⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस एकाच वर्षी दोन्ही परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थाचे कोणतेही एक नांवनोंदणी रद्द करणे

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस एकाच वर्षी दोन्ही परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थाचे कोणतेही एक नांवनोंदणी रद्द करणे  Cancellation of any one registration of a student registered for both the Elementary and Intermediate Drawing Grade Examinations in the same year.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस एकाच वर्षी दोन्ही परीक्षेस नोंदणी केलेल्या विद्यार्थाचे कोणतेही एक नांवनोंदणी रद्द करणे

Cancellation of any one registration of a student registered for both the Elementary and Intermediate Drawing Grade Examinations in the same year.

कला संचालनालयामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेस विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण न होताही थेट इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता येते. परंतु एकाच वर्षी दोन्ही परीक्षांना बसण्याची परवानगी नसल्यामुळे एकाच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक असते.

इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा A, B आणि C श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेमध्ये अनुक्रमे ७, ५ व ३ या प्रमाणे सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. त्यामूळे शासकीय रेखाकला परिक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दरवर्षी सातत्याने वाढ होत आहे.

शासन शुद्धीपत्रकानुसार २०१९ च्या परीक्षेपासुन एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाही. असे नमुद केले असले तरी विद्यार्थ्यांना एकाच वर्षी दोन्ही परिक्षांना बसण्याची परवानगी नाही ही बाब सर्व संबधिताना विदित असतानाही शासकीय रेखाकला परीक्षा २०२२ करीता केंद्र प्रमुखांनी दोन्ही (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षांसाठी नाव नोंद केले असल्यास तात्काळ रद्द करुन संचालनालयास अवगत करण्याबाबत संचालनालयाच्या दिनांक २३.०८.२०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले असतानाही त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२२ वेळापत्रक 

एक नांवनोंदणी रद्द करणे परिपत्रक Download

विद्यार्थी / पालक यांच्या संमतीने दोन्ही परीक्षांपैकी एलिमेंटरी किंवा इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड यापैकी ज्या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे. त्या परीक्षेची नाव नोंदणी कायम ठेवून सदर विद्यार्थ्यांची केलेली दुसरी नाव नोंदणी केंद्रप्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक १७.०९.२०२२ पर्यंत तात्काळ रद्द करावी, याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची राहील.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम