shala purv tayari,shala purv tayari prashikshan,shala purv tayari in marathi,shala purv tayari abhiyan,shala purv tayari slogan in marathi,shala purv
शाळापूर्व तयारी अभियान | Shala Purv Tayari Abhiyan
इयत्ता 1 मध्ये जून 2024-25 मध्ये प्रवेश करणार्या मुलांसाठी 'स्टार्स'
(Stars) प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान (Shala Purv
Tayari) मोहीम राबविण्यात येत आहे.
मागील काही वर्षापासून आपण कोरोना या महामारीच्या संकटात आपण सर्व होतो. या रोगाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झाला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होतील, परंतु त्यांना प्रत्यक्षात अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभव मिळालेला नाही. या मुलांची पूर्व-शालेय तयारी (Shala Purv Tayari) करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून ते पुढे जाऊ शकतील आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय वाचन आणि लिहायला शिकू शकतील आणि ते योग्यरित्या शिकू शकतील. यासाठी आपल्या सर्वाना मार्च-मे 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात शाळापूर्व तयारी अभियान (Shala Purv Tayari) राबवायचे आहे. या अभियानात गावपातळीवर पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी शाळा, स्वयंसेविका यांचा मोठा वाटा राहणार आहे. या मोहिमेचे स्वरूप आणि आपल्याला नेमके काय करायचे आहे यावर एक नजर टाकूया आणि त्याचे आयोजनासाठी लागणारे शासनाचे साधने बघूया.
शाळा पूर्वतयारी मेळावा मार्गदर्शन व उद्बोधन वेबिनार
Shala Purv Tayari Step 1
·
इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व
त्यांच्या पालकांची नोंद करणे.
·
इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांच्या
घरी जाऊन त्यांच्या पालकांना मेळाव्याबाबत माहिती दयायची आहे. तसेच, पालकांचे
गट बनवायचे आहेत.
·
तुम्हाला शिक्षक म्हणून काय करायचे आहे?
·
इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व
त्यांच्या पालकांशी संपर्क साधायचा.
·
अशा ४-५ पालकांचे मिळून बनविलेल्या या
गटांच्या संपर्कात आपल्याला शेवटपर्यंत रहायचे.
·
इयत्ता सहावी ते दहावीच्या मुलांना लहान
मुलाचे समूह बनविष्यासाठी मार्गदर्शन करायचे.
Shala Purv Tayari Step 2
·
शाळा, गाव,
वस्ती स्तरावर शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करणे.
· आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी | मेळाव्याचे आयोजन करायचे आहे. या मेळाव्यात विविध क्रियांद्वारे पालक आपल्या मुलांकडून कशाप्रकारे शाळापूर्व | तयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगायचे आहे. | इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळापूर्व तयारीचा एक सेट दिला जाईल. पालकांना विकास पत्राच्या मदतीने कृती. समजावून सांगायच्या आहेत.
शाळापूर्व तयारी अभियान यासाठी उद्बोधन गीत
तुम्हाला शिक्षक म्हणून काय करायचे आहे?
1.
प्रत्येक शाळा, गाव,
वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन. पहिल्यांदा मुत्ताचे मूल्यमापन
करून रिपोर्ट कार्ड द्यायचे आणि मूल्यमापनाची माहिती स्वत सोबत ठेवायची.
2.
पालक व मुलाला School Readiness Pack द्यायचे.
3. टॅबलेट अथवा मोबाइलद्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना ते काय करू शकतात याची माहिती द्यायची.
Shala Purv Tayari Step 3
·
पालक व मुले शाळापूर्व तयारीच्या कृती घरी
तसेच गटांत करताना.
·
मेळाव्यानंतर पालक आपल्या मुलांकडून
शाळापूर्व तयारी करायला सुरवात करतीत. या
दरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन करायचे,
·
मार्च - मे या दरम्यान १० ते १२ वेळा आपण
पालक गटांना भेटणार आहोत. Idea Cards च्या मदतीनेही
आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत.
तुम्हाला शिक्षक म्हणून काय करायचे आहे?
·
जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या
मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी कृती करीत असतील तेव्हा गरजेनुसार पालकांच्या
शंकांचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन दयायचे.
· प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून Idea Card वर आधारित कृती करून घ्यायच्या आहेत. तसेच Idea Card वरील सूचनेनुसार व्हिडिओ दाखवायचे आहेत.
Shala Purv Tayari Step 4
·
दुसरे मूल्यमापन आणि शाळापूर्व तयारी
(मेळावा)
·
१० ते १२ आठवडे झाल्यानंतर मे/जून
महिन्यात पुन्हा एकदा मेळावा आयोजित करणार आहोत. या मेळाव्यात विकास पत्राच्या
मदतीने मुलांची प्रगती समजेल आणि शाळापूर्व तयारीचे प्रमाणपत्र दिले जाईल. जून
२०२२ मध्ये पुन्हा शाळा सुरू होतील. यावेळी इयत्ता पहिलीत या मुलांचे विशेष स्वागत
करण्यासाठी प्रवेशोत्सव' साजरा करायचा आहे.
तुम्हाला शिक्षक म्हणून काय करायचे आहे?
·
दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन.
·
मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्र वितरण.
·
गावातील मान्यवर व्यक्तींना बोलावून
त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण.
·
पालकांचे मनोगत ऐकणे.
· ही शाळापूर्व तयारी एखादया सणाप्रमाणे आनंदाने साजरी करायची आहे.
शाळापूर्व तयारी अभियान PDF
शाळापूर्व तयारी अभियान | डाऊनलोड लिंक्स |
---|---|
प्रशिक्षण बाबत शासन परिपत्रक | डाऊनलोड |
मेळावा आयोजन स्टेप्स | डाऊनलोड |
मेळावा BANNER | डाऊनलोड |
शाळापूर्व तयारी अभियान - पोस्टर्स | डाऊनलोड |
शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका | डाऊनलोड |
बालकांसाठी वर्कशीट | डाऊनलोड |
विकासपत्र (मूल्यमापन शीट) | डाऊनलोड |
पालकांसाठी आयडिया कार्ड | डाऊनलोड |
स्वयंसेवक सहभागी प्रमाणपत्र | डाऊनलोड |
TAG- shala purv tayari,shala purv tayari prashikshan,shala purv tayari in marathi,shala purv tayari abhiyan,shala purv tayari slogan in marathi,shala purv tayari prashikshan,shala purv tayari in marathi,shala purv tayari abhiyan,shala purv tayari slogan in Marathi,शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण,शाळापूर्व तयारी अभियान PDF
COMMENTS