धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना सन २०२२-२३ Pre-Matric Scholarship
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती योजना व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना सन २०२२-२३
Pre-Matric Scholarship Scheme for Religious Minority Students and Begum Hazrat Mahal National Scholarship Scheme 2022-23
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा.
पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली
आहे. ही योजना दि. २३ जुलै, २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९
पासून राज्यात राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या इ. १ ली ते १० वी च्या धार्मिक अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांसाठी आहे.
अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुलींसाठी बेगम हजरत महल
राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही योजना पूर्वी अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद
राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणून ओळखली जात होती आणि ती ०३.०५.२००३ रोजी विज्ञान भवन, नवी
दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या परिषदेत
भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरु केली होती. सदर योजना
अल्पसंख्याक (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख,
बौध्द, पारसी व जैन) समाजातील इयत्ता ९वी ते
१२वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे. इयत्ता ९वी व इयत्ता १०वी च्या मुलींना वार्षिक
रुपये ५,०००/- व ११वी व १२वीच्या मुलींसाठी वार्षिक ६,००० /- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या
विद्याथी / विद्यार्थीनींचे जास्तीत जास्त अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर
भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच
कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत.
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सन २०२२-२३ साठी नवीन व
नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
योजना नवीन विद्यार्थीनींचे अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP 2.0 या पोर्टलवर दि. २०/०७/२०२२ पासून सुरू करण्यात आलेली आहे. नवीन व
नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३०/०९/२०२२ पर्यंत
आहे
वेळापत्रक
सन २०२२-२३ या वर्षासाठी सर्व इच्छुक तसेच मागील वर्षीच्या
लाभार्थी विद्याथी / विद्यार्थीनींनी केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in
(NSP 2.0 Portal) या संकेतस्थळावर आपले अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने
भरावयाचे आहेत. सन २०२१-२२ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक
विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशाच
विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Renewal student म्हणून भरावयाचे
आहेत. ( नुतनीकरण विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे.) तसेच
पात्र नवीन इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh student म्हणून
भरावयाचे आहेत.
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे तसेच बेगम हजरत महल राष्ट्रीय
शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थी / विद्यार्थीनींच्या खात्यावर होत असल्याने विद्याथी
/ विद्यार्थीनींचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी
नोंदणी केलेली पावती (Enrollment ID) किंवा बँक पासबुक (छाया
चित्रासह) किंवा रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ाळेच्या
मुख्याध्यापकांनी साक्षांकित केलेले फोटो सहीत असलेले विद्याथी / विद्यार्थीनींना
ओळख प्रमाणपत्रची सत्य प्रत शाळेत सादर करणे बंधनकारक आहे.
मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
● पात्रतेचे निकष -
१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित /
विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता १ली ते १०वी मध्ये शिकणारे /
शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनी.
२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे
आवश्यक आहे. (ही अट इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही.)
३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे.
(सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.)
४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या
शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती
विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे.
७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.
● आवश्यक कागदपत्रे /
प्रमाणपत्रे
१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे
बोनाफाईड प्रमाणपत्र.
२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक. ( इयत्ता १ली तील
विद्यार्थ्यांसाठी ही अट लागू नाही )
३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र.
५. रहिवासाचा पुरावा.
६. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची
प्रत.
७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.
८. आधारकार्ड.
बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठीचे पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
● पात्रतेचे निकष -
१. शासनमान्यता प्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित/
विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता ९वी ते १२वी मध्ये शिकणा-या
अल्पसंख्यांक समाजातील पात्र विद्यार्थीनी.
२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्केपेक्षा अधिक गुण असणे
आवश्यक आहे.
३. पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. दोन लाखापेक्षा कमी असावे.
४. उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे
असणे बंधनकारक आहे.
५. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या
शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
६. आधारकार्ड नंबर असणे तसेच बँक खात्याशी जोडणे आवश्यक
आहे.
७. इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
● आवश्यक कागदपत्रे /
प्रमाणपत्रे -
१. विद्यार्थीनी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे
बोनाफाईड प्रमाणपत्र.
२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.
३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र.
५. रहिवासाचा पुरावा.
६. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची
प्रत.
७. विद्यार्थीनींचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.
८. आधारकार्ड.
सन २०२२-२३ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर नवीन
अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी /विद्यार्थीनीची माहिती भरण्यासाठी विद्याथी /
विद्यार्थीनींचे आधार नुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आधार
क्रमांक, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व I.F.S.C
कोड (विद्यार्थ्याचे बँक खाते नसल्यास पालकांचे चालेल), कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळेचे नाव व
यु-डायस क्रमांक, विद्यार्थी / विद्यार्थीनींचे शाळेतील जनरल
रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, इयत्ता,
मागील वर्षी प्राप्त झालेले गुण, पालकांचा
व्यवसाय, पूर्ण पत्ता इ. माहिती तसेच विद्यार्थी अनाथ आहे का?
अपंग आहे का? असल्यास प्रकार व टक्केवारी इ.
माहिती आवश्यक आहे.
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेमधील नूतनीकरण
विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक, कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न,
शाळा सुरु झालेली तारीख, Day Scholar / Hosteler. विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत
प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी
इत्यादी माहिती आवश्यक आहे.
K.Y.C. फॉर्मबाबत:
NSP 2.0 या पोर्टलवरती अद्याप ज्या शाळांनी K.Y.C.
फॉर्म भरलेला नाही अशा सर्व शाळांनी K.Y.C. फॉर्म
भरणे बंधनकारक आहे.
NSP 2.0 या पोर्टलवरती शाळांनी K.Y.C. फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवरती सर्व्हिसेस या मेनू मध्ये Institute
KYC Registration Form यावर क्लिक करुन शाळेचा यु-डायस क्रमांक व Captcha
कोड टाकून सबमिट करावा. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व
मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती व शाळेची
सर्व माहिती भरुन K.Y.C. फॉर्म सबमिट करावा. सोबत नोडल ऑफिसर
यांचे आधार कार्ड स्कॅन करुन अपलोड करावे.
K.Y.C. फॉर्म भरुन झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून
शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवावे. शिक्षणाधिकारी कार्यालयामधून
K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी
शाळेचा युडायस क्रमांक टाकून भरलेली माहिती तपासून, नोडल
ऑफिसर यांचा मोबाईल क्रमांक बरोबर आहे याची खात्री करुनच Approve करावे. (टिप सर्व शाळांची K.Y.C. फॉर्म पोर्टलवरती
भरणे आवश्यक आहे. शाळेमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी नसले किंवा शाळेमधून
शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसला तरीही पोर्टल वरती K.Y.C. फॉर्म
भरणे आवश्यक आहे. यापूर्वी K.Y.C. फॉर्म भरलेला असेल
जिल्हास्तरावरुन त्याची पडताळणी झाली असेल तर त्या शाळांना K.Y.C. फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)
शाळेचे नोडल ऑफिसर व शाळेचे मुख्याध्यापक यांची आधार नुसार माहिती भरण्याची प्रक्रिया.
सन २०२२-२३ साठी प्रत्येक शाळेने Login केल्यानंतर शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे बंधनकारक आहे. (शिष्यवृत्तीसाठी
अर्ज नसले तरीही)
●शाळेचे Nodal Officer यांनी शाळेचा Login ID व Password वापरुन NSP पोर्टलवर शाळा Login करावे व शाळेच्या प्रोफाईल मध्ये शाळेची सर्व माहिती भरावी व शाळेच्या
मुख्याध्यापक यांनी नेमलेल्या नोडल ऑफिसर यांची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची
माहिती आधार नुसार contact person details मध्ये भरावी.
यामध्ये नोडल ऑफिसर यांचा आधार क्रमांक, आधार वरील नाव,
जन्मतारीख, लिंग, आधारला
लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पद इ. माहिती भरावी.
●नोडल ऑफिसर
यांच्या मोबाईल क्रमांका वरती OTP येईल तो Verily झाल्यानंतर प्रोफाईल अद्यावत होईल.
●Head Of Institution Details मधील माहिती यामध्ये बदल करावयाचा असल्यास नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल
अपडेट करणे बंधनकारक आहे. नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हेड
लॉगिन मधून शाळेच्या कार्यरत असणा-या मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहिती
नूसार अद्यावत करावी.
●शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक बदलले असल्यास नवीन कार्यरत असणारे नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून व मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार इनस्टिट्यूट हेड लॉगिन मधून अद्यावत करण्यात यावी.
महत्वाच्या बाबी
● मागील वर्षी असे
लक्षात आले आहे की, शिष्यवृत्तीसाठी शाळास्तरावरती प्राप्त
झालेले अर्ज पडताळणीची अंतिम मुदत संपूनही शाळास्तरावर नवीन व नूतनीकरणाचे अर्ज
पडताळणीसाठी मोठया प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत. सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक
यांनी संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्याथी / विद्यार्थीनींचे अर्ज
विहीत मुदतीमध्ये पडताळणी पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात.
● शाळा स्तरावरुन
विद्यार्थी / विद्यार्थीनींचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच
विद्यार्थी / विद्यार्थीनी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी.
शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी
मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये
तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थी / विद्यार्थीनींना एक
संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थी / विद्यार्थीनीस संधी
देऊनही माहिती चूकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी विद्यार्थीनी
शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेकमार्क करण्यात यावा.
बनावट अर्ज / चुकीचा अर्ज शाळा स्तरावरुन पडताळणी होऊन शिष्यवृत्तीसाठी
जिल्हास्तरावर आल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांच्यावर
नियमानुसार कारवाई करावी.
● NSP 2.0 Portal वर
विद्यार्थी / विद्यार्थीनींचे अर्ज कोणत्याही एका शिष्यवृत्तीसाठी भरण्यात यावा.
(एकापेक्षा अधिक शिष्यवृत्ती अर्ज भरु नये)
● मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती मधील ज्या नुतनीकरण विद्यार्थ्यांचे A/c Details चुकीचे
आहेत किंवा बदललेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरती यादी बनवावी व
ज्यावेळी A/c Details दुरुस्तीबाबत SMS येईल त्यावेळी अशा सर्व विद्यार्थ्यांचे A/c Details विद्यार्थ्यांच्या Login मधून Update Bank
Details या मेनू मधून आवश्यक ती दुरुस्ती विहित कालावधीत करावी.
● जिल्हास्तरावरुन शाळेतील चुकीचा अर्ज फेक मार्क करण्यात आल्यानंतर संबंधित शाळेतील सर्व अर्ज डिफेक्ट होऊन शाळास्तरावर जातील व शाळेने सर्व अर्ज बरोबर असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर संबंधित शाळेतील अर्ज जिल्हास्तरावरुन स्वीकारण्यात येतील.
● ज्या शाळा बंद
झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेस शासनाची
मान्यता आहे परंतु वर्गास मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी
अर्ज स्विकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग
नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज फेक मार्क करावे व
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी.
● मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती मधील नूतनीकरण विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव शाळा बदलली
असल्यास / नविन शाळेत प्रवेश घेतला असल्यास अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज Withdraw करण्यात यावेत व अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज भरावयाचा असल्यास
त्यांचा अर्ज NSP 2.0 या पोर्टलवरती नवीन अर्ज म्हणून भरण्यात
यावा.
● शाळांचे
मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर तसेच जिल्हयाचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती NSP 2.0 या पोर्टलवर भरावी.
● विद्यार्थ्याने
नवीन मधून अर्ज करत असताना सर्व कागदपत्रे शाळेमध्ये देणे बंधनकारक आहे. तसेच
शाळेने किमान ५ वर्षे सर्व कागदपत्रे इयत्तानिहाय, वर्षनिहाय जतन
करुन ठेवावे. नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी सर्व कागदपत्रे घेण्याची आवश्यकता नाही.
सदर विद्यार्थ्याने नवीन मध्ये अर्ज करत असताना दिलेल्या कागदपत्रामध्ये काही बदल
असल्यास संबंधित कागदपत्रे शाळेमध्ये विद्यार्थ्यास जमा करावे लागतील.
● विद्यार्थ्यांची Digi Locker मध्ये आधार नुसार A/c open करावे व सर्व कागदपत्रे
यामध्ये store करुन ठेवण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असताना Digi Locker चे A/c आधार सोबत अर्जांमध्ये जोडण्यात यावे. जेणेकरुन शाळा व जिल्हा स्तरावरुन
सर्व कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करता येईल.
● बेगम हजरत महल
राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही फक्त इयत्ता ९वी ते १२वी मधील विद्यार्थीनींसाठी
(मुलींसाठी) आहे व प्रत्येक वर्षी अर्ज नवीन (Fresh) मधून भरावा लागेल.
● शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणा-या सर्व पात्र इच्छुक विद्यार्थी / विद्यार्थीनीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात याव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात येतील याची दक्षता घ्यावी.
pre-matric scholarship scheme for minorities,pre matric scholarship
scheme for minorities 2022,post matric scholarship scheme for minorities,post
matric scholarship scheme for minorities eligibility,post matric scholarships
scheme for minorities closed on,nsp pre matric scholarship scheme for
minorities 2022-23,pre matric scholarship schemes minorities cs,post matric
scholarship scheme for minorities form pdf,post matric scholarship schemes
minorities cs status check,post matric scholarship schemes minorities cs last
date
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS