जुलै-ऑगस्ट २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध
१२ वी पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध | Hall Ticket for 12th supplementary examination available
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे
मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी
व पालक आदींना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२२ साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व
विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध
करून देण्यात येत आहेत.
जुलै-ऑगस्ट २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना
जुलै-ऑगस्ट २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे
(Hall
Ticket ) ऑनलाईन (Online ) पध्दतीने मंडळाच्या
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शनिवार दिनांक
०९/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून college login मध्ये
download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही
तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय
मंडळाकडे संपर्क साधावा.
Fast Update | Link |
---|---|
Next Update Group (Whats app) | WA Join Group |
Next Update Group(Telegram) | Telegram Join link |
Next Update Group (Facebook) | Facebook Group Join link |
१२ वी पुरवणी परीक्षेचे परिपत्रक | परिपत्रक डाऊनलोड |
- ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून
घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, जुलै-ऑगस्ट
२०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ
महाविद्यालयांनी इ. १२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून
विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
- प्रवेशपत्र (Hall Ticket ) ऑनलाईन ( Online
) पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही
वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा /
प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
- प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket ) विषय व
माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ
महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
- प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
- प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च
माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने
व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र
द्यावयाचे आहे.
- फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS