पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 (Bridge Course 2022-2023),सेतु अभ्यास ॲप,सेतु अभ्यास,सेतु अभ्यासक्रम,सेतु अभ्यास ॲप,सेतु setu abhyas
सेतु अभ्यास २०२२-२३ | Bridge course 2022-23
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण
क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि
विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे
राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित
सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तयार करण्यात आलेला सेतू अभ्यास (bridge course) खाली इयत्ता आणि विषयानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व
विद्यार्थी आणि शिक्षक यांनी त्याचा योग्य वापर करावा.
पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी
पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी
- १. सदर सेतू अभ्यास (bridge course) सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व
विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक
यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
- २. सदर सेतू अभ्यास (bridge course)ला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी
घेण्यात यावी. उत्तरपत्रिका
तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी
स्वत:कडे ठेवाव्यात.
- ३. मागील इयत्तांच्या
महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३०
दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने
करण्यात यावी.
- ४. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून
घ्याव्यात.
- ५. शिक्षकांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे
अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
- ६. सदर सेतू अभ्यास (bridge course) पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी.
उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
- ७. सदर सेतू अभ्यास (bridge course) पूर्ण
झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया
सुरु करण्यात यावी.
- ८. शालेय स्तरावर
पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय १५
दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा.
विषय ( इ.२ री ते १० वी ) | डाऊनलोड लिंक |
---|---|
मराठी | डाऊनलोड PDF |
गणित | डाऊनलोड PDF |
इंग्रजी | डाऊनलोड PDF |
विज्ञान | डाऊनलोड PDF |
सामाजिक शास्त्रे | डाऊनलोड PDF |
सेमी | डाऊनलोड PDF |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS