राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे सुधारीत निकष | क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने सदर योजना Revised Criteria for St
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे सुधारीत निकष | क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने सदर योजना
Revised Criteria for State Ideal Teacher Award | Krantijyoti Savitrimai Phule State Teacher Gunagaurav Award
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित
वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित
वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण क्रीडा विभागातर्फे राज्य
आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव पात्र
शिक्षकांकडून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य, पुणे
यांचेकडून ऑनलाईन मागविण्यात येतात. अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना /
निकषांनुसार जिल्हा स्तरावर जिल्हा निवड समिती प्रस्तावांची छाननी करुन प्रवर्ग
निहाय पात्र प्रस्ताव शिक्षण संचालक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्य निवड
समितीकडे पाठविते. सद शिफारशींवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून
राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात.
पुरस्कार सर्वसाधारणपणे १५ ऑगस्ट रोजी जाहीर करुन त्याचे प्रत्यक्ष वितरण ५
सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिनांकाला सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते करण्यात
येते. संदर्भाधीन क्र.१ येथील शासन परिपत्रक दिनांक २१ जुलै २०१६ अन्वये राज्य
आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारीत करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये
सुधारणा करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव
पुरस्कार या नावाने राबविणेची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत संदर्भाधीन
पत्र क्र. २ दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ अन्वये शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च
माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्रस्ताव
प्राप्त झाला आहे.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमा फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अटी व निकष पुढीलप्रमाणे राहतील.
“क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार" प्रस्तावासाठी आवश्यक अटी
- १) शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
- २) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
- ३) शिक्षक / मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक.
- ४) शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
- ५) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
- ६) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.
- ७) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
- ८) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS