SSC आणि HSC परीक्षेसाठी 17 नंबर अर्जाची सुरुवात | 17 Number Application Start for SSC and HSC Exam
SSC आणि HSC परीक्षेसाठी 17 नंबर अर्जाची सुरुवात
17 Number Application Start for SSC and HSC Exam
फेब्रुवारी - मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेस
खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७)
ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरण्यासंदर्भातील माहिती मंडळाने प्रसिद्ध केलेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ. १२ वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस
प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी अर्ज सुरु
त्यानुसार फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये
होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं. १७) प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरुन
घेण्यात येणार असून त्यासाठी खाली नमूद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची
आहे.
इ. १०वी व इ. १२वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन
स्विकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
खाजगी विद्यार्थ्यांनी इ.१० वी व इ. १२ वी साठी नाव नोंदणी
अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला
जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील
वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी /
इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
संकेतस्थळ-
- इ.१० वी - http://form17.mh-ssc.ac.in
- इ. १२ वी - http://form17.mh-hsc.ac.in
विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता कागदपत्रे
१) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास
व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र
२) आधारकार्ड
३) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो
ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड
करावयाची आहेत.
विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील
संपर्कासाठी अनिवार्य (compulsory) आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर
भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर
पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज,
ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन
छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा / कनिष्ठ
महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS