⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आदर्श शाळा निवडण्यासाठी आवश्यक पूर्व निकष | criteria required to select the MODEL school

आदर्श शाळा निवडण्यासाठी आवश्यक पूर्व निकष निकष Pre-requisite criteria required to select the MODEL school

आदर्श शाळा निवडण्यासाठी आवश्यक पूर्व निकष निकष

Pre-requisite criteria required to select the MODEL school

आदर्श शाळा” म्हणजे कायत्याचे निकष  परिभाषा काय:-

“आदर्श शाळा”

निर्मितीमध्ये तीन महत्वाचे भाग असतील. यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबी यांचा समावेश राहील.

भौतिक सुविधा :- भौतिक सुविधेमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यासारख्या भौतिक सुविधांचा समावेश राहील.  आजूबाजूच्या गावांपासून व शाळांपासून दळणवळणासाठी रस्ते असतील.  भविष्यात विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यास, इमारत व भौतिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी पुरेसा वाव असेल

शैक्षणिक गुणवत्ता :- गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध राहील.  पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्वतील.  विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे लिहिता वाचता यायला पाहिजे.  वर्गात उभे राहून वाचनावर भर देणे गरजेचे आहेवाचनाचा सराव आवश्यक आहे.  विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना त्यात वाचन, लेखन व गणिती क्रिया अवगत होणे अनिवार्य असणार आहे.  शाळेच्या ग्रंथालयामध्ये निरनिराळी गोष्टींची पूरक वाचनाची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ, इनसायक्लापिडिया उपलब्ध असतील.  स्वअध्ययनासोबतच गट अध्ययन यासारखे रचनात्मक पद्धतीने शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील.

1) आदर्श शाळेतील 21व्या शतकातील कौशल्य जसे-नवनिर्मितीला चालना देणारे (Creative Thinking), समीक्षात्मक विचार (Critical Thinking), वैज्ञानिक प्रवृत्ती (Scientific Temperament), संविधानिक मुल्ये अंगी बाणविणे, सोबत काम करण्याचे कौशल्य (Collaboration), संभाषण कौशल्य (Communication) या सारखी अन्य कौशल्ये जाणीवपूर्वक विकसित करण्यात येतील

2) आदर्श शाळेकडे लोक आकर्षित होऊन इतर शाळा सोडून या शाळेत आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पाठविण्यास तयार होतील.  पालक त्यांच्या पाल्याच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तीमत्व विकासासाठी विविध शालेय व सह शालेय उपक्रमात सहभाग घेण्यासाठी तयार असणे हे ती शाळा आदर्श शाळा असल्याचे दर्शविते.

3) आदर्श शळेमध्ये वातावरण हे प्रसन्न असावे.  विद्यार्थ्यांना शाळेत यावेसे वाटणे गरजेचे आहे.  विद्यार्थ्यांना शनिवारी व रविवारी देखील शळेत यावेसे वाटले पाहिजे.  मुलांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळेल.  आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षणातून (Activity Based Learning) स्वत:ला ज्ञानाची निर्मिती करता येईल.  रचनात्मक व आनंददायी शिक्षणातून त्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विषयाचे शिक्षण अवगत करता येईल.  शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुलांना शिकवावे.  संकोच न करता, न घाबरता विद्यार्थी प्रश्न विचारण्यास उत्सुक असतील व त्यातून चिकित्सक वृत्तीमध्ये वाढ होईल

 

राज्यातील प्रत्येक गटातून व CRC मधून एक तसेच शासकीय विद्यानिकेतन, मॉडेल स्कूल, तेजसवओजस शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय याप्रमाणे पहिल्या टप्यात 543 आदर्श शाळांची निर्मिती वर्ष 2025 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 5000 "आदर्श किंवा गौरव शाळांची" निर्मिती अपेक्षित.

  • ·        निवडीचे निकष:- वाढती पटसंख्या, मुलांची उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती, उत्कृष्ट शिक्षक, चांगल्या भौतिक सुविधा व सक्रीय समाज सहभाग.
  • ·        प्रत्येक शाळेसाठी किमान रु.1 कोटी निधी अपेक्षित.

भाग- 1: आदर्श शाळा निवडण्यासाठी आवश्यक पूर्व निकष

  • 1) किमान 1 ली ते 7 वीची शाळा असावी.
  • 2) किमान पटसंख्या 100 असावी.
  • 3) शाळेचे स्थान मध्यवर्ती असावेवचांगली road connectivity असावी.
  • 4) भविष्यवेधी दृष्टीकोनातून वाढती पटसंख्या अनुषंगाने अतिरिक्त वर्गखोल्या बांधकामासाठी पुरेशा जागेची उपलब्धता असावी.
  • 5) क्रीडांगणासाठी पुरेशी जागा असावी.
  • 6) लोकसहभाग

भाग-2: आदर्श शाळा निवडल्यानंतर विकसित करावयाच्या बाबी

  • 1) वाढते लोकसहभाग
  • 2) भविष्यात वाढती पटसंख्यावकिमान 100-150 पटसंख्या
  • 3) शालेय प्रांगणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग) असणे अपेक्षित आहे.
  • 4) आकर्षक शाळा इमारत
  • 5) विद्यार्थीनुसार वर्गखोल्या
  • 6) मुलां-मुलीं करीता व CWSN साठी स्वतंत्रवपुरेशी स्वच्छतागृहे
  • 7) पेयजल सुविधावहँड वॉश स्टेशन
  • 8) मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृहवभांडार कक्ष
  • 9) शैक्षणिक साहित्य
  • 10) खेळाचे साहित्य
  • 11) ग्रंथालय/वाचनालय
  • 12) संगणक कक्ष
  • 13) Virtual Class Room (Optional)
  • 14) शाळेस विद्युतीकरण सुविधा
  • 15) संरक्षक भिंत
  • 16) आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील Fire extinguisher सह emergency exit
  • 17) परिसरातील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था असणे अपेक्षित आहे.
  • 18) उत्कृष्ट शिक्षकांना देशांतर्गत/देशाबाहेरील प्रशिक्षणासाठी पाठविणे.

दरवर्षी आदर्श शाळा यादीचा आढावा घेण्यात येईल. ज्या शाळांची अपेक्षेप्रमाणे कामगिरी नाही त्यांना यादीतून वगळण्यात येईल. शाळेतील गळती पूर्णपणे थांबली पाहिजे. अन्यथा सदर शाळेला आदर्श शाळांच्या यादीतून वगळण्यात येईल.

488 MODEL SCHOOL LIST

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम