⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Student Portal मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणे

student portal maharashtra,student portal maharashtra rte,student portal maharashtra helpline number,student portal maharashtra default password,student portal education.maharashtra.gov.in,student scholarship portal maharashtra,student portal maharashtra rte,rte maharashtra student portal-school education and sports,student portal maharashtra helpline number,student portal maharashtra default password,Student Portal मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणे Updating student's Aadhaar number information in Student Portal

Student Portal मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणे
Updating student's Aadhaar number information in Student Portal

Student Portal Update - मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27/09/2022 रोजी online बैठक घेण्यात आलेली असून मा. संचालक महोदयांनी खालील प्रमाणे उपाय योजना राबवून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी/दुरुस्ती दिनांक 30/10/2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश परिपत्रकात दिलेले आहे.

आधार नोंदणी करण्याबाबत

(१) मा. जिल्हाधिकारी यांना विनंती करून त्यांचेकडून प्रत्येक तालुक्यास किमान २ आधार किट ऑपरेटरसह उपलब्ध करून घ्यावे. तसेच आधार कॅम्पस देखील आयोजित करावेत.

(२) शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग आणि student पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांचे नमूद केलेले नाव जन्म तारीख व लिंग हे आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत असल्याची खात्री करावी. जिथे आधार अपडेट करावयाचे विद्यार्थी जास्त आहेत तेथे गटशिक्षणाधिकारी यांनी Operators च्या कामाचे नियोजन करावे. आपल्या जिल्ह्यातील मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आढावा बैठकीतून सरल पोर्टलवर आधार अपडेटसाठी शाळेंच्या स्तरावर मुख्याध्यापक यांना सूचना व मार्गदर्शन देण्याबाबत विनंती करावी.

(३) आधारची माहिती offline bulk मध्ये नोंदवून नंतर Online नोंदविण्यापेक्षा विद्यार्थीनिहाय स्वतंत्रपणे नोंदवावी की ज्यामुळे आधार नोंदणीची पुनरावृत्ती होणार नाही.

(४) ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढले गेलेले नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यास अंगणवाडी सेविकांची मदत घेण्यात यावी.

(५) सदर कामी आपलेकडील एम आय एस कॉर्डीनेटर, डाटा ऑपरेटर, विषयतज्ञ साधन व्यक्ती, विषयतज्ञ डाटा ऑपरेटर, फिरते विशेष शिक्षक यांना प्रत्येकी किमान १०० विद्यार्थीची जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या सर्वांचे शाळा भेटीच्या वेळापत्रकाचे नियोजन करून नियोजित शाळेच्या मुख्याध्यापकांचे युजर आयडी व पासवर्ड घेऊन आधार नोंदणीच्या कामास सुरूवात करावी व त्यांचे कामावर नियंत्रण व पर्यवेक्षण करण्याचे काम संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांचेकडे सोपविण्यात यावे. तसेच त्यांनी देखील स्वत: शाळा भेटी देण्याचे नियोजन करावे. त्यांचे नियोजन शिक्षणाधिकारी यांनी नियंत्रण करावे.

(६) या कामाच्या प्रगतीचा आपण आढावा घेऊन दर सोमवारी त्याचा अहवाल संचालनालयास न चुकता सादर करावा.

आधार क्रमांकाच्या दुरुस्ती करणेबाबत

(१) शाळेच्या जनरल रजिस्टरद्वारे student पोर्टल मध्ये विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख व लिंग आधार कार्डवरील उल्लेखित माहितीशी सुसंगत नसल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून तातडीची दुरुस्ती करावी. आधार कॅम्पस मध्ये याबाबत जागरूकतेने कार्यवाही करावी.

(२) आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास आधार कॅम्पसची मदत घेण्यात यावी. दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाचा तपशील student पोर्टल मध्ये अद्यावत करण्यात यावा.

(३) Student पोर्टल मध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नमूद केले नसल्याची खात्री कारवी. अशा प्रकारे संपूर्ण कामाचा निपटारा दिनांक-३०/१०/२०२२ पर्यंत १००% पूर्ण करावा.

विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती अद्यावत करणे परिपत्रक.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम