vidyanjali 2.0 school registration,vidyanjali 2.0 portal,vidyanjali 2.0 portal upsc,vidyanjali 2.o portal,Vidyanjali 2.0 webportal
विद्यांजली २.० वेबपोर्टलची सुरुवात | Vidyanjali 2.0 webportal launched
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी
दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० यामध्ये
त्यातील लक्ष्य साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या
सक्रिय सहभागाची आवश्यकता विषद केलेली आहे. याकरिता विद्यांजली २.० वेबपोर्टल
कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली २.० A Volunteer Management
Programme हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने
शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या
मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक
भूमिका आहे. विद्यांजली २.० हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या
संसाधनांचे एकत्रिकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण २०२० मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद
केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसहभाग आणि स्वयंसेवी सहभागाला
प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण
मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली २.० विकसित केली असून या
कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच
नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला/मानधन न
घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ
शकतात.
कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी
विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त वैज्ञानिक/ शासकीय/
निमशासकीय अधिकारी, कर्मचारी / सशस्त्र दलातील व्यक्ती,
गृहिणी, साक्षर व्यक्ती हे शाळांच्या
विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र, योगदान, सेवा/कृती, मालमत्ता/साहित्य/उपकरणे,
प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.
योगदानाच्या अटी व शर्थी :
सेवा व कृती योगदान :
सामन्य स्तरावरील सेवा/ कृती (Generic level services / activities) - विषय अध्यापनात सहकार्य, कला, कार्यानुभव, योग, क्रीडा, भाषा, व्यावसायिक कौशल्ये यांचे अध्यापन करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययनास सहकार्य करणे, प्रौढ शिक्षणात सहभाग, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पौष्टिक आहार मार्गदर्शन.
प्रशिक्षित समुपदेशक, प्रायोजक्तव
स्वरूपातील सेवा/ कृती ( Sponsarship services / activities) विशेष शिक्षण तज्ञ, शारीरिक, मानसिक
स्वास्थ्य यातील समुपदेशक / वैद्यकीय शिबीरे, कला व क्रीडा
उपक्रम, आरोग्य आणि स्वच्छता स्त्रोत, शालेय
भौतिक कामकाजासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, विद्यार्थ्यांसाठी
साठी तज्ञ शिक्षकांद्वारे उपचारात्मक अध्यापन, दिव्यांग
विद्यार्थ्यांसाठी शिबीरे, मुलींसाठी स्व-सरंक्षण प्रशिक्षण
इ.बाबींचे प्रायोजक्तव स्वीकारणे.
मालमत्ता/साहित्य/उपकरणे योगदान :
खाजगी साहित्य, वीज साहित्य, डिजीटल साहित्य, वर्गातील साहित्य, खेळ, योगा, आरोग्य व सुरक्षा
साहित्य, अध्ययन–अध्यापन साहित्य,
देखभाल दुरुस्ती, कार्यालयीन स्टेशनरी,
सेवासाह्य, गरजानुरूप साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, कला व कार्यानुभव कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन कक्ष,
संरक्षण भिंत व प्रवेशद्वार, पिण्याच्या
पाण्याची सुविधा व पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, खेळाच्या साहित्याने सुसज्ज मैदाने, Ramp, ग्रंथालये,
आधुनिक स्वयंपाकगृहे, निवासी वसतिगृहे,
निवासी खोल्या, Rain Water Harvesting रचना
तसेच स्थानिक कार्यालयीन गरजा इ.
रोख रकमेच्या स्वरुपात कोणतेही आर्थिक साह्य शाळांना
स्वीकारता येणार नाही.
मागणी केलेले सेवा/ साहित्य प्राप्त झाल्यास शाळा
त्यांची विनंती Close करू शकतात. ५. मागणी केलेल्या सेवा / साहित्यापेक्षा
अतिरिक्त साहित्य किंवा सेवा देण्यास स्वयंसेवक किंवा संस्था तयार असल्यास सदर
शाळा दुसऱ्या शाळेची शिफारस करू शकतात. किंवा सेवा / साहित्य मागणीपेक्षा कमी
प्राप्त झाल्यास सदर शाळा ही इतर स्वयंसेवक किंवा संस्था यांना मागणी करू शकतात.
www.vidyanjali.education.gov.in
विविध घटकांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या:
१.शाळा:
● विद्यांजली २.० वेबपोर्टलवर शाळा UDISE व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करू शकतात.
●शाळांना आवश्यक असणाऱ्या सेवा/
साहित्य/सुविधा यांची यादी पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
●इच्छुक स्वयंसेवक/ संस्था यांची निवड करताना त्यांचा अनुभव, पात्रता, साधनांचा दर्जा या गोष्टी विचारातण्यात याव्या. स्वयंसेवक/ संस्था यांची ऑनलाईन किंवा समक्ष सभा घेऊन त्यांच्या उपलब्ध वेळ व सहय्याबद्दल निर्णय घ्यावा.
●शाळांनी संबंधित स्वयंसेवक / संस्था यांचे
कागदपत्रे, पार्श्वभूमी, तज्ञत्व हे
तपासून घेणे आवश्यक आहे. उपरोक्त बाबींची पूर्तता केल्यानंतर शाळांनी स्वयंसेवक /
संस्था यांचेबरोबर करार करावा. तथापि सदर करार विद्यांजली २.० वेबपोर्टलचा भाग
असणार नाही.
●संबंधित स्वयंसेवक/ संस्था यांना कोणत्याही प्रकारचे
मानधन/निधी / वेतन देय असणार नाही फक्त शाळा त्यांना योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊ
शकते. मात्र या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नौकरी अथवा अन्य कोणत्याही
प्रयोजनार्थ याचा लाभ घेता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
●शाळा अथवा शालेय प्रशासनाने संबंधित स्वयंसेवक / संस्था
यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करून त्यांच्या क्षमंताचे मूल्यमापन, अवलोकन
करावे. भविष्यात याबाबतीत काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी
शाळा अथवा शालेय प्रशासनाची राहील.
स्वयंसेवक/स्वयंसेवी संस्था:
● स्वयंसेवक/
स्वयंसेवी संस्थांनी विद्यांजली २.० वेबपोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी करत असताना
मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी प्रोफाईल मध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.
स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्थां पोर्टलवरून शाळांच्या गरजांची
माहिती घेऊ शकतात. त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सेवा व योगदानानुसार
राज्य/जिल्हा/तालुका पातळीवरील शाळा ते पोर्टलवरून निवडू शकतात.
● स्वयंसेवक/
स्वयंसेवी संस्थां यांनी योगदान देण्यासाठी शाळांची निवड केल्यानंतर संबंधित
शाळेकडे सेवा देण्यासंदर्भात सहमती दर्शवू शकतात.
● स्वयंसेवक/
स्वयंसेवी संस्थां यांना शाळांनी चर्चेसाठी बोलावल्यास उपस्थित राहून आवश्यक
प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
● स्वयंसेवक/
स्वयंसेवी संस्थां त्यांच्या योगदाना संदर्भात त्यांना आलेल्या अनुभवाबाबत शाळेला
आदान प्रदान करू शकतात तसेच शाळासुद्धा त्यांच्या सेवा व योगदानाच्या दर्जाबाबत
स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्थां यांना अभिप्राय देऊ शकतात.
●सेवा घेऊ
इच्छिणाऱ्या शाळांनी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नोंदणी, सभेची
पूर्वसूचना, सेवेची निश्चित्ती याबाबत वेळोवेळी अद्ययावत
सूचना संबंधित स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्थां यांना देणे आवश्यक आहे.
क्षेत्रीय अधिकारी भूमिका:
१. राष्ट्रीय क्षेत्रीय अधिकारी (National Nodal
Officer) :राष्ट्रीय क्षेत्रीय अधिकारी हे राज्य क्षेत्रीय अधिकारी
यांचेसाठी login विकसित करतील.
राष्ट्रीय क्षेत्रीय अधिकारी विद्यांजली २.०
वेबपोर्टलद्वारे संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करतील. राष्ट्रीय क्षेत्रीय
अधिकारी हे संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण करतील आणि राष्ट्रीय स्तरावरील अहवाल
तयार करतील.
राज्य क्षेत्रीय अधिकारी (State Nodal
Officer) :
राज्य क्षेत्रीय अधिकारी हे जिल्हा क्षेत्रीय अधिकारी
यांचेसाठी login विकसित करतील.
● राज्य क्षेत्रीय
अधिकारी हे सेवा / योगदान प्रदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन,
सनियंत्रण करतील आणि शाळा आणि स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्थां यांना
वेळोवेळी मार्गदर्शन करतील.
जिल्हा क्षेत्रीय अधिकारी (District Nodal
Officer) :
जिल्हा क्षेत्रीय अधिकारी हे शाळांच्या विद्यांजली २.०
वेबपोर्टलवर केलेल्या नोंदणीचे अवलोकन करतील.जिल्हा क्षेत्रीय अधिकारी हे
विद्यांजली २.० वेबपोर्टलवर शाळांनी सेवा व योगदान घेण्यासंदर्भातील केलेली विनंती
कार्यान्वित (Activate) करतील.जिल्हा क्षेत्रीय अधिकारी हे
सेवा / योगदान प्रदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन, सनियंत्रण करतील आणि शाळा आणि स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्थां यांना
वेळोवेळी मार्गदर्शन करतील.
● जिल्हा क्षेत्रीय
अधिकारी हे सदर उपक्रमातील शाळा आणि स्वयंसेवक/ स्वयंसेवी संस्था यांच्या
सहभागाबाबत सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी मासिक/ त्रैमासिक/ वार्षिक अहवाल
तयार करतील.
४. केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समितीचे
विभागीय क्षेत्रीय अधिकारी (Regional Nodal Officer) :
●विभागीय
क्षेत्रीय अधिकारी हे शाळांच्या विद्यांजली २.० वेबपोर्टलवर केलेल्या नोंदणीचे
अवलोकन करतील.
●विभागीय
क्षेत्रीय अधिकारी हे विद्यांजली २.० वेबपोर्टलवर शाळांनी सेवा व योगदान
घेण्यासंदर्भातील केलेली विनंती कार्यान्वित (Activate) करतील.
●विभागीय
क्षेत्रीय अधिकारी हे सेवा / योगदान प्रदान करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे
व्यवस्थापन, सनियंत्रण करतील आणि शाळा आणि स्वयंसेवक /
स्वयंसेवी संस्थां यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील.
●विभागीय
क्षेत्रीय अधिकारी हे Dashboard चे अवलोकन करतील. तसेच शाळा
आणि स्वयंसेवी संस्थां यांच्या प्रयत्नांचे पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री
करतील.
● विभागीय
क्षेत्रीय अधिकारी हे सदर उपक्रमातील शाळा आणि स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्था
यांच्या सहभागाबाबत सनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी मासिक/ त्रैमासिक / वार्षिक
अहवाल तयार करतील.
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC: National
Informatic Centre) :
विद्यांजली २.० वेबपोर्टलवर संपूर्ण प्रक्रियेदरम्यान
तांत्रिक साह्य पुरविणे.
● संपूर्ण
प्रक्रियेदरम्यान उपस्थित होणाऱ्या गरजा व विविध तांत्रिक प्रश्न यानुसार
विद्यांजली २.० वेबपोर्टल अद्ययावत करणे.
● राज्य क्षेत्रीय
अधिकारी यांना विविध अहवाल तयार करण्यासाठी सहकार्य करणे आणि आवश्यकतेनुसार
तांत्रिक सेवा उपलब्ध करून देणे.
आचारसंहिता:
● सदर मार्गदर्शक
तत्त्वे केंद्र आणि राज्य सरकार आणि सरकारी अनुदानित शाळांना लागू आहेत. शालेय
शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय यांना
विद्यांजली २.० द्वारे स्वयंसेवकांच्या योगदानासंदर्भात अटी आणि शर्तीमध्ये कधीही
सुधारणा करण्याचा अधिकार आहे आणि स्वयंसेवक यांना ते बंधनकारक असेल.स्वयंसेवकांना
किंवा स्वयंसेवकाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला सोपवल्या जाणाऱ्या कोणत्याही सेवा
/योगदानामुळे उद्भवलेल्या किंवा कोणत्याही प्रकारे संबंधित प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, अनुषंगिक किंवा परिणामी होणाऱ्या
नुकसानासाठी स्वयंसेवकांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.
● शाळा,राज्य/केंद्रशासित प्रदेश किंवा केंद्र सरकारद्वारे या उपक्रमांतर्गत
स्वयंसेवकांना कोणतेही मानधन देय नाही.
● स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थां कठोर गोपनीयतेचे पालन करतील आणि कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला किंवा समाजमाध्यामावर कृती, सेवा, उपक्रम व संबंधित धोरणाची गोपनीय माहिती उघड होणार नाही याची दक्षता
घेतील.
●स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थां या शालेय अधिकारी आणि सामान्य लोकांशी केवळ व्यावसायिक संबंध
जोपासतील.
●स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या कामाचा अहवाल शाळांशी असलेली संलग्नता असेपर्यंत
सादर करणे आवश्यक आहे.
●स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थांना सेवा व योगदानाच्या मोबदल्यात शाळेत किंवा मंत्रालय विभागात
नोकरीसाठी अथवा कोणत्याही प्रकारच्या लाभासाठी दावा करता येणार नाही.
●स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थां यांना दिलेल्या सेवेचा कालावधी पूर्णवेळ कामाचा अनुभव ग्राह्य
धरता येणार नाही. तसेच या संदर्भात शाळेने संबंधित संस्थाना दिलेले कोणतेही
प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. प्रमाणपत्र अनुभव
● स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थां यांनी प्रदान केलेले मालमत्ता/साहित्य/उपकरणे हे कायदेशीररीत्या
स्वतःच्या मालकीचे असल्याचे व सुस्थितीत व वापरण्यायोग्य असल्याचे तसेच शाळेकडे
संबंधित साहित्याचा मालकी हक्क हस्तांतरित करत असल्याचे स्वयं-प्रमाणपत्र सादर
करणे आवश्यक आहे. स्वयंसेवकाच्या कोणत्याही चुकीच्या कृतीसाठी शाळा कायदेशीररित्या
जबाबदार धरली जाणार नाही.
●विद्यांजली २.०
हे केवळ शाळा आणि स्वयंसेवक/स्वयंसेवी संस्था यांना सेवा/योगदान यांच्या ऐच्छिक
आदान प्रदानासाठी एकत्र आणण्याचे एक व्यासपीठ आहे.
● शाळा/राज्यांनी
यांनी विद्यांजली वेबपोर्टलवर सादर केलेल्या गरजांची अथवा यासंदर्भात दिलेल्या
कोणत्याही माहितीची पडताळणी करण्यासाठी शिक्षण मंत्रालय जबाबदार असणार नाही. ही
जबाबदारी संबंधित भागधारकांची असेल.
●स्वयंसेवक व
स्वयंसेवी संस्थां यांनी दिलेल्या योगदानासंदर्भात शाळा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर
कोणतेही तात्पुरते किंवा कायमचे दायित्व निर्माण होणार नाही.
५.राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि स्वायत्त संस्थांसाठी
अतिरिक्त मार्गदर्शक सूचना:
● राज्ये/केंद्रशासित
प्रदेश आणि स्वायत्त संस्था मालमत्ता/साहित्य/उपकरणे मधील योगदानासाठी
सुरक्षेविषयी मार्गदर्शक तत्त्वे तसेच अचूक प्रमाणके संदर्भात आणि विशिष्ट आर्थिक
मर्यादेपेक्षा जास्त योगदान देणाऱ्या स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्था / एनजीओ यांना
सर्व बाबींविषयी परिपत्रक जारी करू शकतात.
● स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांचा संबंध लहान मुलांशी अपेक्षित असल्याने सुरक्षेच्या
दृष्टिकोनातून त्यांनी सेवा देण्यापूर्वी शाळेकडे आधारकार्ड किंवा इतर कोणतेही
भारत सरकारचे ओळखपत्र यासारखा ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
● स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांनी शैक्षणिक कृतीमध्ये योगदान देण्यापूर्वी त्याचे कौशल्य /
अनुभवाचे क्षेत्र स्पष्ट करणारी एक संक्षिप्त माहितीपत्रक (प्रोफाइल) जमा करणे
अपेक्षित आहे जेणेकरून स्वयंसेवक /स्वयंसेवी संस्था यांच्या सेवेचा लाभ घ्यायचा की
नाही हे ठरवण्यासाठी शाळेला मदत होईल.
●स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांच्या सेवा शाळेतील प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन या प्रक्रियेचा
मुख्य भाग बनू शकत नाहीत. स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्था यांच्या सेवांचा लाभ
प्रामुख्याने अशा क्षेत्रांसाठी/विषयांसाठी घेतला जाऊ शकतो ज्यासाठी शाळेकडे
पुरेसे मनुष्यबळ/तज्ञता उपलब्ध नाही.
● स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक कृतींचे
पर्यवेक्षण/सनियंत्रण शाळेतील शिक्षकांनी केले पाहिजे.
● नसावा. स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या कृती अथवा सेवा यांचे स्वरूप
पूर्णपणे शैक्षणिक किंवा सहशालेय असावे. त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट विचारधारेचा
किंवा आचरणाचा प्रचार व प्रसार
●स्वयंसेवक /
स्वयंसेवी संस्था यांनी मालमत्ता/साहित्य/उपकरणे या स्वरूपात केलेले सर्व योगदान
किमान BIS (Bureau of Indian Standards) असे चिन्हांकित असले
पाहिजे.
●स्वयंसेवक /
स्वयंसेवी संस्था यांनी मालमत्ता/साहित्य/उपकरणे या स्वरुपात प्रदान केलेल्या
पायाभूत सुविधा व उपकरणे कार्यरत व सुस्थितीत असावेत आणि शाळा या ई-कचऱ्याचे
साठवणूक क्षेत्र होणार नाही याची मुख्याध्यापकांनी दक्षता घेतली पाहिजे.
● स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांनी मालमत्ता/साहित्य/उपकरणे यांसंदर्भात दिलेल्या
योगदानामध्ये वार्षिक/नियमित देखभाल पुरवण्यासाठी वचनबद्धता देखील समाविष्ट असावी.
●स्वयंसेवक/स्वयंसेवी
संस्था यांचे योगदान हे कार्यक्रम / उपक्रम यांचे प्रायोजकत्व स्वीकारणे व देखभाल
या स्वरूपात देखील असू शकते.
How to Add Activities (by School)
सेवा संपुष्टात आणणे:
शाळा किंवा राज्य प्राधिकारी खालीलपैकी कोणत्याही
परिस्थितीत स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांच्याशी असलेले व्यावसायिक नाते/
करार संपुष्टात आणू शकतात:
● स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांच्या सेवेची यापुढे आवश्यकता नाही असे शाळा किंवा प्राधिकारी
यांचे मत झाल्यास अधिकारी स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्था यांच्याबरोबरचे व्यावसायिक
नाते/ करार संपुष्टात आणू शकतात.
● प्राधिकारी कोणतेही
कारण न देता स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्था यांच्या सेवा खालील बाबतीत तात्काळ
प्रभावाने कोणत्याही वेळी संपुष्टात आणू शकतात:
स्वयंसेवक / स्वयंसेवी संस्था किंवा त्यांच्या कोणत्याही
प्रतिनिधीचे अयोग्य वर्तन.
● सेवा किंवा योगदान
या संदर्भात स्वयंसेवा पद्धतीचे पालन न करणे.
●स्वयंसेवक /
स्वयंसेवी संस्था यांना सेवा / योगदान यात स्वारस्य नसणे.
●करारामध्ये स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांनी दिलेली वचनबद्धता पूर्ण न करणे.
●शालेय विद्यार्थी
यांचेसाठी अनुकूल नसलेल्या कोणत्याही फुटीरतावादी किंवा इतर विचारसरणीचा प्रचार
तसेच खाजगी व्यवसाय सुरु करणे किंवा कोणत्याही आर्थिक नफ्यासाठी कृती करणे इ. ४
कोणत्याही प्रकारे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता (शारीरिक, भावनिक,
सामाजिक, आरोग्य संबंधित, सायबर सुरक्षा) यांना हानी पोहोचवणे.
●स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था यांच्या सेवा संपुष्टात आल्यानंतरही आहेत संबंधित स्वयंसेवक
/स्वयंसेवी संस्था तद्नंतरही कार्यरत असल्याचे प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास, त्याविरुद्ध
योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार प्राधिकारी यांना असतील.
प्राधिकाऱ्यांचा यासंदर्भातील निर्णय अंतिम असेल आणि तो स्वयंसेवक / स्वयंसेवी
संस्था यांच्यावर बंधनकारक असेल.
● प्राधिकारी यांना
कायद्यानुसार अटी व शर्तींच्या उल्लंघनासाठी उपलब्ध असलेल्या सर्व उपायांचा शोध
घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे ज्यात कोणत्याही निर्धारित केलेल्या बाबींसाठी
विशिष्ट स्वयंसेवक /स्वयंसेवी संस्था यांचा प्रवेश अवरोधित करण्याचा अधिकार आहे.
vidyanjali 2.0 school
registration,vidyanjali 2.0 portal,vidyanjali 2.0 portal upsc,vidyanjali 2.o
portal,vidyanjali 2.0 in hindi,vidyanjali 2.0
scheme,vidyanjali 2.0 registration in marathi,vidyanjali
2.0 upsc,vidyanjali 2.0 portal
upsc,vidyanjali 2.0 in marathi
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS