महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई ही शासकीय संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांमधील कलागुणांना वाव देण्याकरीता सातत्त्याने विविध उपक्रमांचे आयोजन
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबई सहशालेय स्पर्धा | Maharashtra
State Jawahar Bal Bhavan Mumbai School Competition
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई
ही शासकीय संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांमधील कलागुणांना वाव देण्याकरीता
सातत्त्याने विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते वालकांमधील प्रतिभंस प्रोत्साहन
देऊन त्यास व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्येशाने यावर्षी बालभवनतर्फे
सहशालेय उपक्रम अंतर्गत दिनांक ११ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ३० सप्टेंबर २०२२ या
कालावधीत विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
- १. समूहगीत गायन
- २. एकपात्री अभिनय
- ३. लोकनृत्त्य
- ४. बॅन्ड
- ५. लेझिम
- ६. वाद्यसंगीत
स्पर्धेचे नियम
१) सदर स्पर्धा वॉर्ड स्तर आणि जिल्हा स्तरावर संपन्न होणार
आहे.
२) वॉर्ड स्तरावरील स्पर्धा दिनांक ११/०९/२०२२ ते
२०/०९/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात याव्यात. वॉर्ड स्तरावरुन प्रत्येक गटाती
सर्वोत्तम तीन विजेत्यांची निवड करुन ती नावे दिनांक २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठवावी.
३) जिल्हा स्तरावरील स्पर्धा दिनांक २५/०९/२०२२ ते
३०/०९/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात याव्यात. जिल्हास्तरावरील सर्व स्पर्धेत
गटनिहाय प्रथम तीन विजेत्यांची निवड करण्यात यावी.
४) वॉर्ड स्तरावरील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि जिल्हा
स्तरावरील विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात येतील.
५) वॉर्ड व जिल्हा स्तरावरील स्पर्धेचे ठिकाण संबंधीत
शिक्षण निरिक्षक कार्यालयामार्फत कळविण्यात येईल.
६) परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मुंबई सहशालेय स्पर्धा PDF डाउनलोड
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS