कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यु झालेल्या कर्मचा-याच्या वारसास विमा कवच / सानुग्रह सहाय्य लागू
कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यु
झालेल्या कर्मचा-याच्या वारसास विमा कवच / सानुग्रह सहाय्य लागू | शासन
निर्णय
Insurance cover / sanugrah assistance will be applied to the heirs of the employee who died due to covid while performing the duties related to covid-19.
ग्रामविकास विभागाने कोविड-१९ या कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणा-या काही संवर्गातील
कर्मचा-यांना दिनांक ८ जुलै, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये विमा
कवच लागु केले होते . दि.३० सप्टेंबर, २०२० पर्यत कोरोना
विषयक कामकाजाच्या कर्तव्यावर असताना कोरोना या संसर्गजन्य विषाणूची लागन होऊन
मृत्यू झालेल्या कर्मचा -यांच्या वारसांना विमा रक्क्म रु.५० लाखाचे विमा कवच
देण्यात आले आहे . दि.३० सप्टेंबर, २०२० नंतर कोरोना विषयक
कामकाजाच्या कर्तव्यावर असताना कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या
कर्मचाऱ्यांच्या वारसांना रु.५० लाखाचे विमा कवच/सानुग्रह सहाय्य देण्याची बाब
शासन विचारधीन होती. आता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त जिल्हा परिषदांच्या
आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी /कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी,
संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले
कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी /कामगार मोठया प्रमाणात कोविड संबंधित कर्तव्ये पार
पाडीत आहेत. कोविड १९ च्या सार्वत्रिक साथीशी लढा देण्यासाठी सक्रीय राहून कर्तव्य
बजावणा -या अशा कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून व अशा कर्मचाऱ्यांचा
कोरोना कर्तव्य बजावताना दुदैवाने मृत्यु झाल्यास त्यांचे कुटुंबियांच्या पाठीशी
उभे राहण्यासाठी रु ५० लाखाचे विमा कवच शासन परिपत्रक क्रमांक.
चौविआ-२०२०/प्र.क्र.४२/वित्त-४ दि.८ जुलै, २०२० अन्वये दि.३०
सप्टेंबर, २०२० पर्यंत दिले होते. कोरोना विषयक कामकाजावर
कर्तव्य बजावत असताना कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण होऊन दिनांक ३० जून,
२०२१ पर्यंत मृत्यू झालेल्या ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त जिल्हा
परिषदांच्या आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी /कर्मचारी, ग्रामपंचायत
कर्मचारी, संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
कार्यरत असलेले कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी /कामगार यांच्या कुटुंबियांना रुपये
५० लाखाचे विमा कवच / सानुग्रह सहाय्य देण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात
येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मृत्युच्या सर्व प्रकरणी रू. ५० लक्ष रकमेचे विमा कवच
/सानुग्रह सहाय्य खालील अटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात येईल.
- १. कोविड संबंधित कर्तव्यावर नेमणुकीबाबत सक्षम प्राधिकारी याचे आदेशाची प्रत.
- २. सदर कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा
मृत्युच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असला पाहिजे. ही बाब
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अथवा अन्य कोणत्याही
पदनिर्देशित विभाग प्रमुख यांच्याकडून सत्यापित प्रमाणित करण्यात येईल.
- ३.सदर मृत्यू कोविड -१९ शी संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, शासकीय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालय, आयसीएमआर नोंदणीकृत खाजगी रूग्णालय/ प्रयोगशाळा यांचेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करण्यात येईल.
- ४.सदर विमा कवच सानुग्रह सहाय्य योजना जिल्हा परिषद अंतर्गत
कार्यरत सर्व अधिकारी / कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेले
कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी/कामगार म्हणजेच त्यांच्या वेतन व त्याचे अनुदान
ग्रामविकास विभागाकडून दिले जाते असे अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबियांना
ग्रामविकास विभागाकडून सानुग्रह सहाय्य देण्यात येईल. इतर विभागाकडून मिळणारे वेतन
व भत्यांच्या अनुदानातून ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते दिले जातात
त्यांचे प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात येऊ नयेत. त्यांच्या विमा कवच
सहाय्य व अनुदानाबाबत त्या त्या संबंधित विभागाने जिल्हा परिषदेकडून तपशिल घेण्यात
येऊन निर्णय घ्यावा.
- ५. कोरोना विषयक कामकाजाच्या कर्तव्यावर असताना करोना या संसर्गजन्य आजारामुळे दिनांक ३० जून २०२१ पर्यंत निधन झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात यावे.
TAG-sanugrah anudan,sanugrah anudan gr,sanugrah anudan covid
19,sanugrah anudan online registration,sanugrah anudan covid 19 application
form,sanugrah anudan 2021,sanugrah anudan website,sanugrah anudan covid 19
online registration,sanugrah anudan online form,sanugrah anudan in english
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS