⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन Group National Anthem singing under “Swarajya Week” on the occasion of Amrit Mahotsav of Independencenational anthem singing time,national anthem song time,national anthem sung time,average national anthem singing time,national anthem sung first time,national anthem of india singing time,super bowl national anthem singer time,can we sing national anthem at any time,national anthem singing time,national anthem singing

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताहअंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन

Group National Anthem singing under “Swarajya Week” on the occasion of Amrit Mahotsav of Independence

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सवअर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवया उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात स्वराज्य महोत्सवचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वराज्य महोत्सवअंतर्गत राज्यस्तर / जिल्हास्तर / तालुकास्तर व ग्रामस्तरावर आयोजित करावयाच्या कार्यक्रम / उपक्रम यांचे स्वरुप निश्चित केले आहे.

स्वराज्य महोत्सवमध्ये नमूद केल्यानुसार राज्यस्तरावरील कार्यक्रमांच्या नियोजनामधील समूह राष्ट्रगीत गायनहा उपक्रम आता दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राबवावयाचा आहे.

स्वराज्य महोत्सवअंतर्गत "समुह राष्ट्रगीत गायन" या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना खालीलप्रमाणे सर्वसाधारण सूचना देण्यात येत आहेत.

दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल.
 

  • ·        या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये /शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असेल.
  • ·        सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी.
  • ·        समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्याची सर्व संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी.
  • ·        सर्व संबंधित यंत्रणांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिनांक १७ ऑगस्ट रोजी, सकाळी ११.०० वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन करण्यात यावे.
  • ·        खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी/ कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक राहील, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
  • ·        शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे येथे या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच विस्तृत माहिती देण्यात यावी. सर्व सरकारी / खाजगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था / शासकीय व निम शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य राहील.
  • ·        राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग होणे आवश्यक राहील, यासाठी शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत.
  • ·        ग्राम स्तरावर, वॉर्ड स्तरावर ( नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत/ महानगरपालिका स्तरावर), सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभाग व नगर विकास विभाग यांनी सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत.
  • ·        जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमासाठी जिल्ह्याचे संनियंत्रण करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, सहकारी तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांना जिल्हाधिकारी स्तरावरून या उपक्रमाबाबत अवगत करून समूह राष्ट्रगीत गायनासाठी जाहीर आवाहन करावे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांनी या उपक्रमाचे संनियंत्रण करावे.
  • ·        या कार्यक्रमाच्या जाणीव जागृती आणि प्रचार व प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात मुद्रित साधने, समाज माध्यमे, खाजगी वाहिन्या, रेडिओ, एफ एम रेडिओ, कम्युनिटी रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करावा.
Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
Next Update Group (Facebook) Facebook Group Join link
समूह राष्ट्रगीत गायन शासन निर्णय शासन निर्णय डाऊनलोड

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम