⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) ग्राह्य प्रशिक्षण

शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) ग्राह्य प्रशिक्षण Training required for Senior Grade and Selection Grade of teachers

शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) ग्राह्य प्रशिक्षण

Training required for Senior Grade and Selection Grade of teachers

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ (Senior Grade)  व निवड श्रेणी (selection Grade) श्रेणी लागू करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या सुधारित कार्यपध्दतीस मान्यता दिलेली आहे. तथापि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी प्रशिक्षणांचा कालावधी निश्चित करून ती प्रशिक्षणेग्राह्य धरण्याची बाब शासनाने खालील प्रमाणे काही प्रशिक्षणांची माहिती जाहीर केली होती.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये वरिष्ठ (Senior Grade)  व निवड श्रेणी (selection Grade) लागू करण्यासाठी खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

१.शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे प्रतिवर्षी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान,अंतर्गत तसेच विद्या प्राधिकरण मार्फत आयोजित खाली नमूद प्रशिक्षणे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ (मे, २०१८) पर्यंत वरिष्ठ (Senior Grade) व निवड (selection Grade)  श्रेणीसाठी ग्राह्य येतील.

अ) प्राथमिक शिक्षकांसाठी

 

प्रशिक्षणाचे नाव प्रशिक्षक वरिष्ठ(१२ वर्ष)/निवड श्रेणी (२४ वर्ष)
१. भाषा- मुलभूत क्षमता वाचन कार्यक्रम राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शकसाठी (१२/२४) साठी ग्राह्य
२. गणित संबोध विकासन राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक (१२/२४) साठी ग्राह्य
३. तेजस प्रशिक्षण राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक (१२/२४) साठी ग्राह्य
Next Update Telegram Group Join Join Link

ब) माध्यमिक शिक्षकांसाठी 

प्रशिक्षणाचे नाव प्रशिक्षक वरिष्ठ(१२ वर्ष)/निवड श्रेणी (२४ वर्ष)
१. अविरत -१ १० दिवसांचे प्रशिक्षण लेव्हल १ फक्त वरिष्ठ श्रेणीसाठी
२. CHESS राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक (१२/२४) साठी ग्राह्य
३. आय आय टी चे गणित प्रशिक्षण राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक (१२/२४) साठी ग्राह्य
४.न्यासचे विज्ञान प्रशिक्षण राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक (१२/२४) साठी ग्राह्य

२. राज्य मंडळ, पुणे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड (selection Grade) वेतन श्रेणीसाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पर्यंत ज्या शिक्षकांनी सेवांतर्गत प्रशिक्षणे घेतली आहेत व समाधानकारकरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. या शिक्षकांचे प्रशिक्षण वरिष्ठ (Senior Grade) व निवड (selection Grade) वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावीत.

३. सन २०१८-१९ या वर्षापासून वरिष्ठश्रेणी करिता (१२ वर्ष) १० दिवसांचे प्रशिक्षण व निवडश्रेणी करिता (२४ वर्ष) प्रत्येक वर्षी १० दिवसांचे प्रशिक्षण याप्रमाणे सलग ४ वर्षात ४० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ते ग्राहय धरण्यात येईल. सदर १० दिवसाचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षात १२ वर्ष पूर्ण होणार आहेत त्या पूर्वीच्या कोणत्याही ३ पैकी २ वर्षात पूर्ण केलेली असावी, तसेच ४० दिवसांचे प्रशिक्षण हे शिक्षकांना ज्या वर्षी २४ वर्ष पूर्ण होणार आहेत त्या पूर्वीच्या ५ वर्षापैकी ४ वर्षात पूर्ण केलेले असावे.

४. वरिष्ठ (Senior Grade) व निवड (selection Grade) श्रेणीचा (१२/२४ वर्षाचा) लाभ मिळण्यासाठी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या आदेशामधील तरतूदी देखील लागू राहतील.

५. केवळ वरिष्ठ अथवा निवडश्रेणी करिता विद्या प्राधिकरणातर्फे अथवा राज्य मंडळातर्फे यापुढे वेगळयाने अथवा स्वतंत्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत (विद्या प्राधिकरण) प्रत्येक वर्षी समग्र शिक्षा अभियान (स.शि.अ/ रा. मा.शि.अ.) अंतर्गत जी प्रशिक्षणे, आयोजित करण्यात येतील, या प्रशिक्षणांचा एकत्रित रित्या उपरोक्त परिच्छेद क्र. ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कालावधी पूर्ण केल्यास सदर प्रशिक्षणे ही वरिष्ठ (Senior Grade) व निवड (selection Grade) श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावीत.

माहिती संकलन – शासन निर्णय २१/१२/२०१८ नुसार (संकेताक २०१८१२२११५३५३५१७२१)

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम