rimc exam date 2022,rimc exam date 2022 application form,rimc exam date 2022 december,rimc exam date 2022 class 8,rimc exam date 2022 eligibility,rimc
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून
प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) डिसेंबर २०२२
Rashtriya Indian Military College (R.I.M.C.)
DEHRADUN ENTRANCE EXAMINATION December 2022
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून,
उत्तराखंड प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर २०२२ - महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य
महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता ८ वी
साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी
पुणे येथे घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा (RIMC) ०३ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी / विद्यार्थीनी ( उमेदवार दि. ०१ जुलै २०२३ रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण झालेला असावा.
वय : या परीक्षेसाठी विद्यार्थी /
विद्यार्थीनीचे वयोमर्यादा (वय) दिनांक जुलै २०२३ रोजी ११ ½ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि
१३ (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच विद्यार्थी / विद्यार्थीनीचा जन्म
दिनांक ०२ जुलै २०१० च्या आधीचा व दिनांक आणि ०१ जानेवारी २०१२ च्या नंतरचा नसावा.
परीक्षा शुल्क : आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा
ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:
अ) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र
(फॉर्म) मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून
यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पध्दतीने रु.६००/- व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- पैसे भरून
आवेदनपत्राची (फॉर्मची) मागणी आपणास करता येईल.
ब) डिमांड ड्राफ्ट द्वारे परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म)
मा. कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्याकडून
मागविण्याकरीता सर्वसाधरण संर्वगातील विद्यार्थी (उमेदवार) करीता रु. ६००/- चा
डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. ५५५/- चा डी. डी. कमांडंट "राष्ट्रीय
भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट
बँक ऑफ इंडिया, तेल भवन, देहराडून,
बँक कोड नं. (०१५७६) यांचे नावाने काढावा. सदर डी. डी. मा. कमांडंट
"राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, २४८ ००३ या पत्त्यावर पाठविणे आवश्यक
आहे. अनुसूचित जाती / जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत /
छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी. डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर
आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर
आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती
पुस्तिका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.
टीप: परीक्षेसाठी मा, कमांडंट
"राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र
(फॉर्म) घ्यावयाचे आहे.
आवेदनपत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिली जाणार नाही.
कागदपत्रे :- आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन)
प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.
- अ) जन्म दाखल्याची छायाप्रत ( झेरॉक्स कॉपी)
- ब) अधिवास (Domicile Certificate) प्रमाणपत्र
छायाप्रत ( झेरॉक्स कॉपी)
- क) अनुसूचित जाती/जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी).
- ड) शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.
- इ) आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे विद्यार्थीनीचे उमेदवाराचे) आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे / विद्यार्थीनीचे ( उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म)सह करण्यात येईल.
- ई) दोन पासपोर्ट साईज फोटो
वरील कागदपत्रांच्या छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)
मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फॉर्मसोबत) जोडावेत.
सूचना :
अर्ज परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून
- मा.
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ.
आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे -
४११००१.
- दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा पध्दतीने वरील पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावीत.
परीक्षेचे
वेळापत्रक
आधिक माहितीसाठी
खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या.
Phone No. - ०२०-२६१२३०६६/६७
Email: mscepune@gmail.com
Website: www.mscepune.in
rimc exam date 2022,rimc exam date 2022 application form,rimc exam date 2022 december,rimc exam date 2022 class 8,rimc exam date 2022 eligibility,rimc exam date 2022 admit card,rimc exam date 2022 postponed,rimc exam date 2022 admit card download,rimc entrance exam date 2022,rimc exam date 2022 june
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS