अस्पृश्यांना मात्र सावलीला देखील उभे राहू देत नसे. सार्वजमिक पाणवठा, मंदीरे
, शाळा इ. सर्व ठिकाणी त्यांना प्रवेशबंदी होती. त्यांचे
मार्गदर्शन होणे वा त्यांचे बोलणे कानावर पडणे देखील स्पृश्यांच्या दृष्टीने घोर
पापाचे लक्षण होते .
सवर्ण हिंदूंबरोबरच अस्पृश्यांतील देखील वरच्या समजल्या जाणाऱ्या जाती त्यांचा विटाळ मानत असत. वर्षानुवर्षांच्या या शापित परंपरेमुळे निरक्षरता त्यांच्यासोबत होती. सर्व प्रतिष्ठित नोकऱ्यांच्या वाटा त्यांना बंद होत्या. रस्ते झाडणे ,शौचालयांची साफसफाई, मृत जनावरे उचलणे , जोडे शिवणे अशी हलकी कामे त्यांना करावी लागत. गावकुसाबाहेर उपेक्षितांचे जिणे जगणाऱ्या या अस्पृश्य समाजाची वेशभूषा, सामाजिक चालीरिती इ. वर देखील उच्चवर्णीयांकडून बंधने असत.
अस्पृश्यांच्या शिक्षणाबाबत देखील
इंग्रजांचा दृष्टिकोन उदासीन होता. मात्र १८५६ साली धारवाडच्या सरकारी शाळेतील
मुख्याध्यापकाने अस्पृश्य मुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने सरकारला या प्रश्नाबाबत
काहीतरी करणे भाग पडले. त्यामुळेच १८५८ साली सरकारी शाळेत सर्व जातींच्या
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असे आज्ञापत्रक सरकारतर्फे जारी करण्यात आले. अशी
सामाजिक स्थिती असलेल्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने
आधुमक जगातील समतेच्या क्रांतीला सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी,तर आईचे नाव भीमाबाई. बाबासाहेब हे उभयतांचे चौदावे अपत्य. बाबासाहेबांना लहानपणी सर्वजण भीमा म्हणत असत. भीमाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी रामजी लष्करी सेवेतून निवृत्त झाले व निवृत्तीनंतर त्यांनी दापोली येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कबीरपंथी रामजींनी लहानपणी भीमाकडून कबीराचे दोहे , अभंग, भजने पाठ करून घेतली. धार्मिक शिक्षणाची ओळख लहानपणीच भीमाला वडीलांमुळे झाली.
साताऱ्याच्या प्राथमिक शाळेत
भीमाचे प्राथमिक शिक्षण पार पडले. याच शाळेत आंबेडकर नावाच्या प्रेमळ शिक्षकांचा
सहवास त्यांना लाभला. आंबावडेकर या आडनावा ऐवजी आंबेडकर हे आपले सुटसुटीत आडनाव
त्यांनीच भीमाला दिले. साताऱ्यात शालेय शिक्षण घेत असतानाच न्हाव्याने केस कापायला
नकार देणे, विहिरींचे पाणी प्यायला न मिळणे , गणित सोडवायला फळ्याजवळ गेले असता विटाळ होण्याच्या भीतीने वर्गातील
मुलांनी फळ्याजवळील आपापले डबे उचलणे इ. कारणांमुळे भीमाला अस्पृश्यते ची झळ बसू
लागली.
१९०७ साली मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले . शिक्षणाच्या बाबतीत सर्वांत पछाडीवर असलेल्या महार जातीच्या मुलाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे ही त्या काळाच्या दृष्टीने अभूतपूर्व गोष्ट होती. या आनंदाप्रीत्यर्थ आयोजित सभारंभाला कृष्णाजी अर्जुन केळुस्कर उपस्थित होते . त्यांनी स्वत: लिहलेले गौतमबुद्धाचे मराठी चरित्र भीमरावांना भेट म्हणून दिले.केळुस्कर गुरुजींच्या प्रयत्नांनी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी भीमरावांना शिक्षणासाठी महीना रु. २५ वर्गणी मंजूर केली.
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण
झाल्यानंतर थोड्याच कालावधीनंतर भीमरावांचा विवाह भिकू वलंगकर यांची मुलगी रमाबाई हीच्याशी
झाला. एल्फिन्स्टन महाविद्यालयातील प्रा. ओसावाल्ड, प्रा. मुल्लर,
प्रा. अॅण्डर्सन या नामवंत प्राध्यापकांचा सहवास त्यांना लाभला.
प्रा. मुल्लर यांचे भीमरावांवर विशेष प्रेम होते . १९१२ साली ते बी. ए. ची परीक्षा
उत्तीर्ण झाले. बी. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या इच्छे विरुद्ध
त्यांनी बडोदा सरकारच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून नोकरी पत्करली. २ फेब्रुवारी,
१९१३ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले . वडिलांच्या अकस्मिक निधनानंतर
दहा वर्षे बडोदा राज्यातच नोकरी करण्याच्या अटीवर बडोद्याच्या महाराजांनी
भीमरावांचा अर्ज मंजूर केला.
अस्पृश्य जातीच्या तरुणाला
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जायची संधी मळणे ही त्या काळी अपूर्व अशी गोष्ट होती. १९१३
ते १९१६ ही तीन वर्षे आंबेडकर न्यूयॉर्कमध्ये राहिले . त्यांचे बरेच सहअध्यायी
दारू,
सिंगारे या सारख्या अनिष्ट व्यसनांवर पैसा उधळत. आंबेडकरांना मात्र
या कशाचेच व्यसन नव्हते . अधिकाधिक ज्ञानार्जनाची ओढ व ग्रंथसंग्रहाची धडपड याचे
आंबेडकरांना व्यसन होते. अमेरिकेतील समतेच्या वातावरणाचा त्यांच्या मनावर मोठा
परिणाम झाला. अमेरिकेत शिकत असताना प्रा. सोलिग्मन या प्राध्यापकाने त्यांना विशेष
प्रभाषित केले. त्या काळात त्यांचा रोज अठरा अठरा तास अभ्यास चालत असे. दोन
वर्षांच्या खडतर साधने नंतर १९१५ साली 'प्राचीन भारतातील
व्यापार' (एन्शन्ट इंडियन कॉमर्स) ह्या विषयावर प्रबंध लिहून
त्यांनी एम. ए. ची पदवी संपादन केली. १९१६ साली डॉ. गोल्डवे झर यांनी आयोजित
केलेल्या शिबिरात त्यांनी 'भारतातील जातीसंख्या, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास' (कास्ट्स् इन इंडिया, दे अर मे कॅरिझम, जे तसिस अॅण्ड डे व्हलप्मेंट) या विषयावर त्यांनी निबंध वाचला. जून,
१९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांच्या भारताच्या
राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिक्षीलन (नॅशनल डव्हिडन्ट
ऑफ इंडिया ए हस्टॉरिकल अॅण्ड अॅनॅलिटिकल स्टडी) या प्रबंधाला स्वीकृती दिली.
१९२५ साली लंडनच्या पी. एस. अॅण्ड
किंग कंपनीने ब्रिटीश भारतातील प्रांतिक वैतिक उत्क्रांती (द इव्हो ल्युशन ऑफ
प्रॉव्हिन्शिल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) हा प्रबंध प्रकाशित केला. बाबासाहेबांच्या
या प्रबंधाला कोलंबिया विद्यापीठाने मान्यता देऊन पी.एच.डी. ही सर्वोच्च पदवी
त्यांना बहाल केली. भारतीय अर्थव्यवस्थे वरील हे पुस्तक केंद्रीय विधिमंडळातील
सदस्यांना संदर्भ म्हणून आवश्यक झाले होते . पुढे भारतातील चलनविषयक मंडळासमोर
आंबेडकरांना साक्ष देण्यास बोलविण्यात आले असताना कमिशनच्या सदस्यांजवळ देखील
आंबेडकरांचा हा ग्रंथ होता. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या साम्राज्यवादी धोरणावर
त्यांनी या प्रबंधात टीका केली आहे . अर्थशास्त्राच्या अधिक अभ्यासाकरता आंबेडकर
यांनी ऑक्टोबर, १९१६ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पॉलिटिकल
सायन्स या संस्थेत प्रवेश घेतला. मात्र शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने त्यांना
भारतात परतणे भाग पडले.
बडोदा सरकारसोबत झालेल्या
करारानुसार ते बडोद्याला नोकरी करण्यास दाखल झाले. आंबेडकर यांना प्रशासनाचा अनुभव
यावा म्हणून प्रथम त्यांची महाराजांच्या मिलिटरी सचिवपदी मयुक्ती करण्यात आली.
मात्र आंबेडकरांना बडोद्यात जातीमुळे पदोपदी अवहेलना स्वीकारावी लागली. ऑफिसमध्ये
शिपाई त्यांच्या अंगावर दुरून फाईल फेकत असे , पिण्याचे पाणी देखील
ऑफिसमध्ये त्यांना निषेद्ध असे. जातीमुळेच त्यांच्या निवासाचा प्रश्न
निर्माण झाला. पारश्याच्या खानावळीत जात चोरून आंबेडकर काही दिवस राहिले. मात्र
सत्य उघडकीस येताच त्यांची तेथून त्वरित हाकालपट्टी झाली. बडोद्यात मिळणाऱ्या अशा
वागणुकीला कंटाळून आंबेडकर बडोद्याची नोकरी कायमची सोडून अल्पकालावधीतच मुंबई येथे
परत आले.
१९१९ साली अस्पृश्योद्धारासाठी झटणारे , भारतातील राखीव जागांचे जनक राजर्षी शाहू महाराजांचा आंबेडकरांशी परिचय झाला. दलित चळवळीसाठी मुखपत्र म्हणून ३१ जानेवारी, १९२० या दिवशी राजर्षी शाहू महाराजांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरू केले . पांडुरंग भटकर हे मूकनायकाचे पहिले संपादक. मूकनायकमधील आपल्या लेखात आंबेडकर यांनी हिंदू समाजाला मनोऱ्याची उपमा दिली आहे. समाजातील एक जात म्हणजे एक मजला असून व्यक्ती कितीही पात्र असली तरी त्याला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला मार्ग नाही. दुसऱ्या एका लेखात त्यांनी प्रत्येक नागरिकाला सामाजिक, धार्मिक, राजकीय हक्क मळावे याचे समर्थन केले आहे. स्वातंत्र्यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व देखील त्यांनी या लेखात व्यक्त केले आहे . हे पाक्षिक दुर्दैवाने अल्प कालावधीतच बंद पडले.
१९२०-२३ या काळात डॉ. आंबेडकरांनी
लंडन येथे राहून बॅस्टिर ही पदवी संपादन केली. 'दि प्रॉब्लेम ऑफ द
रुपी' हा त्यांचा प्रबंध लंडन विद्यापीठाने मान्य केला व
त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी
दली. जुलै, १९२३ पासून मुंबई हायकोर्टात त्यांनी बॉरस्टरीची
सुरुवात केली. याच काळात ४ ऑगस्ट, १९२३ रोजी मुंबई
विधिमंडळात रावबहाद्दूर बोले या समाजसुधारणावादी विचारवंताने सार्वजनिक पाणवठे ,
धर्मशाळा, विद्यालये , न्यायालये
इ. ठिकाणी सर्वांना प्रवेश असावा असा ऐतिहासिक ठराव मांडला. या ऐतिहासिक ठरावा पाठोपाठ
२० जुलै, १९२४ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बहिष्कृत हीतकारिणी सभा' स्थापन केली. या संस्थेचे
ध्येय पुढीलप्रमाणे - -
१) विद्यार्थी वसतीगृहाद्वारे अगर अन्य साधनांच्या मदतीने
बहष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे .
२) बहिष्कृत समाजाकरिता वाचनालये , शैक्षणिक
वर्ग उघडणे.
३) बहिष्कृत समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्याकरता औद्योगिक
व शेतकीविषयक शाळा चालविणे.
सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड हे बहिष्कृत हितकारणी सभेचे
अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते.
धर्मातर : १३ ऑक्टोबर, १९३५
रोजी येवले येथे भरलेल्या डीस्प्रेस्ड क्लासेस परिषदेच्या अधिवेशनात बाबासाहेबांनी
'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार
नाही' अशी घोषणा केली. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची
उन्नती होणे शक्य नाही, अशी खात्री पटल्यावरच बाबासाहेबांनी
वरील घोषणा केली.
बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म
स्वीकारावा म्हणूननिजामाने त्यांना आर्थिक प्रलोभने दाखवली. ख्रिस्ती धर्मगुरुंनी देखील
बाबासाहेबांना आपल्या धर्मात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेबांनी देशाच्या
एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या या धर्मांत जाण्यास स्पष्ट नकार दिला व १४
ऑक्टोबर,
१९५६ रोजी नागपूर येथील दीक्षा भूमीवर भारतीय संस्कृतीशी नाळ
जपणाऱ्या, समता व शांतीचा महान संदेश देणाऱ्या बौद्ध धर्मात
आपल्या ६ लाख अनुयायांसह प्रवेश केला.
धर्मांतरानंतर थोड्याच कालावधीत ६
डिसेंबर,
१९५६ रोजी बाबासाहेबांचे निधन झाल्याने आपल्या धर्मांतराचा खरा अर्थ
त्यांना आपल्या अनुयायांना व साऱ्या जगाला समजावून सांगता आला नाही. त्यांच्या निधनाने
अस्पृश्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणाऱ्या, भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या एका महामानवाच्या जीवित पर्वाचा अस्त झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी,डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध लेखन मराठी,घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग निबंध मराठी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी,dr babasaheb ambedkar essay marathi,dr babasaheb ambedkar essay in marathi wikipedia,dr babasaheb ambedkar essay in marathi language,dr br ambedkar essay in marathi,dr babasaheb ambedkar nibandh in marathi,dr babasaheb ambedkar lekh in marathi,dr babasaheb ambedkar essay in marathi,dr br ambedkar essay in marathi,dr babasaheb ambedkar essay in marathi wikipedia,dr br ambedkar essay in marathi
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS