शिक्षकांना profile update करण्याची सुविधा,बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेट कशी कराल? How to update profile on Teacher transfer management system?
बदली पोर्टलवर प्रोफाईल अपडेट कशी कराल?
How to update profile on Teacher transfer management
system?
प्रोफाईल अपडेट करताना कोणतीही घाई न करता सर्व शंका दूर झाल्यावरच प्रोफाईल अपडेटला सुरुवात करा.शिक्षकांना Profile Update करण्याची सुविधा दिनांक 13-6-2022 पासून ते दिनांक 20-6-2022 पर्यंत आहे.
- ऑनलाईन शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणाली वेळापत्रक
- ·
अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध करणे: ०९ ते १२ जून, २०२२
- ·
शिक्षकांनी माहिती अद्ययावत आणि सबमिट
करणे: १३जून ते २० जून, २०२२.
- ·
गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रोफाइल
तपासणे: १३ ते २२ जून, २०२२
- ·
शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे अपील
करणे: १४ ते २४ जून, २०२२
- ·
शिक्षण अधिकाऱ्यांनी अपील तपासणे: १४ ते २६ जून, २०२२
- ·
शिक्षकांनी प्रोफाइल स्वीकारणे: १४ ते २८ जून, २०२२
- ·
गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सक्तीची स्वीकृती
करणे: २९ जून ते ०१ जुलै, २०२२
- · शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे: २४ जून ते ०३ जुलै
- · CEO सार्वजनिक आक्षेपांची सुनावणी करणे: ०४ आणि ०५ जुलै
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
- ·
https://ott.mahardd.in/ या लिंकवरुन आपण
मोबाईल किंवा Computer/Laptop यावर लॉगिन करू शकतो. लिंक ओपन
केल्यावर ओपन होणाऱ्या पोर्टलवर वरच्या बाजूला इंग्रजी व मराठी अशा दोन भाषा
दिलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला हवी ती भाषा निवडा. लक्षात घ्या की मराठी भाषा
निवडली तर सर्व माहिती मराठीतून दिसेल. मात्र आपण मराठी जरी निवडली तरी या
पोर्टलवरील सर्व काम इंग्रजीतून करायचे आहे.दुसरी गोष्ट लॉगिन करताना इंग्रजी भाषा
असली तरीही लॉगिन झाल्यावर सुद्धा भाषा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.शक्यतो मराठी
भाषा निवडा. माहिती पटकन समजण्यासाठी मदत होते.
- ·
लिंक मोबाईल मध्ये ओपन केल्यावर किंवा Computer मधील गुगल क्रोम ब्राउझर मध्ये टाकल्यावर ओपन होणाऱ्या पेजवर सर्वप्रथम
आपला मोबाईल क्रमांक टाकावा. मोबाईल क्रमांक जर चुकीचा म्हणजे आपण अगोदर रजिस्टर
केला आहे तो टाकला नाही तर खाली लाल रंगात No Such User Exists असा मेसेज येतो किंवा काहींच्या बाबतीत बाहेर फेकले जाते.म्हणून आपला
योग्य नंबर त्या ठिकाणी टाकावा.
- ·
आपला मोबाईल टाकून झाल्यावर त्या खाली
"Send
OTP" किंवा मराठीतून "ओटीपी पाठवा" या शब्दावर टच
केल्यावरच आपल्याला OTP पाठवला जातो. OTP म्हणजे एकप्रकारे आपला One Time Password च आहे हे
लक्षात असू द्या. ओटीपीचा कालावधी सुमारे 10 मिनिटे असतो
त्यामुळे ओटीपी येण्याची वाट बघा. काही मित्र ओटीपी लवकर आला नाही तर अनेकदा 'Resend
OTP" किंवा "पुन्हा पाठवा" यावर बऱ्याच वेळा टच
करतात त्यामुळे अनेक ओटीपी येतात आणि कोणता ओटीपी टाकावा याचा प्रॉब्लेम होऊन
लॉगिन करताना प्रचंड मनस्ताप होतो. म्हणून ओटीपीची थोडा वेळ प्रतिक्षा करा. ओटीपी
आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर SMS द्वारे येतो. कधीकधी
ओटीपी मोबाईलवर लवकर येत नाही. जर ओटीपी SMS लवकर आला नाही
तर दुसरा पर्याय आपल्या मोबाईल मधील Gmail ओपन करा.
त्याठिकाणी inbox मध्ये ओटीपी आला असणार. तो कॉपी करुन
आपल्या लॉगिन पेजवर पेस्ट करा किंवा टाईप केला तरी चालतो.
- · याठिकाणी लक्षात घ्या की योग्य ओटीपी टाकल्यावर खाली कॅप्चा म्हणजे इंग्रजी अक्षरे व अंक दिलेले असतात ते बॉक्समध्ये योग्य रितीने लहान मोठी अक्षरे व्यवस्थित बघून टाईप करून घ्या. अक्षरे चुकले तरीही प्रॉब्लेम होतो म्हणून काळजीपूर्वक टाईप करावे. सर्व व्यवस्थित झाले तरच खालील लॉगिन बटन "निळ्या रंगाचे" होते. आता त्या निळ्या रंगाच्या बटनावर टच केले की आपले लॉगिन सक्सेसफुली झाल्याचे पाहायला मिळेल.
- ·
Successfully Login केल्यावर ओपन होणाऱ्या
पेजवर आपण इंग्रजी भाषा निवडलेली असेल तर CURRENT STAGE: TEACHER DATA UPDATE
असे मोठ्या अक्षरात दिसेल. आणि जर मराठी भाषा निवडलेली असेल तर
"सध्याची स्थिती:शिक्षकाची माहिती अद्ययावत होत आहे" असे दिसून येईल.
- ·
मोबाईलवरून ओपन केले असेल तर डावीकडे
वरच्या कोपर्यात आडव्या तीन रेघा दिसतात. त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी
दिसतील त्याचे स्पष्टीकरण आपल्याला नंतरच्या पोस्टमध्ये देणार आहोत. त्यापैकी
आपल्याला सध्या Profile (प्रोफाईल) वर टच करायचे आहे.Profile
मध्ये दोन भाग आहेत.1.Personal details व 2.Employment
details.प्रोफाईलवर टच केल्यावर आपल्याला सर्वप्रथम Personal
Details (वैयक्तिक माहिती) हे पेज दिसते. यामध्ये आपल्याला कोणताही
बदल करता येत नाही आणि गरजही नाही कारण ही माहिती बरोबर असल्याची खात्री आपण
अगोदरच केलेली आहे.
आता खाली उजव्या कोपर्यात NEXT(पुढे जा)
बटनावर टच करायचे आहे. त्यावर टच केल्यावर आपल्याला Employment Details (नोकरीची माहिती) हे आपल्या प्रोफाईलचे दुसरे पेज दिसत आहे. आपल्याला याच
पेजवर काम करायचे आहे हे लक्षात असू द्या.आता खाली दिसत असणाऱ्या एक एक
मुद्द्यांची माहिती कशी भरावी किंवा अपडेट करावी ते आपण बघूया.
शिक्षक बदलीसाठी ऑनलाईन पोर्टल प्रणाली Videos
मुद्दा क्रमांक 1. Date of Appointment in Zp - ही तारीख All ready तिथे आहे पण ती तारीख नेमकी
कोणती याची माहिती पुढीलप्रमाणे - ही तारीख म्हणजेच आपला सलगसेवा दिनांक आहे हे
लक्षात घ्या.
यामध्ये शिक्षकांनी आपण जिल्हा परिषदेच्या सेवेत ज्या
तारखेला हजर झालो आहे ती तारीख बरोबर आहे की नाही याची खात्री करून
घ्यावी.(आंतरजिल्हा बदलीने सध्याच्या जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी आपली
पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या सेवेत हजर झालेली तारीख आहे की नाही याची खात्री
करावी.) ही तारीख बरोबर असेल तर त्यामुद्द्यावर काहीही काम करायची गरज नाही. पण जर
ही तारीख योग्य नसेल(चुकलेली असेल) तर या मुद्द्याच्या समोर दिसणाऱ्या टिकमार्कवर ✅ टच करा. टच केल्यावर त्याखाली स्वतंत्र
नवीन बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये टच केले की आपल्याला कॅलेंडर ओपन होईल त्यामध्ये
वर महिना आणि वर्ष दिसेल त्यावर टच करा व त्यामधून योग्य ते वर्ष, महिना
व तारीख निवडा.इथे आपले या मुद्द्याचे काम पूर्ण झाले.
मुद्दा क्रमांक 2. Cast category (जात
प्रवर्ग) - हा पण तिथे उपलब्ध आहे.जर बरोबर नसेल तर समोरच्या ✅ वर टच करा. खाली नवीन बॉक्स बदल करण्यासाठी
येईल. त्यामध्ये सुधारित जात प्रवर्ग शेवटी दिसणाऱ्या बाणावर टच करून निवडा. (Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.)
मुद्दा क्रमांक 3. Appointment category (नियुक्ती प्रवर्ग) तिथे आहेच. तो जर योग्य नसेल तर समोरच्या ✅ वर टच करा. खाली नवीन बॉक्समध्ये शेवटी
- ड्रॉप डाउन लिस्ट मधून योग्य तो प्रवर्ग सिलेक्ट करावा.
मुद्दा क्रमांक 4. Current district joining date (सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्य़ात रूजू झाल्याची तारीख) - ही पण तारीख
तिथे आहे. तिचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे - आपण सध्याच्या जिल्ह्य़ात ज्या तारखेला
सेवेत हजर झालो आहे ती तारीख आहे की नाही याची खात्री करावी. (आंतरजिल्हा बदली
शिक्षकांनी सध्याच्या जिल्ह्यात हजर झाल्याची तारीख टाकावी.) जर तारखेचा बदल असेल
तर मुद्दा क्रमांक एक प्रमाणे तारीख बदलण्याची कार्यवाही करावी.
मुद्दा क्रमांक 5. Udise code of current School(सध्या
कार्यरत असणाऱ्या शाळेचा युडायस नंबर) - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर
बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. बदल असल्यास समोरच्या ✅ टच करून करावा.
मुद्दा क्रमांक 6. Current School joining date(सध्याच्या शाळेतील हजर तारीख) - ही तारीख मात्र तिथे दिसणार नाही ती
आपल्याला भरायची आहे. त्यासाठी या मुद्द्याच्या समोर दिसणाऱ्या टिकमार्कवर ✅ टच करा. टच केल्यावर त्याखाली
स्वतंत्र नवीन बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये टच केले की आपल्याला कॅलेंडर ओपन होईल
त्यामध्ये वर महिना आणि वर्ष दिसेल त्यावर टच करा व त्यामधून योग्य ते वर्ष, महिना
व तारीख निवडा.
मुद्दा क्रमांक 7. Current teacher type(सध्याचा शिक्षक प्रकार) - हाही तिथे उपलब्ध आहे. जर बदल असल्यास समोरच्या ✅ वर टच करा. HM/ Graduate / under
graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.
मुद्दा क्रमांक 8. Teaching subtype(शिक्षक
उपप्रकार) - जर उपाध्यापक असाल तर NA ठेवा. पदवीधर असाल
तर त्यांनी भाषा/ गणित -विज्ञान
/समाजशास्त्र यापैकी एक आपल्यापदवीधर शिक्षक नियुक्ती पत्रात नमूद असलेला विषय
सिलेक्ट करावा.
मुद्दा क्रमांक 9. Teaching Medium (शिकवण्याचे
माध्यम) - यामध्ये आपल्या शाळेचे योग्य ते माध्यम (Marathi/ Urdu) असल्याची खात्री करा. बदल असल्यास योग्य तो बदल करा.
मुद्दा क्रमांक 10. Last Transfer Category (शेवटचा बदली प्रवर्ग) - हा तिथे उपलब्ध नाही तो आपल्याला भरायचा
आहे.समोरच्या ✅ वर टच करून
खालील बॉक्समध्ये टच केले की तुम्हाला
· Cadre-1(संवर्ग 1)
· Cadre - 2(संवर्ग 2)
· Entitled - बदली अधिकारप्राप्त)
· Eligible - बदलीपात्र संवर्ग 4
· NA
हे पर्याय दिसतील.
यामध्ये आपण काय निवडावे ते खालीलप्रमाणे बघा.
27 फेब्रुवारी 2017 च्या शासन
निर्णयानुसार आपली अॉनलाईन जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा अॉनलाईन बदली झालेली
असेल त्यांनी Cadre 1, Cadre 2, Entitled, Eligible यापैकीच
एक आपल्याला लागू होणारा मुद्दा निवडावा.
ज्यांची आजतागायत कधीच बदली झालेली नाही, तसेच
ज्यांची 2017 चा जी आर येण्यापूर्वी अॉफलाईन बदली झालेली
असेल, प्रमोशन किंवा इतर कोणत्याही कारणाने शाळा बदल झालेला
असेल त्यांनी NA पर्याय निवडा.
मुद्दा क्रमांक 11. Last Transfer Type(शेवटचा
बदली प्रकार) - हाही आपल्याला भरायचा आहे. यामध्ये समोरच्या ✅ वर टच करा. खाली येणाऱ्या बॉक्समध्ये
टच केल्यावर आपल्याला.
1. Inter District (आंतरजिल्हा बदली)
2. Intra District (जिल्हातंर्गत बदली)
3. NA-(लागू नाही)
यापैकी जो योग्य पर्याय आपणास लागू असेल तर तो पर्याय
निवडावा.
मुद्दा क्रमांक 12. Have You Work Continuously In
Non Difficult Area(मागील 10 वर्षात तुम्ही
सर्वसाधारण क्षेत्रात सलग काम केले आहे?) जर तुमची एकूण सेवा
10 वर्षापेक्षा जास्त आणि सध्याच्या शाळेत 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झाली असेल अशाच शिक्षकांना हा मुद्दा भरण्यासाठी
ओपन होईल हे लक्षात असू द्या.सध्याच्या शाळेत 5 वर्षापेक्षा
कमी सेवा असणाऱ्यांना हा मुद्दा ओपन होणार नाही. यामध्ये Yes/No यापैकी तुम्हाला लागू होईल तो मुद्दा निवडा.
मुद्दा क्रमांक 13. Have you been suspended in
last10 years?आपण मागील 10 वर्षात निलंबित
झाले असल्यास Yes नमूद करावे, नसेल तर NO
आहे तसेच ठेवावे.
सर्व माहिती भरून झाल्यावर खालील डाव्या कोपर्यात Save बटणावर टच करा. जर सर्व रकाने भरले गेले याची खात्री झाल्यावर खालील
उजव्या कोपर्यातील Next (पुढे जा) बटनावर टच करा. आता
आपल्याला Profile Preview (प्रोफाईल पूर्वावलोकन) दिसेल.
त्यामध्ये आपण बदल केलेला सर्व डाटा दिसेल तो काळजीपूर्वक तपासा. सोबतच वरच्या
बाजूला उजव्या कोपर्यात खालील दिशेला टोक असलेला बाण दिसेल त्यावर टच केले की
आपल्याला आपण भरलेल्या माहितीची pdf डाऊनलोड होईल. तिची प्रिंट
काढून पण खात्री करता येईल. डाटा योग्य भरल्याची खात्री केल्यावर आता खाली Submit
बटन आहे त्यावर टच करा. आता तुमची माहिती Verify करण्यासाठी BEO Login ला गेली आहे. याठिकाणी
प्रोफाईल अपडेटचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे.
BEO नी प्रोफाईल Verify केल्यावर ते
पुन्हा शिक्षकांकडे Accept करण्यासाठी पाठवतील.शिक्षकांनी
प्रोफाईल Accept केल्यावर प्रोफाईल अपडेटचे काम पूर्ण होईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS