⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण FAQ | Senior Salary and Selection Grade Training FAQ

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण FAQ  Senior Salary and Selection Grade Training FAQ

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण FAQ
Senior Salary and Selection Grade Training FAQ

अधिकृत प्रशिक्षण वेबसाईट - https://training.scertmaha.ac.in/

वरील लिंकवर तक्रारी देऊ शकता,तक्रार देताना प्रशिक्षणार्थ्यांनी आपले नाव, रजिस्ट्रेशन नंबर,शाळेचे नाव, यु डायस क्रमांक द्यावा लागेल. आपल्या तक्रारींचे निवारण तक्रार दिल्यापासून दोन ते तीन दिवसात करून तुम्हाला ई-मेल पाठवला जाईल.


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र | Senior and Selection Category Training Certificate

प्रशिक्षणा दरम्यान येणाऱ्या अडचणी

  • १) प्रशिक्षणाचा कालावधी किती?
  • २)  E-mail मिळाला नाही.
  • ३) केवळ sample video दिसणे.
  • ४) स्वाध्याय पूर्ण करणेबाबत.
  • ५) प्रशिक्षण रोज पहावे लागणार का?
  • 6) मी पाहिलेल्या साहित्याला ब्लू टिक येत नाही.
  • 7) वाचन साहित्याचे वाचन कसे करावे?
  • 8) प्रशिक्षण प्रकार बदलणे.

 

Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण Update Telegram Join link

[lock]

१) प्रशिक्षणाचा कालावधी

प्रशिक्षणाचा कालावधी - प्रशिक्षणास लोगिन केल्यापासून ४५ दिवस

उपलब्ध वेळ - ४५ दिवस X २४ तास एकूण उपलब्ध वेळ - १०८० तास ….यातील कोणतेही मिळून ५० तास ते ७० तास प्रशिक्षण प्रकारानुसार म्हणजे प्रत्येक दिवशी थोडा वेळ, कधी जास्त वेळ, कधी काहींच नाही, एका दिवशी २-३ तास, अशा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही वेळी आपणास वाचन साहित्य, व्हिडीओ, स्वाध्याय, चाचणी, अभिप्राय यासाठी एकूण द्यावायचे आहेत.

२) E-mail मिळाला नाही.

बऱ्याच प्रशिक्षणार्थींची अशी तक्रार आहे की त्यांना ईमेल प्राप्त झाले नाहीत. ईमेल प्राप्त न होण्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमुख कारणे आहेत.

१) आपला ईमेल आयडी चुकीचा असणे.

२) आपण नोंदवलेला ई-मेल आयडी बरोबर असणे परंतु कुणाचा दुसऱ्याचा असणे.

३) आपणास ईमेल प्राप्त झाला असणे मात्र तो मेसेज ॲप मध्ये स्पॅम मध्ये असणे.

४) आपण आपली नोंदणी रद्द केलेली असणे.

५) आपला ई-मेल आयडी एकापेक्षा अधिक वेळेला प्रणाली मध्ये वापरला गेलेला असणे.

६) आपला ई-मेल आयडी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला असणे.

७) आपण आपल्या ई-मेलची दुरुस्ती दिनांक १ जून २०२२ नंतर केलेली असणे.

ईमेल दुरूस्ती बाबत तक्रार आपण  दि १ जून ते ८ जून दरम्यान केलेली असेल तर त्याबाबत सूचना इन्फोसिस स्प्रिंग बोर्डला दिनांक ८ जून  २०२२ देण्यात आली एक ते दोन दिवसात आपणास त्यासंदर्भात ईमेल प्राप्त होईल.

३) केवळ sample video दिसणे

केवळ Sample Video दिसण्याचे कारण मेल आय. डी. कोणत्याही प्रशिक्षणासाठी नोंदवला गेलेला नाही. लॉगिन आय. डी. आणि पासवर्डचा मेल येण्यापूर्वीच Infosys Springboard App किंवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे. मेल आय. डी अवैध असल्याकारणाने Sample video दिसत आहेत.

उपाय - आपल्याला आपली तक्रार नोंदवावी लागेल.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण सत्र

४) स्वाध्याय (Assignment) सोडवताना अडचणी

सद्यस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थींनी आपल्या प्रशिक्षण प्रकारामधील सर्व मोड्यूल्स सोडवायला सुरुवात करावी तसेच स्वाध्यायामध्ये नमूद स्वाध्याय आपली स्तरावर सोडवून म्हणजेच PDF तयार करणे अथवा व्हिडीओ तयार करून ठेवावेत.

हे सर्व साहित्य अपलोड करणेबाबत

स्वतंत्र सूचना दिल्या जातील व स्वाध्याय अपलोड करण्याकरिता स्वतंत्र लिंक पुरवल्या जातील तरी कृपया पीडीएफ किंवा व्हिडिओ स्वरूपात स्वाध्याय अपलोड करू नये फक्त text  स्वरूपातील स्वाध्याय अपलोड करू शकता.

५) प्रशिक्षण रोज पहावे लागणार का?

हे प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आपणास ३० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता.

तसेच तांत्रिक कारणामुळे, प्रशिक्षणार्थी यांचे ईमेल चुकीचे असल्याने काहींना उशीर झालेला आहे.

यामुळे दिवस वाढवून देण्यात येऊन ४५ दिवसात आपण प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे.Self Paced Training स्व गतीने प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी सदरचे प्रशिक्षण हे दिलेल्या मोड्यूल्स मधील pdf व व्हिडीओ यांचा अभ्यास करून पूर्ण करू शकतो.हे मोड्यूल्स प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीनुसार सोडवू शकतो. म्हणजे एका दिवासात १,२ किंवा आठवड्यामध्ये ५ मोड्यूल्स स्वतःच्या सोयीप्रमाणे.सर्व मोड्यूल्स झाल्यावर चाचणी पूर्ण करणे.

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सूचना 

६) मी पाहिलेल्या साहित्याला ब्लू टिक येत नाही.

सदर अडचण सोडविण्यात आली आहे. यापूर्वी जर आपण व्हिडीओ पूर्ण पाहिलेला असेल आणि ब्लू टिक आली नसेल तर,आलेली दोन टिक वर राईट क्लिक करून mark as completed वर क्लिक करावे.जर आपण व्हिडीओ पूर्ण पाहिलेला असेल तरच हा पर्याय आपणास दिसणार आहे याची नोंद घ्यावी.

७) प्रशिक्षण प्रकार बदलणे

प्रशिक्षणार्थींना https://training:scertmaha.ac.in या संकेतस्थळावर जाऊन आपला प्रशिक्षण प्रकार बदलाबाबतचा पर्याय नोंदवता येईल. यामध्ये दोन प्रकार आहेत.इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर प्रशिक्षण प्रकार दिलेला असल्यानंतर तो बदलण्यासाठी

प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी बदलणे.

तक्रार नोंदविल्यावर डेटा एक ते दोन दिवसात अपडेट होईल.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण

८) प्रशिक्षण कोणत्या क्रमाने करायचे?

प्रशिक्षणातील प्रत्येक घटकामध्ये एक PDF, काही व्हिडीओज आणि एक स्वाध्याय आहे. प्रत्येक घटक याचा क्रमाने केल्यास आपल्याला त्याचा फायदा आपल्याला होईल.मोबाईलवर सदर प्रशिक्षणाचे वाचन साहित्य वाचण्यास त्रास होत असल्यास वाचन साहित्य झूम करून वाचण्याची सोय आहे स्क्रीनवर अधिक (+) चीन्ह दिलेले आहे ,तेथून तुम्ही फॉन्टचा आकार वाढवून वाचू शकता.

खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये वाचन साहित्याचे सार देखील आलेले आहे.

प्रशिक्षणातील वाचन साहित्य हे प्रशिक्षण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. अध्यापक विद्यालय शिक्षक या चार गटांत आणि वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी या प्रत्येकी २ प्रशिक्षण प्रकारांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या सर्व गटांमध्ये काही घटक हे सामायिक आहेत. त्यामुळे त्यांचे PDF आणि व्हिडीओ सामायिक आहेत.

[/lock]

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम