⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणी

सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणी Study status check of students after implementation of bridge course

सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणी

Study status check of students after implementation of bridge course

Bridge course : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम (Bridge course) तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे. याकरिता राज्यातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या संदर्भात इयत्ता २ री ते १० वी या इयत्तेतील विद्यार्थ्याची सेतू अभ्यासक्रम (Bridge course) अंमलबजावणी पूर्वीची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून पूर्व चाचणीद्वारे माहिती संकलन करण्यात आलेली आहे.

या संशोधनासाठी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील सर्व्हे मंकी लिंकमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या अधिनस्थ वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांच्या सहकार्याने सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी. तसेच यापूर्वी पूर्व चाचणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडून प्रश्नावली सोडवून घेण्यात आली होती, त्याच विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी सोडवून घेण्याविषयी अवगत करावे. सदर संशोधन हे कालमर्यादित असल्याने पुढील नियोजनाप्रमाणे https://www.research.net/r/Bridgecoursepoststudy22 या लिंकद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात यावी.

संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या स्तरावरून यासंदर्भात आदेशित करावे. तसेच आपल्या स्तरावरून याबाबतचा आढावा घ्यावा. आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी किती विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली याबद्दलचा गोषवारा संशोधन विभागाच्या researchdept@maa.ac.in या ई-मेलवर पाठविण्यात यावा.

 परिपत्रक डाऊनलोड

पुनर्रचित सेतू अभ्यास सन २०२२-२३ अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती माहिती संकलन मार्गदर्शक सूचना

 

  • ·        पुनर्रचित सेतू अभ्यास (Bridge course)  अंमलबजावणी पूर्वीची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी इयत्ता २ री ते १० वी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे.
  • ·        त्यानुसार पुनर्रचित सेतू अभ्यास (Bridge course)  अंमलबजावणी नंतरची विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती तपासण्यासाठी इयत्ता २ री ते १० वी याच इयत्तांची माहिती संकलन करण्यात येणार आहे.
  • ·        SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत सेतू अभ्यासामामध्ये समाविष्ट अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्धारित करण्यात आले आहेत.
  • ·        इयत्तानिहाय एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यामध्ये संबंधित इयत्तेतील सर्व विषयावरील प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. (हिंदी विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही.) प्रत्येक विषयासाठी १० प्रश्न विचारण्यात आले आहेत.
  • ·        https://www.research.net/r/Bridgecoursepoststudy22 या सर्व्हे मंकी लिंकमधील प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात यावी.
  • ·        माहिती संकलनाची उपरोक्त लिंक राज्यातील शाळांकरिता (विदर्भ वगळून) दि.२६/०७/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता सुरु करण्यात येईल व दि.०४/०८/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता बंद करण्यात येईल. त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
  • ·        माहिती संकलनाची उपरोक्त लिंक विदर्भातील शाळांकरिता दि.१०/०८/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता सुरु करण्यात येईल व दि.२२/०८/२०२२ रोजी रात्री १२.०० वाजता बंद करण्यात येईल. त्यामुळे दिलेल्या वेळेतच सदर माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम