⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पहिल्या दिवशी शाळेत साजरा होणार प्रवेशोत्सव

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव Entrance ceremony will be celebrated in the school on the first day

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव
Entrance ceremony will be celebrated in the school on the first day

        मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. यानुसार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंबंधीच्या परिपत्रकाद्वारे शिक्षण संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत.

        इयत्ता पहिली ते बारावीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रबोधन करावे. फूल देऊन किंवा शालेय उपयोगी साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक राहील असे व्यवस्थापन करावे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

        मागील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने शैक्षणिक अध्ययन कमाल पातळीपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत नाही. तसेच शाळांतील शैक्षणिक सोयीसुविधा अस्ताव्यस्त झालेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी आणि दर्जेदार तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित असल्याने हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मागील काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना, सेतू अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक साधनांची प्रभावी अंमबजावणी करण्याबाबत सहकार्य करावे. तसेच शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे, असेही याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करणे

सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्याथ्यांचे प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत करणे आवश्यक आहे.

Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
प्रवेशोत्सव परिपत्रक डाऊनलोड डाऊनलोड 

पुढील प्रमाणे आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी.

१. शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्याचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात यावी.

२. शाळाबाह्य झालेली किंवा असलेल्या बालकांचा शोध शाळापूर्व तयारांच्या कालावधीमध्ये करण्यात यावा. निर्दशनास आल्यास अशा बालकांना शाळेत प्रवेश देण्यात यावेत.

३. नजिकच्या परिसरातील दगडखानी, वीटभट्टी बांधकामाचे स्थळ, उद्याने बाजार पेठा, पदपथ, सिग्नल, कुटीर उद्योग, कामगार वस्त्या या सारख्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे.

४. शाळा प्रवेशाचा पहिल्या दिवशी आपण व आपल्या अधिनस्त प्रत्येक अधिकान्यांनी व्यक्तीशः किमान एका शाळेत जाऊन विद्यार्थ्याचे/शिक्षकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्बोधन / प्रबोधन करावे.

५. विद्यार्थ्याचे स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य, स्थानिक स्वोत मध्ये उपलब्ध उपयोगी सामुग्री देऊन करण्यात यावे. विद्यार्थ्यामध्ये शाळेत उपस्थित राहण्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतील वातावरण चेतन्यमय आणि उत्साहवर्धक इ.चे व्यवस्थापन करण्यास मार्गदर्शन करावे.

६. मागील दोन वर्षात विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसल्याने सर्व विद्याथ्र्यांना त्यांच्या किमान पातळीपर्यंत आणण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षक यांचेशी विचार विमर्श करुन अध्ययन निष्पत्तीसाठी उपाययोजना सेतु अभ्यासक्रम, इतर विविध शैक्षणिक सधनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत उद्बोधन व सहकार्य करावे.

७. शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाची स्थानिक पातळीवरील प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी.

८. शाळा प्रवेशाच्या दिवशी माजी विद्यार्थ्याचे माजी शिक्षक, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्त इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम