राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी तयार करण्यात आलेल्या पोजिशन पेपर पोर्टल,पोर्टलवरील पोजिशन पेपर संदर्भात सहभाग/मत/प्रतिसाद/सूचना नोंदविण्यासाठी आवश्
राज्य अभ्यासक्रम आराखडे विकसनासाठी तयार करण्यात आलेल्या पोजिशन पेपर पोर्टल
Position Paper Portal for State Curriculum Development
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National
Education Policy 2020) हे केंद्रीय मंत्रीमंडळाने २९ जुलै २०२०
रोजी मंजूर केलेले आहे. सदर धोरणातील ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता शिक्षण
मंत्रालय, नवी दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत राष्ट्रीय व राज्य
अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमधील प्रक्रियेमध्ये
एकवाक्यता राहावी व संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण संदर्भात पोर्टल (NCF Portal) विकसित करण्यात
आले आहे.
सदर पोर्टलच्या माध्यमातून राज्यात आपण याआधीच मोबाईल अॅप
सर्वेक्षण व District Consultation Report (DCR) पूर्ण केले आहेत.
यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे राज्य अभ्यासक्रम निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक
पोजिशन पेपर विकसित करणे होय. यासाठी चार प्रकारचे अभ्यासक्रम आराखडे विकसित
करण्यासाठी एकूण २५ पोजिशन पेपर तयार करण्यात येत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली (NCERT) यांचेमार्फत पोजिशन पेपरचे स्वरूप निश्चित करण्यात आले असून यासाठी सदर २५
पोजिशन पेपरचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्य स्तरावरून सदर पोजिशन पेपर विकसनाची स्वतंत्र
प्रक्रिया सुरु आहे. परंतु या संपूर्ण प्रक्रियेमध्ये समाजातील व शिक्षण
क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्राशी संबंधित सर्व तज्ञांना आपले अभिप्राय, मते,
प्रतिसाद व सूचना नोंदविण्याची संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांचे मार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले असून सदर
पोर्टल मध्ये सर्व २५ विषयांवरील पोजिशन पेपरशी संबंधित प्रश्न देण्यात आले आहेत.
या प्रश्नांना अनुसरून आपले तज्ञत्व अथवा आवड असलेल्या विषयावर आपले मत नोंदविता
येणार आहे. एकावेळी एकापेक्षा अधिक पेपर साठी आपला प्रतिसाद नोंदविता येणार आहे.
पोर्टलवरील पोजिशन पेपर संदर्भात सहभाग/मत/प्रतिसाद/सूचना नोंदविण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती खालीलप्रमाणे
१. SCERT मार्फत विकसित करण्यात आलेल्या https://scertmaha.ac.in/positionpapers/
या लिंक वर क्लिक करून अथवा गुगल क्रोम किंवा ब्राउझर मध्ये लिंक
कॉपी करून पोर्टलला भेट द्या.
२. आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाच्या पोझिशन पेपरची आराखडा (template) प्रत डाउनलोड करा.
३. पोझिशन पेपरच्या आराखड्यात आवश्यक मुद्यांच्या अनुषंगाने
आपले मत / सूचना / योग्य उत्तरे देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (National
Education Policy 2020) व अनुषंगिक साहित्याचे वाचन करा.
हे अनुषंगिक
साहित्य वाचनासाठी https://bit.ly/3wcP8Eh येथे उपलब्ध आहे.
४. आपण डाउनलोड केलेल्या पोझिशन पेपरच्या मसुदयामधील
मुद्यांच्या अनुषंगाने आपले मत/सूचना/योग्य उत्तरे मराठी अथवा इंग्रजी मध्ये तयार
करा. यासाठी स्वतंत्र वर्ड फाईल (word file)तयार करा किंवा
गुगल डॉक (google doc) चा वापर करा.
५. आपले मत /सूचना/योग्य उत्तरे तयार झाल्यावर आपण पोर्टल
वर आपली नावनोंदणी करा.
६. नावनोंदणी नंतर आपले तज्ञत्व असणाऱ्या विषयाच्या पोझिशन
पेपरच्या आरखड्यामध्ये पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने आपले मत / सूचना/योग्य उत्तरे/
प्रतिसाद मराठी अथवा इंग्रजीमध्ये नोंदवा व सबमीट करा.
७. आपण नोंदविलेल्या आपल्या प्रतिसादाची प्रत आपणास आपण
पोर्टल वर दिलेल्या आपल्या ईमेल वर पाठविण्यात येईल.
८. याबाबत तांत्रिक अडचण असल्यास positionpapers@maa.ac.in
या ईमेल वर आपण संपर्क साधू शकता.
९. पोझिशन पेपर साठी योगदान देण्यासाठीची अंतिम दिनांक ३०
मे २०२२ राहील.
सदर पोर्टलच्या माध्यमातून आपले उपयुक्त असे
अभिप्राय/मत/प्रतिसाद/सूचना नोंदविण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व तज्ञांना
सदर पोर्टलबाबत व सुविधेबाबत अवगत करण्यात यावे. तसेच विविध समाज माध्यमातून यास
प्रसिद्धी देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक तज्ञ, इच्छुक व पात्र
व्यक्तींना या प्रक्रियेमध्ये आपला सक्रीय सहभाग नोंदविता येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS