sarathi scholarship,sarathi scholarship for phd 2022,sarathi scholarship for maratha 2022,sarathi scholarship for phd,sarathi scholarship upsc,sarathi
सारथी शिष्यवृत्ती 2022-23 | Sarathi Scholarship 2022-23
Chhatrapati Rajaram Maharaj Sarathi Scholarship ; समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान
विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्याना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या
दृष्टीने त्यांना आर्थिक साह्य करावे, त्यानुसार
विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक
स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी
शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे (National Merit Cum Means Scholarship (NMMS)
मुख्य उद्देश आहेत. सदरची परीक्षा सन २००७ - २००८ पासून महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत इयत्ता ८ वी च्या वर्षाखेरीस घेतली जाते.
सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाकरिता छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा – कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवर NMMS परीक्षा शिष्यवृत्तीच्या धर्तीवर सारथीची शिष्यवृत्ती (Sarathi
Scholarship) योजना सन २०२१-२०२२ पासून
लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील NMMS
ही शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झालेले पण केंद्र सरकारची
शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा, कुणबी, कुणबी – मराठा व मराठा - कुणबी या केवळ चार लक्षित
गटातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत नियमित शिक्षण घेत
असलेल्या विद्यार्थ्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण
व मानव विकास संस्था, सारथी, पुणे
यांचेमार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सन २०२१-२०२२ या
वर्षापासून सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सुमारे १०,०००
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ सन २०२१-२०२२ मध्ये झाला आहे. सदरची शिष्यवृत्ती
योजना इयत्ता ९ वी पासून ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी असून सन
२०२१-२२ मध्ये इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यासाठी सुरु असलेली ही योजना यावर्षी
इयत्ता १० वी मध्ये शिकत आलेल्या व लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांना लागू
करण्यात येत आहे.
सारथी संस्थेने सदर छत्रपती राजाराम महाराज सारथी
शिष्यवृत्तीस (Sarathi Scholarship) अर्ज करू इच्छिणाऱ्यांना लक्षित गटातील पात्र
विद्यार्थ्यांकडून इयत्ता ९वी व १०वी साठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक
शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना, अर्जासोबत
जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर मसुदा तयार केला असून याविषयी आपल्या
कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी माध्यमिक (सर्व) यांना कळविण्यात यावे शिक्षणाधिकारी
माध्यमिक यांनी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित पात्र असलेल्या माध्यमिक शाळांना
कळवावे.
अर्ज सादर करताना खालील सूचना माध्यमिक शाळांच्या
मुख्याध्यापकासाठी
१) National Merit Cum Means Scholarship (NMMS) परीक्षा उत्तीर्ण झालेले व केंद्र शासनाच्या मेरीट लिस्टमध्ये येऊन
शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी शिष्यवृत्तीस घेऊ नयेत.
२) NMMS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण
केंद्रशासनाची शिष्यवृत्ती अप्राप्त असलेल्या मराठा (खुला संवर्ग – OPEN), कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी (OBC संवर्ग) या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील
विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीस स्वीकारावेत.
३) विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती खाली दिलेल्या लिंकवर
भरावी व सोबत दिलेल्या नमुन्यातच हार्डकॉपी आवश्यक सत्यप्रतीसह सादर करावी.
४) महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य,
अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही
शिष्यवृत्ती योजना आहे.
५) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र
आहेत. म्हणून खालील शाळेतील विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी
शिष्यवृत्तीसाठीही अपात्र आहेत. अशा विद्यार्थ्याचे या शिष्यवृत्तीस अर्ज स्वीकारु
नयेत.
A) विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
B) केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
C) जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
D) शासकीय वसतीगृहाच्या सवलतीच्या भोजन व्यवस्थेचा व
शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी. E) सैनिक
शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.
६) प्रस्तुत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे
(आई-वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/-
(दीड लाख रुपये) पेक्षा कमी असावे. विद्यार्थ्यांनी तहसिलदाराच्या स्वाक्षरीत
असलेला चालु आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे
जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.
उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत जोडावी.
७) मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांच्या मदतीने
विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती सारथीने दिलेल्या पुढील लिंकवर भरावी. इयत्ता ९ वी
व इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे लिंक देण्यात आली आहे.
- ·
इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी https://forms.gle/DX3tLdkyGzhQtk1v8 या लिंकवर माहिती इंग्रजी भाषेत भरावी.
- ·
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी https://forms.gle/f3Uf1tpETtLxcAyx9 या लिंकवर माहिती इंग्रजी भाषेत भरावी.
८) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी (Sarathi
Scholarship) अर्जासोबत खालील क्रमाने कागदपत्रे
सादर करावीत.
- · विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीत विहित नमुन्यात शिष्यवृत्ती मागणी अर्ज. इयत्ता ९ वी व १० वी साठी स्वतंत्र अर्ज नमुना तयार केला आहे. (सोबत जोडला आहे)
- · मुख्याध्यापकांचे स्वाक्षरीत विहित नमुन्यातील शिफारस पत्र. (प्रपत्र क) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन २०२२-२३ पत्र २५.०७.२०२२
- · विद्यार्थ्यांच्या पालकांचा तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील सन २०२२-२३ या सालातील उत्पन्नाच्या दाखल्याची सत्य प्रत.
- · विद्यार्थ्याच्या आधार कार्डची सत्यप्रत.
- ·
विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँक खाते
असलेल्या पासबुकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत (नाव, खाते क्रमांक,
IFSC कोडसह नमूद असणे आवश्यक आहे.)
- · इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ९वी च्या वार्षिक परीक्षा ५५% गुणासह उत्तीर्ण असलेल्या गुण पत्रिकेची सत्यप्रत. (केवळ दहावीच्या विद्यार्थ्यानी जोडावी.)
- ·
NMMS परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रक / निकालपत्रक
·
अन्य अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडू
नये.
काही एकत्रित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला
हा आजोबा,
काका, आजी, काकी व अन्य
नातेवाईकांच्या नावाचा असतो. सदर दाखल्यावर संबंधित विद्यार्थ्याच्या नावाचा व
नात्याचा उल्लेख असावा. केवळ अशा दाखल्यासोबत विद्यार्थ्यांनी एकत्रित कुटुंबातील
शिधापत्रिका (रेशन कार्ड) सत्यप्रत अर्जासोबत जोडावी व इतर विद्यार्थ्यानी
शिधापत्रिका सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता नाही.
१०) NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पुढील अटी
आहेत. त्यांचे पालन होणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थ्यास सारथी शिष्यवृत्ती योजना
लागू राहील.
- · विद्यार्थी / विद्यार्थिनीस इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी मध्ये वार्षिक परीक्षेत किमान ५५% गुण मिळणे आवश्यक आहेत.
- · विद्यार्थी / विद्यार्थिनीस इयत्ता १० वी मध्ये ६०% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
११) NMMS ही परीक्षा इयत्ता ८ वी च्या
विद्यार्थ्याची वर्षाखेरीस आयोजित केली जाते. यावर्षी सदर परीक्षा १९ जून २०२२
रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल ऑगस्टपर्यंत प्राप्त होऊ शकेल. तदनंतर
इयत्ता ९ वीमध्ये शिकत असलेल्या लक्षित गटातील मराठा, कुणबी,
कुणबी - मराठा व मराठा - कुणबी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज
मागविण्यात यावेत. (त्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी करावी. पालकांना उत्पन्नाचा
तहसीलदारांच्या स्वाक्षरीतील दाखला, विद्यार्थ्याचे स्वतः चे
नावे बँकेतील खाते/पोस्ट बँकेतील खाते, आधार कार्ड, तयारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या लक्षित
गटातील इच्छुक विद्यार्थ्यांनी करावी.)
१२) ज्या विद्यार्थ्यांना इयता ९ वी मध्ये शिकत असताना
सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. यावर्षी २०२२२०२३ मध्ये इयत्ता १० वी
मध्ये नियमित शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून या वर्षाची छत्रपती राजाराम महाराज
सारथी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज घ्यावेत. इयत्ता १०
वी मध्ये शिकणाऱ्या व सारथी शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९
वी मध्ये ५५% गुण प्राप्त करून वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रासोबत इयत्ता ९ वी च्या वार्षिक परीक्षेच्या
गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडावी.
१३) विद्यार्थ्याचे संपूर्ण भरलेले अर्ज संबधित शाळांनी
शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे सादर करावेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदर
अर्ज स्वीकारताना (तालुकानिहाय संख्या विचारात घेऊन) कॅम्पचे आयोजन करावे. सदर
कॅम्पची तारीख या कार्यालयास कळवावी. सदर दिवशी तज्ज्ञ व्यक्तीकडून सदर अर्जांची
छाननी व पडताळणी करावी व पात्र असलेले अर्ज सारथी संस्थेकडे मा. व्यवस्थापकीय
संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास
संस्था सारथी पुणे (महाराष्ट्र) ४११००४ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड
पोस्टाने सादर करावेत.
१४) सारथी संस्थेकडून मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा कुणबी या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल
घटकातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ९वी ते इयत्ता १२ वी पर्यंत
प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रती महिन्यांकरिता ८०० रुपयेप्रमाणे प्रतिवर्ष वार्षिक
एकूण रक्कम रु.९,६००/- शिष्यवृत्ती अदा केली जाईल.
१५) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र
विद्यार्थ्याच्या बँक खातेवर शिष्यवृत्तीची रक्कम अदा केली जाईल.
१६) अपूर्ण भरलेला अर्ज, चुकीची माहिती भरलेला
अर्ज, अपूर्ण कागदपत्रे असलेला अर्ज, विहित
मुदतीत सादर न केलेले अन्य व्यक्तीचे बँक खाते पासबुक सत्यप्रत असल्यास सदर
अर्जाचा सारथीच्या शिष्यवृत्तीस विचार केला जाणार नाही.
१७) विद्यार्थ्यांनी व शाळांनी विद्यार्थ्यांचे
शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज परस्पर सारथी संस्थेकडे पाठवू नयेत. शिक्षणाधिकारी
माध्यमिक यांचेमार्फत सदर अर्ज सादर करणे आवश्यक आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक
यांनी आपल्या जिल्ह्याचे सोबतचे ख प्रमाणपत्र सदर अर्जासोबत सादर करावे.
१८) अपात्र विद्यार्थ्यांचे सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज
मागवून घेणे, उत्पन्न मर्यादाचे उल्लंघन होणे अन्य संवर्गाचे अर्ज दाखल
करून शिष्यवृत्ती मिळविणे बाबत संबधित विद्यार्थी व मुख्याध्यापक यांचेवर
प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणेत येईल. यापूर्वी अशी शिष्यवृत्ती प्राप्त केली
असल्यास परत करावी.
१९) कोणतीही आपत्कालीन परिस्थिती व अन्य कारणाने उपरोक्त
शिष्यवृत्ती प्रलंबित किंवा रद्द झाल्यास प्रलंबित किंवा रद्द कालावधीचा कोणताही
लाभ अथवा आर्थिक साहाय्य सारथी पुणे मार्फत उमेदवारांना देय राहणार नाही.
२०) छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीबाबत निर्णय
घेण्याचे सर्वाधिकार सारथी संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक यांना राहील.
२१) वरील सर्व सूचना सर्व संबंधित शाळांच्या निदर्शनास
आणाव्यात. शाळांना काही शंका अडचणी असल्यास ०२०-२५५९२५०४ या दूरध्वनी क्रमांकावर
कार्यालयीन कामाच्या दिवशी विहित शासकीय कामकाजाच्या वेळेत संपर्क करावा.
TAG- sarathi scholarship,sarathi scholarship for phd 2022,sarathi scholarship for maratha 2022,sarathi
scholarship for phd,sarathi scholarship upsc,sarathi scholarship for
mpsc,sarathi scholarship for maratha 2020,sarathi
scholarship for maratha,sarathi scholarship for phd 2021,sarathi
scholarship for phd students
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS