शाळापूर्व तयारी अभियान,शाळापूर्व तयारी अभियान गीत,शाळापूर्व तयारी अभियान घोषवाक्य,शाळापूर्व तयारी अभियान pdf,शाळापूर्व तयारी अभियान schooledutech,शाळा
‘पहिले पाऊल - शाळापूर्व तयारी अभियानाला' यश | ‘First Step - Pre-School Preparation Campaign’ Success
शाळापूर्व तयारी अभियान - शासकीय शाळांमध्ये यंदा पहिलीत प्रवेश घेणाऱ्या सुमारे १४
लाख विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला दमदार सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी
आत्मविश्वासाने व तयारीनिशी शाळेत यावे यासाठी आम्ही राबविलेल्या ‘पहिले
पाऊल - शाळापूर्व तयारी अभियानाला' अतिशय चांगले यश मिळाले
आहे. या अभियानांतर्गत राज्यभर आयोजित केलेल्या शाळापूर्व तयारी मेळाव्यांचा आणि
स्थापन झालेल्या माता गटांचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळापूर्व
तयारीमध्ये झाल्याचे 'प्रथम' या
संस्थेमार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
शिक्षणाचा पाया जर बालवयातच मज़बूत केला तर पुढच्या
शिक्षणाची प्रक्रिया सुखकर आणि सोपी होईल, हे
साध्य ठेऊन 'स्टार्स' प्रकल्पांतर्गत
हे अभियान घेण्यात आले. त्याला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व सहभागी
घटकांचे मनापासून आभार. विशेष म्हणजे, आपल्या पाल्यांच्या
उज्ज्वल भविष्यासाठी सतत झटणाऱ्या त्यांच्या माता या अभियानाच्या केंद्रस्थानी
होत्या. सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीचा उपयोग करून माता गटांच्या मदतीने मुलांची
तयारी करण्यात आली. यासाठी तब्बल मातांचे
२.५ लाख गट स्थापन झाले.
या माध्यमातून शिक्षक आणि पालकांमध्ये चांगला समन्वयही
स्थापित झाल्याचे दिसून आले. येत्या काळात या सकारात्मक उर्जेमध्ये सातत्य टिकवून
व त्याद्वारे बालशिक्षण आणि मुलांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करून घेण्यास आमचे
प्राधान्य असेल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS