इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जिज्ञासा हा भारताचा समृद्ध व प्रा
जिज्ञासा प्रश्नमंजुषा आयोजन | Curiosity quiz organized
जिज्ञासा : आझादी का अमृत महोत्सव क्विझ ; भारताला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या
निमित्ताने आझादी का अमृत महोत्सव हा महत्वकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. याच
उपक्रमाचा एक भाग म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पेट्रोलियम, नैसर्गिक
वायू मंत्रालय आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या
संयुक्त विद्यमाने जिज्ञासा हा भारताचा समृद्ध व प्राचीन वारसा यावर आधारित
प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
जिज्ञासा हा भारत सरकारने आयोजित केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम, सर्वसमावेशक शिक्षण याद्वारे ज्ञानाची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी व त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिज्ञासा उपक्रम हे एक पुढचे पाऊल आहे. जिज्ञासा सर्वसमावेशक उपक्रम आहे. जिज्ञासा या उपक्रमात जागतिक सहभागाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थी, शिक्षणाच्या मूळ प्रवाहात नसलेले विद्यार्थी या सर्वांना जिज्ञासा प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी होण्याची संधी आहे.
जिज्ञासा प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिज्ञासा प्रश्नमंजुषा कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना
पुढीलप्रमाणे :
१. जिज्ञासा प्रश्नमंजुषा कार्यक्रम १७ भाषांमध्ये उपलब्ध
आहे.
२. १३-१८ वर्षे वयोगटातील इयत्ता ६ वी ते १२ वी चे
विद्यार्थी जिज्ञासा प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.
३. सदर प्रश्नमंजुषा स्पर्धा पूर्व पात्रता फेरी, जिल्हा
फेरी, राज्य फेरी, विभाग फेरी, राष्ट्रीय फेरी या विविध स्तरांवर आयोजित केली जाणार आहे.
४. या अंतर्गत विजयी संघाचे सदस्य प्रत्येकी १० लाख रुपये
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकतात. एकूण ५५ लाख रुपयापर्यंतच्या विविध शिष्यवृत्ती
यांचे वाटप या अंतर्गत केले जाणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या
प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
५. जिज्ञासा प्रश्नमंजुषा या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी
पार पाडल्यानंतर सदर स्पर्धेच्या पुढील फेऱ्या ऑफलाईन मोडमध्ये घेण्यात येणार आहे.
६. जिज्ञासा प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम राष्ट्रीय
स्तरावरची फेरी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.
७. सदर जिज्ञासा प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी https://www.akamquiz.com/login
या संकेतस्थळावरून इच्छुक स्पर्धकांना लॉगिन करून सहभागी होता येईल.
8.नोंदणी करण्यासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मुदत आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS