⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ.११ वी सन २०२२-२३ मधील प्रवेशांसाठी नियमित फेरी १ | 11th round for admission in year 2022-23

इ.११ वी सन २०२२-२३ मधील प्रवेशांसाठी नियमित फेरी १  11th round for admission in year 2022-23

इ.११ वी सन २०२२-२३ मधील प्रवेशांसाठी नियमित फेरी १

11th round for admission in year 2022-23

सन. २०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरीचिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रवेशासाठी अर्जाचा भाग-२ भरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

सीबीएसई मंडळाचा इ.१० वी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. सबब सदर विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भाग-१ व भाग-२ दोन्ही भरण्याची सुविधा सुरु ठेवण्यात आलेली आहे. यासोबत नियमित प्रवेश फेरी क्र.१ चे वेळापत्रक देण्यात येत आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.

नियमित फेरी-१ साठी पसंती नोंदविणे (भाग-२) व इतर पूर्वतयारी सुरु असतांना (शून्य फेरी) कोटांतर्गत प्रवेश करण्याची सुविधा पोर्टलवर देण्यात आलेली आहे. तपशीलवार वेळापत्रक सोबत संलग्न आहे. त्यानुसार नियमित फेरी १ पूर्वी तसेच नियमित फेरी-१ सोबत कोटांतर्गत प्रवेश करता येतील. कोटांतर्गत प्रवेशाबाबत आवश्यक कार्यवाही विद्यालयांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करावी. कोटांतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करण्याची सुविधाही उक्त कालावधीत उपलब्ध असेल.

ही प्रवेशाची प्रथम फेरी असल्याने त्यापूर्वी अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले गुण व माहिती तपासावी आणि आक्षेप असल्यास विद्यार्थी लॉगीन मधून ग्रीव्हन्स च्या मध्यमातून आपले आक्षेप नोंदवावयाचे आहेत. सदर आक्षेपांना त्या-त्या वेळी उत्तरे देऊन आवश्यकतेनुसार दुरुस्ती शिउसं स्तरावरुन करावयाची आहे. सदर कार्यवाहीसाठी वेळापत्रकामध्ये स्वतंत्र वेळ देण्यात आलेली आहे त्या वेळेच्या मर्यादेत ही कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना इ. ११वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे, त्यांचा पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे.

वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही विहित वेळेत पूर्ण केली जाईल याची दक्षता घ्यावी. त्यापुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

 सुधारणा नोंद -

दिनांक 25.07.2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमित फेरी-1 चे वेळापत्रकासोबत पुढील फेऱ्यांसाठी संभाव्य कालावधी देण्यात आलेला  आहे. त्यामध्ये नियमित फेरी-3 चे समोर दर्शवण्यात आलेली दिनांक.

35-08-2022 ऐवजी

25-08-2022 अशी वाचावी.

-शिक्षण संचालक, पुणे

11th admission pune,11th admission pune 2022-23,11th admission pune 2020-21,11th admission pune latest news,11th admission pune college cut off,11th admission pune 4th merit list,11th admission pune 2021-22 date,11th online admission pune 2020-21,11th admission pune,11th admissionइ.११ वी सन २०२२-२३ मधील प्रवेशांसाठी नियमित फेरी १ | 11th round for admission in year 2022-23
11th admission pune,11th admission pune 2022-23,11th admission pune 2020-21,11th admission pune latest news,11th admission pune college cut off,11th admission pune 4th merit list,11th admission pune 2021-22 date,11th online admission pune 2020-21,11th admission pune,11th admission,इ.११ वी सन २०२२-२३ मधील प्रवेशांसाठी नियमित फेरी १ | 11th round for admission in year 2022-23

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम