Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सूचना | Senior pay grade and selection grade training instructions

SHARE:

Senior pay grade and selection grade training instructions,प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे,प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे,प्रशिक्षण चाचणी

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सूचना  Senior pay grade and selection grade training instructions

वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सूचना

Senior pay grade and selection grade training instructions

सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये

सदरच्या नोंदणी केलेल्या सर्व शिक्षक /मुख्याध्यापक /प्राध्यापक/प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक खालीलप्रमाणे सुचना सर्व प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावेत.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र | Senior and Selection Category Training Certificate

प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे

  • ·        नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यास https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login ऑनलाईन प्रशिक्षण हे या लिंकवर क्लिक करून सुरु करता येईल.
  • ·        या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थ्यास आवश्यक युजर आय. डी व पासवर्ड प्रशिक्षणार्थ्याने नावनोंदणी करत असताना पुरविलेल्या मेल आय. डी वर मेल प्राप्त होईल. ज्या प्रशिक्षाणार्थ्यांना त्यांनी ईमेल वर सदर तपशील प्राप्त होणार नाहीत, त्यांना https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर तक्रार नोंदविण्याची सुविधा दि. ०३ जून २०२२ नोंदविलेल्या पासून उपलब्ध होईल. अशा प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ देखील वाढवून देण्यात येईल.
  • ·        सदरचे प्रशिक्षण हे प्रशिक्षणार्थ्यास दिनांक १ जुन २०२२ पासून १ जुलै, २०२२ या कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
  • ·        सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरु झाल्यापासून एकूण ३० दिवसांच्या कालावधी मध्येच प्रशिक्षणार्थी याने पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही, याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
  • ·        प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये Infosys Springboard या नावाचे अॅप्लीकेशन प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून सदरच्या अॅपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे अॅप्लीकेशन हे
  • ·        https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard या लिंकवरून देखील प्रशिक्षणार्थी डाऊनलोड करू शकतात.
  • ·        प्राप्त युजर आय. डी. वा पासवर्ड च्या साह्याने प्रशिक्षणार्थी अॅप्लीकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून प्रणाली वर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात.

संगणक/लॅपटॉप वरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठीमार्गदर्शक सूचना PDF

प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे

  • ·        शिक्षकांनी यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी (वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी) प्रशिक्षण असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.
  • ·        तसेच यापूर्वी देखील प्रशिक्षण प्रकार बदल करणेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तरी देखील काही प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा असल्यास परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सुचना

  • ·        सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतांना प्रशिक्षणार्थ्यांना घटकनिहाय वाचनसाहित्य ( ३० मि.), चित्रफिती अभ्यासणे (अंदाजे २ ते ३ तास), चाचणी सोडविणे, स्वाध्याय पूर्ण करणे ( २ तास) तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे.
  • ·        स्वाध्याय अपलोड करत असताना सदर स्वाध्यायावर प्रशिक्षणार्थी यांनी आपले नाव, रजिष्ट्रेशन नंबर, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्यक राहील. प्रशिक्षणार्थी याचे स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस START वर क्लिक करून प्रशिक्षण प्रणालीवर ऑनलाईन स्वाध्याय नोंदवावा. विहितवेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही, याची नोंद सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
  • ·        प्रशिक्षणामध्ये घटकांवर आधारित चाचणी सोडविण्यासाठी देखील विहित वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे विहित वेळेमध्येच सदरची चाचणी संबंधित प्रशिक्षणार्थ्याने पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • ·        तसेच चाचणी ही घटकनिहाय असल्याने एका घटकाची चाचणी सोडविल्यानंतर प्रणाली वर Proceed To Next Section वर क्लिक करावे, कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व घटकांवरील चाचणी सोडवून झाल्यशिवाय Finish Test वर क्लिक करू नये, अन्यथा प्रशिक्षणार्थ्याची चाचणी बंद होऊन प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या प्रशिक्षणाची चाचणी पुन्हा देणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ·        स्वाध्याय व चाचणी सोडविताना घ्यावयाची आवश्यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विषद करण्यात आलेली आहे. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.
  • ·        सर्व मोड्यूल्सनिहाय (घटकनिहाय) चाचण्या मिळून एकूण ४०% गुण प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील; तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड साठी उपलब्ध होणार आहे.
  • ·        प्रशिक्षणार्थी यांनी प्रणालीवर व्यतीत केलेला वेळ व प्रशिक्षण कार्यक्रमाची वेळ (एकूण कालावधी), पाहिलेले व वाचलेले अध्ययन साहित्य, पूर्ण केलेले स्वाध्याय, चाचणी मधील प्राप्त गुण, इत्यादी या सर्वांचे मूल्यमापन केले जाणार आहे व त्यानंतरच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था प्रणालीमध्ये करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. प्रशिक्षाणार्थ्यांचे स्वाध्याय हे प्रकाशित केले जाऊ शकतात याची नोंद घ्यावी.

 मोबाईलवरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीसाठी मार्गदर्शक सूचना PDF

प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाचे

  • ·        प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली मध्येच उपरोक्त बाबी पूर्ण केल्यावरच डाउनलोड करता येणार आहे याची नोंद घेण्यात यावी.
  • ·        सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईल मध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये (मराठी / इंग्रजी ) असेल तसेच व तेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे
  • ·        याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठी मध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपल्या प्रोफाईल मधील नाव हे FIRST NAME या ठिकाणी आपले अचूक पूर्ण नाव मराठी मध्येच नोंदवावे तसेच Last Name मध्ये उपलब्ध असणारा क्रमांक हा प्रशिक्षणार्थ्याचा नोंदणी क्रमांक असणार आहे. सदरच्या नोंदणी क्रमांकामध्ये प्रशिक्षणार्थ्याने कोणताही बदल करू नये याची नोंद घ्यावी.
Fast Update Join Links
Next Update Group Telegram Join link
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Update Telegram Join link

प्रशिक्षणा बाबत महत्वाच्या सुचना

  • ·        सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाऊनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी
  • ·        https://youtube.com/playlist?list=PLFJ76Y6VBMZq4ZE$HdEKUVBCdczbqZ98h या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडीओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. (मोबाईल SOP, Desktop SOP)
  • ·        तसेच आपणास प्राप्त ई मेल मध्ये देखील सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठीच्या मार्गदर्शनपर व्हिडीओच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
  • ·        कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी / स्वाध्यायाशी संबंधित व्हिडीओ, PDF आपल्या ब्लॉग किंवा युट्युब चॅनेल वर अथवा इतर समाज माध्यमांवर ( Whats APP, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, ट्वीटर, वेबसाईट, इत्यादी) प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती कारवाईस पात्र राहील याची माहिती सर्व प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी.
  • ·        सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सुचना व महत्वपूर्ण बाबी या सर्व केवळ https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील.
  • ·        सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक / प्राचार्य हे वरिष्ठ वेतन / निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही ; याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
  • ·        प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दैनिक ( दि.०२ जून ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत) सकाळी ११.०० ते ते १२.०० या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मिटिंग चा आय.डी. व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रमांकावर दूरध्वनी करू नये अथवा ईमेल करू नयेत.
  • ·        तसेच प्रशिक्षणाबाबतीतील काही शंका अथवा प्रशिक्षण प्रकार बदल, ईमेल बदल अथवा इतर अनुषंगिक बदल याबाबत आवश्यक तक्रार निवारणासाठी आवश्यक फॉर्म व सूचना https://training.scertmaha.ac.in/ या परिषदेच्या संकेतस्थळावर दि.०३ जून २०२२ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • ·        ज्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अध्यापक विद्यालयातील अध्यापक यांनी सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली नाही त्यांना सदर प्रशिक्षणासाठी नव्याने नावनोंदणीबाबत या कार्यालयामार्फत लवकरच सूचना निर्गमित करण्यात येतील.

दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील

Join Zoom Meeting

https://zoom.us/j/95215685289?pwd=TjdKbW9FTXNtUWxmdjBENGQ1NmFkQT09 

Meeting ID: 95215685289

Passcode: SCERT

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,137,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,369,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,626,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,524,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,779,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,512,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सूचना | Senior pay grade and selection grade training instructions
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सूचना | Senior pay grade and selection grade training instructions
Senior pay grade and selection grade training instructions,प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे,प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्वाचे,प्रशिक्षण चाचणी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhn0FtGv2pfmBXJ4VXaYlWA4G8cHLJrB84d_Mk5zL_AOqI55qXz6iNfSFUYV2KBJxIc0eQdEiz7fl2FA_v-HR-AnlDgW4sY6Wx-WAnZWIvLycFb8FxWis_fJJ8vd2yGpYxtnIDQatjA73-A09RGD6jFst1l3CPImlwb2lGih3kje6FnDhkTWm9Kw6Wa/s16000/Training%20Instructions.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhn0FtGv2pfmBXJ4VXaYlWA4G8cHLJrB84d_Mk5zL_AOqI55qXz6iNfSFUYV2KBJxIc0eQdEiz7fl2FA_v-HR-AnlDgW4sY6Wx-WAnZWIvLycFb8FxWis_fJJ8vd2yGpYxtnIDQatjA73-A09RGD6jFst1l3CPImlwb2lGih3kje6FnDhkTWm9Kw6Wa/s72-c/Training%20Instructions.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2022/06/Senior-pay-grade-selection-grade-training-instructions.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2022/06/Senior-pay-grade-selection-grade-training-instructions.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS