शैक्षणिक वर्ष सुरुवातीस शाळास्तरावर करावयाची कार्यवाही Action to be taken at school level at the beginning of the academic year
शैक्षणिक वर्ष सुरुवातीस शाळास्तरावर करावयाची कार्यवाही
Action to be taken at school level at the beginning of
the academic year
सन २०२4-२5 या शैक्षणिक वर्षात दिनांक 15 जून २०२4 रोजी
शैक्षणिक सत्र सुरू होत असून ६ ते १४ वयोगातील सर्वच मुलांना शाळेत दाखल करावयाचे
आहे तसेच वय वर्ष ४.५ च्या पुढील अंगणवाडीतील सर्व मुलांमुलींना शाळा
पुर्वतयारीसाठी इयत्ता १ ली च्या वर्गात अध्ययन अध्यापनाची व्यवस्था करावयाची आहे.
प्रवेशित करावयाचे आहे. तसेच प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करावयाचे
आहे. शिक्षकांनी आपली कौशल्ये वापरुन शैक्षणिक वर्षास नव्या उमेदीने प्रारंभ
करावा.
१) शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करणे.
२) शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके व गणवेश वितरीत
करणे.
३) बालरक्षक / शिक्षकांनी स्थलांतरीत मजुरांची मुले, शाळाबाहय
होण्याची शक्यता असणारे विद्यार्थी यांच्या घरो भेटी देऊन शाळेत येण्याची मानसिकता
तयार करणे.
४) SARAL UDISE PLUS प्रणालीतील माहिती अद्ययावत करणे. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करणे.
५) ग्रंथालयातील पुस्तकांचे
अवांतर वाचन, कवितालेखन, योगा शारिरीक
शिक्षण ध्यान-धारणा, खेळ इ. माध्यमांनी विद्यार्थ्यांच्या
मनातील अनामिक भिती दूर करावी.
६) शाळेत स्पीकरवरुन विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक
मार्गदर्शन करावे.
(७) शाळागृहास आकर्षक सजावट करण्यात यावी स्वच्छतागृहे
स्वच्छ वापरण्यास योग्य असावीत असे पहाव नादुरुस्त असलेली स्वच्छतागृहे
ग्रामपंचायतीमार्फत १५ व्या वित्त आयोगातून १५ दिवसांच्या आंत दुरुस्त करून
घ्यावीत.
८) शाळेचा नामफलक, सूचनाफलक, वर्गफलक इ. रंगवून अथवा निटनेटके स्वच्छ कराव शाळेचा नामफलक दर्शनी भागात
उंचावर लावलेला असावा
९) शाळेचा परिसर निर्मळ व प्रसन्न स्वच्छ व नीटनेटका दिसावा.
१०) प्रत्येक शाळेत हेण्ड वॉश स्टेशन कार्यान्वीत कराव
त्याचे पाणी शोषखड्ड्यात सोडाव अथवा त्यावर परसबाग उभी करावी.
११) फुलझाडांच्या कुंडया निटनेटक्या व व्यवस्थीत ठेवाव्यात.
१२) शाळेत स्वच्छ व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
करण्यात यावी.
१३) शाळेतील सतरंज्या, चटई इ. झाडून झटकून,
धुऊन स्वच्छ करण्यात यावत. शाळेत बेच असल्यास बंच, खुची टेबल व संगणक संच नादुरुस्त असल्याम दुरुस्त करून सुव्यवस्थीत
कराव्यात.
१४) शिक्षक हजेरी, वर्गवारी विद्यार्थी
हजेरी निटनेटक्या पध्दतीने लिहून पुर्ण असावेत
१५) शैक्षणिक वर्ष २०२4-२5 साठी दाखलपात्र असलेल्या १००%
बालकांना शाळेत दाखल करावे दाखल होणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन
प्रवेश प्रक्रीया पूर्ण करावी. वय वर्ष ४.५ असलेल्या अंगणवाडीतील बालकांना
शाळेच्या पहिल्या दिवसापासून इ. १ लीच्या वर्गात बसवावे. अंगणवाडी दूर असल्यास एका
शिक्षकाने अंगणवाडीत जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करावे.
१६) शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरु झाल्याची वातावरण
निर्मिती करावी.
१७) मुख्याध्यापकांनी वर्गशिक्षकांना आवश्यक स्टेशनरी
उपलब्ध करुन द्यावी. माहे जून पासून विद्यार्थी हजेरी नियमितपणे लिहावी व
कामकाजाच्या आवश्यक नोंदीबाबत आढावा घ्यावा.
१८) मुख्याध्यापक कार्यालयातील सर्व आवश्यक अभिलेखे
निटनेटके ठेऊन वर्गिकरण करावे. मुख्याध्यापक कक्षातील सर्व समित्यांचे फलक
अद्ययावत करावेत. शिक्षक निहाय कामकाज वाटणी करावी.
१९) सर्व प्रकारच्या शालेय कामकाजाचे लेखी नियोजन करावे.
२०) धोकादायक इमारत व वर्गखोल्यांत विद्यार्थ्यांना बसवू
नये.
२१) सर्व प्रकारची आवश्यक शालेय किरकोळ दुरुस्ती करून
घ्यावी.
२२)विजेचे खांब, वायर्स व सर्व सप्लाय
इत्यादी सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
२३) शालेय इमारतीलगत मोठे वृक्ष, वृक्षांच्या
फांद्या असल्यास त्याची छाटणी करुन घ्यावी.
२४ ) विजेवर चालणारी उपकरणे व ई-लर्निंग साहित्याची निगा
ठेवावी.
२५) सर्व प्रकारच्या लाभ योजना व शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत
विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करावी. उदा. सुवर्ण महोत्सवी योजना.
[सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव]
२६) जलशुध्दी अभियांनातर्गत प्रत्येक शाळेतील पिण्याच्या
पाण्याची टाकी, जलकुंभ वेळोवेळी स्वच्छ करुन निर्जंतुकीकरण करुन
घ्यावेत. पुढे वर्षभर वेळोवेळी स्वच्छ करावेत.
२७) मुख्याध्यापकांनी कोविड पार्श्वभूमिवर शाळेत पुरेशा
प्रमाणात सॅनिटायझर, साबण, मास्क, स्प्रे पंप, सोडीयम हायपोक्लोराईल, थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटर इ. स्थानिक प्राधिकरणाच्या
मदतीने व शालेय अनुदानातून उपलब्ध करुन घ्यावे.
२८) मुख्याध्यापक यांनी सन २०२3-२4 चे संकलीत - २ चे कामकाज
सर्व शिक्षकांनी पुर्ण केल्याची पुन:श्च खात्री करावी. शिक्षकांनी वर्गातील
विद्यार्थी व पालकांशी संपर्क करुन आगामी वर्षातील कामकाजाची माहिती द्यावी.
२९) इयत्ता १लीच्या वर्गशिक्षकाने १००% पटनोंदणी करण्याचे
नियोजन करावे. इतर शिक्षकांनीही मदत करावी.
३०) दि.14 जून पासून शाळा पूर्वतयारी सुरु करावी.
३१) शिक्षकांनी आपल्या वर्गखोलीची किरकोळ दुरुस्ती व
रंगरंगोटी करुन घ्यावी. वर्गातील फटी व बीळे सिमेंटने भरुन घ्यावेत व अडगळीच्या
साहित्याचे नियमानुसार निर्लेखन करावे.
३२) शिक्षकांनी वर्गस्तरीय आवश्यक अभिलेखे नोंदविण्यास सुरुवात करावी व सुरु केलेल्या अभ्यासाच्या दैनंदिन नोंदी ठेवाव्यात.
३३ ) शिक्षकांनी वर्गात सर्व पात्र विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे लाभ मिळवून द्यावेत.
३४) शिक्षकांनी शाळासिध्दी पोर्टलवर ऑनलाईन नोंदी अद्ययावत
कराव्यात.
३५) गळके छप्पर असल्यास पत्रे, कौले,
बदलून घ्यावेत व गरजेनुसार स्लॅबला वॉटर प्रूफिंग करुन घ्यावे.
३६) शाळा सुरु झाल्यावर पावसाळयात ओलाव्याच्या ठिकाणी
विद्यार्थ्यांना बसवू नये.
३७) सर्व उपक्रम व कार्यक्रमात शाळेचा निर्यामत सक्रीय
सहभाग वाढवावा.
३८) मान्सून कालावधीत विविध प्रकारचे साथरोग व आकस्मिक
आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्याबाबत पूर्व तयारी व उपाययोजना करुन ठेवावी.
३९) पुढील वर्गातील प्रवेशासाठी एखाद्या विद्यार्थ्यास अडचण
आल्यास प्रवेशासाठी मदत करावी.
४०) आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड लसीकरण विद्यार्थी वयोगट
व सर्व नागरिकांना कोविड लस घेण्यात मार्गदर्शन करुन जनजागृती करावी.
४१) विद्यार्थी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
४२)सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सुध्दा दुर्देवाने अनुचित
घटना अथवा अपघात घडल्यास तात्काळ प्रथमोपचारासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य
केंद्राशी संपर्क करावा. विद्यार्थ्यांच्या पालकास कळविण्यास व ते येण्याची वाट न
पाहता शिक्षकांनी तातडीने प्रथमोपचार मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा
नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालय/जिल्हा रुग्णालयात दाखल करावेत.
आवश्यकतेनुसार नजिकच्या पोलीस स्टेशनला खबर द्यावी. शाळा पातळीवर एका शिक्षकांची
आपतकालीन प्रमुख म्हणून नेमणूक करावी. आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करावी.
आपत्ती निवारणाची प्रात्याक्षिके घ्यावीत. अग्निशमन यंत्रे सुस्थितीत व योग्य
ठिकाणी ठेवावीत. आपतकालीन परिस्थितीत उपयोगी फोन नंबरची यादी सर्वांना दिसेल अशा
ठिकाणी लावावी. उदा. १) अग्निशमन केंद्र, २) प्राथमिक आरोग्य
केंद्र, ३) रुग्णवाहिका, ४) सर्प मित्र,
५) डॉक्टर, ६) विद्युत कार्यालय, ७) पोलीस स्टेशन, ८) नॅशनल अॅम्बुलन्स सव्हिस- १०८,
९) जिल्हा आपत्ती निवारण कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय)
४३) शालेय परिसर, मुख्याध्यापक दालन,
सर्व वर्गखोल्यांची साफसफाई करण्यात यावी. वर्गखोल्यांतील जुने
तक्ते, भित्ती फलके, जळमटे काढून
टाकावीत. शाळेत व वर्गात लावलेले वंदनीय व्यक्तीचे फोटो स्वच्छ पुसून काढावेत.
शालेय दप्तरे, महत्वाची कागदपत्रे, शालेय
रेकॉर्ड स्वच्छ करावे. जून्या पताका, जुने हार, काढून टाकाव्यात.
४४ ) शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील
विद्यार्थ्यांना वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देऊन एकही मूल शाळाबाहय राहणार
नाही याची दक्षता घ्यावी.
४५) गटातील सर्व विद्यार्थ्यांची पटनोंदणी करुन इ.१ली ते
८वीची मुलामुलींची पटसंख्या दिनांक १ जुलै २०२4 रोजी पटनोंदणी अहवाल जिल्हा
कार्यालयास सादर करावा.
४६) शाळेतील किचनशेड स्वच्छ करावे, गॅस
शेगडी व सिलेंडर चांगल्यास्थित असल्याची खात्री करावी. ४७)विद्याथ्र्यांना स्थानिक
उपलब्धतेनूसार बैलगाडी/घोडागाडी/ट्रक्टर/डोली यांचा वापर करुन शाळेत आणणे व सोडणे
याबाबत व्यवस्था करण्यात यावी. अशा प्रकारे नवागतांचे स्वागत करण्यात यावे.
४८) मुख्याध्यापक दालन व प्रत्येक वर्गासमोर सडा शिंपून
रांगोळी काढून वर्ग सजावट केलेली असावी. आंब्याच्या किंवा उपलब्ध असलेल्या
पानाफुलांची तोरणे बांधणे. ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवणे (लावणे.)
४९) शाळा शुभारंभ दिवस याबाबत सोशल मिडीया, वृत्तपत्र,
दूरदर्शन, आकाशवाणी यांचे माध्यमातून
प्रसिध्दी देण्यात यावी. छोटे छोटे व्हिडीओ तयार करुन जिल्हास्तरावर सादर करण्यात
यावे.
५०) शाळेत विद्यार्थी संख्या वाढीबाबत सर्व शिक्षकांनी व
मुख्याध्यापकांनी विशेष प्रयत्न करण्यात यावे. शाळेच्या पूर्वदिनी सर्व शिक्षक व
मुख्याध्यापक यांनी शाळेत उपस्थित राहणे
५१) शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, पालक सन्माननीय सदस्य, निमंत्रित व्यक्ती, नवागत विद्यार्थीी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी एकत्रित येऊन मिरवणूक काढावी मिरवणूक गावातून नियोजित मार्गाने आणून परत शाळेत विसर्जित करावी मिरवणुकीत विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या वेशभूषत आणावे. (उदा. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर इ.) मिरवणूकीत काही विद्याथ्यांकरीता महापुरुष मुखवटे तयार करण्यात यावे व विद्यार्थ्याना वाटप करावे. मिरवणुकीनंतर सवांनी शाळा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करावे.
त्यात खालील उपक्रम हाती घ्यावेत.
- ·
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष/जेष्ट
नागरिक यांचे हस्ते प्रतिमा पुजन करून शाला प्रभारंभ करावा, बालकांचा
मोफत व शाळा प्रवेशोत्सव, पटनादणी पंधरवडा बाबत सर्वांना
अवगत करावे.
- · नव्याने दाखल झालेल्या विद्याथ्यांची त्यांच्या पालकांचे व वर्ग शिक्षकांचे ज्येष्ठ नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे हस्ते स्वागत करावे.
- · निमंत्रित मान्यवर अधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा द्याव्यात. गुलाब पुष्प देऊन नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत करावे.
- ·
विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके, गणवेश,
शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक साहित्याचे गावातील लोकप्रतिनिधी /
ज्येष्ठ नागरीक यांचे हस्ते वाटप करावे.
- · शाळास्तरावर वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेऊन विद्यार्थी गट पाडून प्रत्येक गटास वृक्ष लागवड देण्यात यावेत. शालेय परिसरात वृक्षारोपन करुन परिसर हरित करावा.
- ·
डिजिटल क्लासरुम कार्यान्वीत करावेत. ज्या
ग्रामपंचायतींना wi-fi कनेक्शन आहे. तेथून शाळांमध्येही wi-fi सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी.
- ·
प्रत्येक शाळेत उपक्रमांवर आधारीत
कृतीयुक्त अध्ययन असावेत. त्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ बालविवाह प्रथा बंद करणे, कच-याची
समस्या इ. प्रकल्प प्रत्येक शाळेत हाती घ्यावेत.
- ·
शाळांच्या भिंती बोलक्या असाव्यात, Building as
learning Aids (BALA) प्रकल्पानुसार शाळेतील भिंतीवर
विद्यार्थ्यांच्या मार्फत चित्र रेखाटन, अध्ययन साहित्य
रंगवणे, विद्यार्थ्याचे स्व अनुभव भिंतीवर रंगविणे, थिम देऊन चित्र रंगविणे, इ. तून विद्यार्थ्यांच्या
सृजनशिलतेला वाव देणे.
- ·
शिक्षक गावातील तरुण मंडळी, कलाकार
यांनी देशभक्तीपर गीते, बोधकथा, पर्यावरण
शिक्षण, वृक्षारोपन, स्वच्छतागृहाचा
वापर, जलसाक्षरता, निरंतर शिक्षण,
लोकसंख्या शिक्षण विषयक कार्यक्रम सादर करुन सवांचा उत्साह
व्दिगुणित करावा.
- · १००% उपस्थितीसह वर्गाध्यापनास प्रारंभ करणे. शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांची १००% पटनोंदणी करण्यात यावी. तसेच १००% विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती आवश्यक आहे. शालेय अध्यापनाची सुरुवात स्वागत कार्यक्रम व परिपाठानंतर पहिल्या तासिकेपासूनच करावी.
- · शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना वयानुरुप समकक्ष वर्गात प्रवेश देऊन एकही मूल शाळाबाहय राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
- · मध्यान्ह भोजनात पहिल्याच दिवशी भोजन द्यावे. भोजनात गोड पदार्थ असावा.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS