⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सद्भावना दिवस आणि सामाजिक ऐक्य पंधरवडा | SADBHAVANA DAY and Samajik Ekya Pandhrvada

सद्भावना दिवस प्रतिज्ञा मराठी,सद्भावना दिवस मनाया जाता है।,सद्भावना दिवस कब मनाया जाता है,सद्भावना दिवस क्यों मनाया जाता है,सद्भावना दिवस कब से मनाया जाता है,सद्भावना दिवस पर स्लोगन,सद्भावना दिवस पर निबंध,सद्भावना दिवस in english

सद्भावना दिवस आणि सामाजिक ऐक्य पंधरवडा
SADBHAVANA DAY and Samajik Ekya Pandhrvada

युवा व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निदेशानुसार दिवंगत पंतप्रधान मा.राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवसम्हणून साजरा करण्यात येतो. तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या कार्यालयीन ज्ञापन क्र.एफ-२८-२२/२००६- वा. एस-४, दि. १८ जुलै, २००६ अन्वये देण्यात आलेल्या निदेशास अनुसरुन, उपरोक्त सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने दि. २० ऑगस्ट, २०२२ ते दि ५ सप्टेंबर, २०२२ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडाम्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दीष्ट्ये पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत. २. दि. २० ऑगस्ट, २०२२ हा सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

दि.२० ऑगस्ट, २०२२ हा दिवस सद्भावना दिवसव दि. २० ऑगस्ट, २०२२ ते दि. ५ सप्टेंबर, २०२२ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा

अ) मंत्रालयाच्या प्रांगणात दि. २० ऑगस्ट, २०२२ रोजी सद्भावना दिवससाजरा करण्यात यावा व सर्व उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे, तसेच या दिवशी सद्भावना शर्यत आयोजित करण्यात यावी. याबाबत प्रतिज्ञेची प्रत सोबत जोडली आहे.

ब) बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषतः युवकांच्या सहभागाने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांनी सद्भावना या विषयावर समुहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

क) महसूल विभागाच्या आयुक्तांनी सद्भावना शर्यत आयोजित करावी. त्यांच्या कार्यालयात सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. (प्रतिज्ञेचा नमुना खाली दिला आहे.)

ड) राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये व सर्व शासकीय कार्यालये यामध्ये कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात यावी व सर्व उपस्थितांना सद्भावना शपथ घेण्यास सांगण्यात यावे. तसेच युवकांच्या सहभागाने सद्भावना या विषयावर समुहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

इ) विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुध्दा अशाच तऱ्हेचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या विषयीचे आवश्यक ते आदेश शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण भाग, वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधितांना द्यावेत. नेहरू युवा केंद्र भारत स्काऊट आणि गाईडस व राष्ट्रीय सेवा योजना यांना देखील कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात यावे. याशिवाय दिनांक २० ऑगस्ट, २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडाम्हणून राज्यात साजरा करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

राष्ट्रीय सद्भावना दिवस म्हणजे काय, तो का साजरा केला जातो आणि पुरस्कार

अ) सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी मानवी साखळी (Human Chain) सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावेत.

आ) जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करून त्यामध्ये जिल्हातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे.

इ) सदर पंधरवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा आयोजित करावेत.

ई) संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर पंधरवडयामध्ये बृहन्मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

Fast Update Link
Next Update Group (Whats app) WA Join Group
Next Update Group(Telegram) Telegram Join link
Next Update Group (Facebook) Facebook Group Join link
सद्भावना दिवस शासन निर्णय डाऊनलोड

४. उपरोक्त सद्भावना दिवससामाजिक ऐक्य पंधरवडाया कार्यक्रमांच्या प्रसिध्दीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दूरदर्शन व आकाशवाणीच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांना पुरेशी प्रसिध्दी द्यावी.

५. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची खबरदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी व कार्यक्रम पार पाडल्यानंतर शासनास त्याचा अहवाल सादर करावा.

सद्भावना दिवस प्रतिज्ञा

मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गानी सोडवीन.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

SADBHAVANA DAY PLEDGE

"I take this solemn pledge that I will work for the emotional oneness and harmony of all the people of India regardless of caste, creed, region, religion or language. I further pledge that I shall resolve all differences among us through dialogue and constitutional means without resorting to violence.”

 

सद्भावना शर्यत आयोजित करण्यासाठी तपशिलवार सूचना

सद्भावना शर्यतीचे उद्दिष्ट

सद्भावना शर्यतीचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे :

अ) सर्व वयोगटांतील लोकांमध्ये शारिरीकदृष्टया निरोगी राहण्याची सवय निर्माण करणे. ब) सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या आणि सर्व धर्माच्या सर्व भाषिकांच्या लोकांमध्ये एक प्रकारचा बंधुभाव व सलोखा वाढीस लावणे.

या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरावरील सर्व वयोगटातील लोकांना, महिला व पुरुषांना या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देणे इष्ट ठरेल. सद्भावना शर्यतीत सहभाग ही महत्वाची गोष्ट आहे. या शर्यतीचे घोषवाक्य भारत - निरोगी आणि समर्थ भारत हे आहे.

शर्यत आयोजित करण्याची कार्यपध्दती

सर्वसाधारणपणे ही शर्यत ठराविक ठिकाणी सुरु झाली पाहिजे आणि ठराविक ठिकाणी संपली पाहिजे, हे अंतर साधारणत: ३ ते ५ किलोमीटर असावे. जमिनीचा चढउतार व शर्यतीच्या ठिकाणचे हवामान याप्रमाणे त्यात थोडाफार बदल करावा. तथापि, भाग घेणाऱ्या लोकांची संख्या मोठी असेल तर शर्यती वेगवेगळ्या ठिकाणापासून सुरु करता येतील आणि एकाच ठिकाणी संपविता येतील, भाग घेणाऱ्या लोकांची एकूण संख्या लक्षात घेऊन साधारण दोनशे ते अडीचशे लोकांना तुकडी तुकडीने हिरवा झेंडा दाखवावा. प्रत्येक प्रारंभाच्या ठिकाणी एक छोटा चबुतरा असावा आणि त्यावरून अतिविशेष व्यक्तीने, वेगवेगळ्या तुकड्यांना हिरवा झेंडा दाखवावा. प्रत्येक प्रारंभाच्यावेळी, वेगवेगळया तुकडयांमध्ये लोकांना विभागता यावे या दृष्टीने, त्यांना सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपण सामग्रीची व्यवस्था करावी.

पाण्याच्या आणि वैद्यकीय सुविधा

शर्यतीच्या मार्गावर आणि शर्यत संपते त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच प्रथमोपचाराची पुरेशी सुविधा असावी. वैद्यकीय मदतीसाठी योग्य व्यवस्था असावी.

आयोजकांसाठी प्रशिक्षण वर्ग

या शर्यतीमध्ये, वृध्द माणसे, स्त्रिया, लहान मुले असे सर्वच भाग घेतील अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने आयोजनात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सूचनावजा एक शैक्षणिक सत्र प्रत्यक्ष शर्यतीच्या दोन दिवस आधी घेणे इष्ट ठरेल. त्यामुळे व्यवस्थेबाबत काही शंका असतील तर त्यांचा उलगडा होईल.

शर्यतीत भाग घेणाऱ्यांनी शक्यतो धावताना घालतात ते बूट घालावेत, चपला शक्यतो टाळाव्यात. शर्यतीत भाग घेणाऱ्यांना शर्यतीच्या पोषाखातच हजर राहण्यास सांगावे. त्यामुळे कपडे बदलण्याच्या खोल्या किंवा चीजवस्तू ठेवण्यासाठी जागा अशी जास्तीची प्रशासकीय व्यवस्था करावी लागणार नाही. मुलांना खाण्याचे डबे न आणण्याविषयी सूचना द्याव्यात.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम