राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड २०२२ साठी नामांकने पाठविणे Sending nominations for National Yoga Olympiad 2022,प्रत्येक गटातून योगासने, प्राणायाम, क्रिया, ध
राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड २०२२ साठी नामांकने पाठविणे
Sending nominations for National Yoga Olympiad 2022
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी
दिल्ली यांच्या वतीने दि. १८ ते २० जून, २०२२ या कालावधीत
राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड आयोजित करण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय योगा
ऑलिम्पियाडसाठी प्रत्येक राज्यातून उत्कृष्ट असे उच्च प्राथमिक व माध्यमिक
स्तरावरील प्रत्येकी ४ मुले, ४ मुली व सोबत असणा-या २
शिक्षकांचे ( पैकी १ शिक्षिका) नामांकन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
प्रत्येक गटातून योगासने, प्राणायाम, क्रिया, ध्यान व बंध या पाच प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नामांकन करावयाचे आहे. उपस्थित राहणा-या विद्यार्थी व शिक्षक यांना NCERT, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार निवास व भोजन व्यवस्था आणि प्रवास भत्ता अनुज्ञेय असणार आहे.
शासकीय/खाजगी अनुदानित शाळांमधील उच्च प्राथमिक (इ. ६ ते ८)
व माध्यमिक(९ वी, १० वी) मधील ४ मुले व ४ मुली यांची निवड
करून खालील लिंकवर त्यांची माहिती भरण्यात यावी. राज्य समितीमार्फत उत्तम
विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची नामांकने NCERT, नवी
दिल्ली यांना कळविण्यात येतील. तदनुषंगाने उपरोक्त प्रकारानुसार विद्यार्थ्यांचे Video
तयार करून ते सामाजिक शास्त्रे व कला क्रीडा विभागामार्फत तयार
करण्यात आलेल्या खालील फॉर्मवर भरावी. तसेच विद्यार्थी व सोबत येणा-या शिक्षकांची
माहिती दि. ०३ जून, २०२२ पर्यंत विनाविलंब पाठवून देण्यात
यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS