⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण व अभिप्राय लिंक | Integrated and Bilingual Textbook Education Training

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण Integrated and Bilingual Textbook Education Training

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षण प्रशिक्षण

Integrated and Bilingual Textbook Education Training

दि .६ ऑगस्ट २०२२ रोजी निपुण प्रशिक्षण असल्याने तूर्त उपरोक्त नमूद प्रशिक्षण स्थगित करण्यात येत आहे. आपणांस संदर्भीय पत्रात प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या यू ट्यूब लिंक ह्या त्याच राहतील .या अनुषंगाने प्रशिक्षणाच्या सुधारित तारखा यथावकाश आपणांस कळविण्यात येतील.

रमाकांत काठमोरे

सहसंचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय व शासकीय अनुदानित मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेमार्फत दिनांक ५ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२२ रोजी खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे.

एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक इ 1 ली ते इ 7 वी पर्यंत उपलब्ध

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ व२०२३-२०२४ मध्ये नव्याने प्रकाशित होणारे व अंतिम वर्ष असणारी पाठ्यपुस्तकांची माहिती

सदर प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या शासकीय व शासकीय अनुदानित सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच ४८८ आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना (फक्त मराठी माध्यम) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकाऱ्यांना उपरोक्त नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे.

प्रशिक्षण वेळापत्रक 

वार,दिनांक वेळ इयत्ता /माध्यम प्रशिक्षण लिंक
बुधवार ,१७/८/२०२२ सकाळी १० ते १२.५० इ.पहिली मराठी माध्यम LIVE Training
गुरुवार ,१८/८/२०२२ सकाळी १० ते ३.०० इ.पहिली मराठी माध्यम LIVE Training
बुधवार ,१७/८/२०२२ सकाळी १० ते १२.५० इ.पहिली उर्दू माध्यम LIVE Training
गुरुवार ,१८/८/२०२२ सकाळी १० ते ३.०० इ.पहिली उर्दू माध्यम LIVE Training
बुधवार ,१७/८/२०२२ दुपारी १.३० ते ४.५० इ.दुसरी मराठी माध्यम (आदर्श शाळा) LIVE Training
गुरुवार ,१८/८/२०२२ दुपारी १.३० ते ६.०० इ.दुसरी मराठी माध्यम (आदर्श शाळा) LIVE Training

अभिप्राय फॉर्म 

आदर्श शाळा निवडण्यासाठी आवश्यक पूर्व निकष | ४८८ आदर्श शाळा यादी 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम