⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

माता पालक गटांची स्थापना करुन विभागानुसार ऑनलाईन नोंदणी | Nipun Bharat Abhiyan (FLN)

निपुण भारत अभियान (FLN) च्या प्रभावी माता पालक गटांची स्थापना करुन ऑनलाईन नोंदणी Online registration of Nipun Bharat Abhiyan (FLN) by setting up effective mother parent groups

निपुण भारत अभियान (FLN) च्या प्रभावी माता पालक गटांची स्थापना करुन ऑनलाईन नोंदणी
Online registration of Nipun Bharat Abhiyan (FLN) by setting up effective mother parent groups

शासन निर्णय व मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.अ. मुंबई यांचे संदर्भिय पत्रानुसार निपूण भारत अभियान (FLN) च्या प्रभावी अंमलबजावणीकरीता शाळा, गाव, वस्ती स्तरावर करावयाच्या कामकाजाबाबतच्या मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच याबाबत मा.राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प्र.मुंबई यांनी १ ते ३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील अधिका-यांना मार्गदर्शनपर व्ही.सी. द्वारे आवश्यक सूचना आपणास देण्यात आलेल्या आहेत.

सदरील व्ही.सी. मध्ये दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रतिनिधी यांच्या सहकार्याने या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शाळा स्तरावर १ ली ते ३री च्या शिक्षकांचे उद्धबोधन करून वेळोवेळी वरिष्ठांकडून प्राप्त होणा-या सूचनांप्रमाणे यथोचित कार्यवाही करावी.

शाळा स्तरावरील इयत्ता १ली ते ३री च्या मातांचे गट करून प्रत्येक गटाला प्रमुख माता निवडून शाळेच्या मुख्याध्यापकांनी माता गटाची माहिती या लिंकवर भरावी.

निपूण भारत अभियान (FLN) माता पालक गट नोंदणी लिंक

अमरावती विभाग

अमरावती विभाग Link

औरंगाबाद विभाग

औरंगाबाद विभाग Link

कोल्हापूर विभाग

कोल्हापूर विभाग Link


लातूर विभाग

लातूर विभाग Link

मुंबई विभाग

मुंबई विभाग Link

नागपूर विभाग

नागपूर विभाग Link

पुणे विभाग

पुणे विभाग Link

नाशिक विभाग

नाशिक विभाग Link

निपुण भारत अभियान- माता पालक गटांची स्थापना कशी करावी

संपूर्ण माहिती

  • १) प्रत्येक शाळेने गाव / मोहल्ला / वस्ती निहाय इयत्ता १ ते ३री च्या विदयार्थ्यांच्या माता-पालक गटाची बांधणी करावी.
  • २) प्रत्येक गटामध्ये ५ ते ६ माता असाव्यात.
  • ३) प्रत्येक गटासाठी लिडर माता निवडावी.
  • ४) सर्व मातांचा WhatsApp Group तयार करावा.
  • ५) शिक्षकांनी गावातील सर्व माता पालक गटांची माहिती आपापल्या विभागानुसार पुरवण्यात आलेल्या लिंकवर किंवा  QR Code स्कॅन करून भरावी
  • ६) या WhatsApp Group वर दर आठवडयाला शिक्षकांनी आयडीया / व्हीडीओ पाठवावे.
  • ७) लिडर माता गटातील इतर मातांना त्यांच्या सवडीनुसार आठवडयातून एकदा भेटतील व दिलेल्या आयडीया / व्हीडीओ कृती समजुन देतील. तसेच या सभेत काही मुलांसोबत कृतींचे प्रात्यक्षिक करून घेतले जाईल.
  • ८) माता-पालक या सर्व कृती त्या आठवड्यात मुलांसोबत घरी करून घेतील.
  • ९) माता-पालक गटांना येणाऱ्या अडचणींचे WhatsApp च्या माध्यमातुन शिक्षकांमार्फत निरसन करण्यात यावे.
  • १०) शाळेच्या सवडीनुसार दरमहा सर्व मातांची आढावा बैठक शाळेत घेण्यात यावी.
  • ११) या उपक्रमांचे फोटो व अॅक्टीव्हीटी शिक्षकांनी स्वत:कडे संग्रहीत (सेव्ह) करून ठेवाव्या. तसेच हे फोटो व व्हिडीओ राज्यस्तरीय लिंकवर अपलोड करावे. (सदर लिंक WhatsApp च्या माध्यमातुन आपणास लवकरच पाठविण्यात येईल.)

काही शंकां आणि उत्तरे

प्रश्न क्रमांक १) गटांमध्ये वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांचा समावेश असावा का?

उत्तर:- सदर गट हे पालकांचे आहेत. मात्र तयार करण्याचे काम शिक्षक व मुख्याध्यापक करणार आहेत. त्यामुळे गटाचा जो व्हाट्सअप ग्रुप असेल त्यामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक असतील. दर आठवड्याला हा माता पालक गट चर्चा करण्यासाठी एकत्र येईल तेव्हा शिक्षक किंवा मुख्याध्यापक त्यामध्ये सहभागी झालेच पाहिजे असे आवश्यक नाही. मात्र महिन्यातून एकदा या सर्व माता पालकांची सभा मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या समावेत आयोजित करण्यात यावी.

प्रश्न क्रमांक २) एखाद्या वर्गाची पटसंख्या 50 आहे तर पन्नाशी मातांचा गट करावा का?

उत्तर:- होय. इयत्ता पहिली ते तिसरी यामधील एखाद्या वर्गाची पटसंख्या 50 असेल तर या सर्व 50 माता पालकांचा समावेश गटामध्ये केला जाईल.... याचा अर्थ 50 मातांचा एक गट तयार करणे असा नसून प्रत्येक गटात पाच ते सहा माता याप्रमाणे वर्गातील पटसंख्येच्या प्रमाणात मातांचे गट तयार करावे लागतील.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अध्ययन स्थिती पडताळणी सूचना

प्रश्न ३) इयत्ता पहिली ते तिसरी ची पटसंख्या कमी असेल (उदाहरणार्थ ०६) तर प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र गट असावा का ?

उत्तर:-अशी परिस्थिती असल्यास प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र गट तयार करण्याची गरज नाही. इयत्ता पहिली ते तिसरीची एकूण पटसंख्या सहा च्या जवळपास असल्यास त्या सर्व मातांचा एक गट करता येईल.

प्रश्न ४) लीडर मातेच्या पाल्याची माहिती कोठे भरावी?

उत्तर:- लीडर माता ही गटातील माता पालकांपैकीच एक असल्यामुळे जेव्हा जेव्हा माता पालकांची माहिती भरायला सुरुवात करतो तेव्हा आधी लीडर मातेची माहिती व तिच्या पाल्याची माहिती भरावी.

विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत. त्यांच्या सर्वागिण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारत सरकारच्या 'निपुण भारत' प्रकल्पांतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. 'स्टार्स प्रकल्प अंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियान देखील राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात अथवा गावात मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी एप्रिल २०२२ आणि जून २०२२ मध्ये मेळावे आयोजित करण्यात आले होते. या दोन मेळाव्यां दरम्यान वाडी वस्तीवर माता-पालकांचे गट तयार करून त्यांना साहित्य पुरविले आणि मार्गदर्शन केले गेले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्राप्त आकडेवारी नुसार राज्यत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ६७,००० हुन अधिक प्राथमिक शाळांमध्ये शाळापूर्व तयारीचे मेळावे आयोजित करण्यात आले. ज्यात १४ लक्ष पेक्षा जास्त मुलं सहभागी झाली आणि त्यांच्या मातांचे जवळ जवळ २.५ लक्ष गट स्थापन झाले.

निपुण भारत अभियाना अंतर्गत "निपुण मित्र” यांची निवड

नुकतेच "प्रथम" संस्थेद्वारे करण्यात आलेल्या नमुना मूल्यांकनाद्वारे आणि पालकांकडून प्राप्त प्रतिक्रियांद्वारे ह्या मेळाव्यांचा आणि माता गटांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शाळापूर्व तयारी मध्ये झालेला दिसून आला आहे.

पहिल्या मेळाव्या दरम्यान इयत्ता पहिलीत प्रवेशपात्र मुलांपैकी ५१% मुलांना बौद्धिक कौशल्याच्या विविध कृती करता येत होत्या (उदा. वस्तू किंवा चित्रातील लहान-मोठा फरक ओळखणे, वस्तूंच्या प्रकाराप्रमाणे वर्गीकरण करणे लावणे इत्यादी). पहिल्या मेळाव्यानंतर ८ ते १० आठवड्यांच्या दरम्यान माता गटांनी मुलांसोबत केलेल्या प्रयत्नामुळे दुसऱ्या मेळाव्यात याच बौद्धिक विकासाच्या कृती करणाऱ्या मुलांचे प्रमाण ४२% नी वाढून ९३% झाले आहेभाषा विकासातील कृती करता येणाऱ्या मुलांचे प्रमाण पहिल्या मेळाव्या दरम्यान ३५% होते जे दुसऱ्या मेळाव्यादरम्यान ४३% नी वाढून ७८% झाल्याचे आढळले आहे. गणितपूर्व तयारी मध्ये देखील पहिल्या मेळाव्या दरम्यान ४३% मुलांना कमी-जास्त वस्तू मोजणे, आकार ओळख येत असल्याचे आढळले होते, जे दुसऱ्या मेळाव्या दरम्यान ८४% झाल्याचे दिसले आहे.शारीरिक विकाससंदर्भातील क्रियाकृतींमध्ये ४७% नी वाढ आणि सामाजिक-भावनिक विकासाच्या क्रियाकृतींमध्ये ३९% नी वाढ झाल्याचे दिसले आहे.

यावरून शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असून देखील, माता-पालकांनी गुलांची चांगल्या प्रकारे शाळापूर्व तयारी करून घेतल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर शिक्षक आणि पालक विशेषतः माता यांच्या मध्ये चांगला समन्वय स्थापित झालेला आहे. या सकारात्मक ऊर्जेमध्ये सातत्य टिकवून ठेवणे व त्याद्वारे शिक्षक आणि माता पालक मिळून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (Foundational Literacy and Numeracy-FLN) अभियानाची उद्दिष्ट्ये / यथाशोध प्राप्त करण्यासाठी यापुढेही "पहिले पाऊल" दरम्यान स्थापित करण्यात आलेल्या माता गटांना शिक्षकांनी यापुढेही मार्गदर्शन करावे आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात (FLN) सहभागी करून घ्यावे. "पहिले पाऊल" यशस्वी करणाऱ्या राज्य, जिल्हा व तालुका स्तरीय चमूने यापुढे देखील आयडिया व्हिडिओ / कार्डद्वारे, मेळाव्यांद्वारे आणि विविध उपाययोजना करून माता गटांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यावे. पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियान याचे नियोजन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात "प्रथम शिक्षण संस्थेची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.

यापुढील राज्यस्तरावर आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे, राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा (महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद), मुंबई, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, विभाग स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका स्तरावर आयुक्त, महानगरपालिका, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख, महानगरपालिका आणि तालुका स्तरीय नियोजनात व अंमलबजावणीमध्ये प्रथमचे सहकार्य प्राप्त होईल. यापुढेही राज्यस्तरीय यंत्रणापसून स्थानिक पातळीपर्यंत "प्रथम" चे सहकार्य प्राप्त होईल.

राज्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ क्रमांक ७ अन्वये प्रत्येक विद्यार्थ्यास इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत लेखन, वाचन व गणितीय कौशल्य प्राप्त करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेतच. हे ध्येय सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी साध्य करायचे असून सन २०२६-२७ पर्यंत राज्यातील ३ ते ९ वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्धारित शैक्षणिक लक्ष पुर्ण करतील व इयत्ता ५ वी पर्यंत कोणतेही मूल शैक्षणिक प्रवाहात मागे राहणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी.

या अभियानाच्या उद्देश प्राप्तीसाठी शाळेत व शाळे बाहेर सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांना यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार शाळेत यासाठी विविध उपचारात्मक कृती कार्यक्रमांतून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (Foundational Literacy and Numeracy- FLN) अभियानाची उद्दिष्ट्ये प्राप्त करावीत. या प्रक्रियेत मुलांच्या पालकांना विशेषतः मातांना सामावून घेण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबण्यात यावी.

१ प्रत्येक वाडी वस्तीवर एक माता गट आणि गटासाठी लिडर माता ही रचना शिक्षक सुनिश्चित करतील. 'पहिले पाऊल दरम्यान जे माता गट स्थापन केले आहेत, त्यांचाच विस्तार करावा. गावातील / वस्तीतील माता गटासोबत सुरुवातीला एक बैठक घेऊन पुढचे वर्षभर राज्य स्तरावरून शिक्षकांना ऑनलाईन पुरविण्यात येणाऱ्या साहित्याचा उपयोग करुन छोट्या गटात कसे काम करायचे ते शिक्षक समजावतील. यानंतर शिक्षक लीडर माते सोबत संपर्कात राहतील आणि आठवडयाला एक विडिओ अथवा कार्ड कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शन करतील.

दर आठवड्याला राज्य स्तरावरून प्राप्त एक आयडिया विडिओ अथवा कार्ड माता गटांना पुरविणे आणि त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणे. यासाठी what app, sms इत्यादी उपलब्ध माध्यमांचा उपयोग करावा. (व्हाट्सअॅप, SMSइत्यादी.) या प्रक्रियेत गावातील तरुण स्वयंसेवकांची देखील मदत घेता येऊ शकते. हे सर्व मातांचे गट आपापल्या स्तरावर बैठका घेऊन परस्पर त्यांच्या सोयीनुसार सहकार्य ह्या तत्वावर काम करतील. माता गट आठवडयाला एकदा भेटून ह्या विडिओ / कार्ड मध्ये सांगितल्याप्रमाणे गटात काम करतील आणि घरी आपल्या मुलांना मदत करतील. शिक्षक या बद्दल मातांकडून फीडबॅक घेत राहतील आणि शाळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (Foundational Literacy and Numeracy FLN) याच्या उद्देश्य प्राप्तीसाठी कोणकोणत्या कृती करीत आहेत, ते ह्या माता गटांना सांगतील (प्रात्यक्षिक दाखवतील. यासाठी आवश्यक साहित्य महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई उपलब्ध देईल.

महिन्यातून एकदा माता गटांना शाळेत बोलवून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन करणे जेणे करून त्या समूहात एकत्र राहून मुलांना पायाभूत साक्षरता व. संख्याज्ञान प्राप्त करण्यात आणि निपुण बनविण्यात मदत करू शकतील. ह्या बैठकीचे स्वरूप हे कार्यशाळेचे राहील, असे नियोजन सर्व स्तरावर करायचे आहे. या कार्यशाळांचे उद्दिष्ट माता गटांचा उत्साह वाढविणे, त्यांना मार्गदर्शन करणे, वेगवेगळ्या आयडिया देणे

माता गटांचा उत्साह वाढविण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रमांचे,मेळाव्यांचे अथवा स्पर्धांचे आयोजन करावे. तीन महिन्यातून एकदा मातांच्या उत्साहवर्धनासाठी अशा प्रकारचे उपक्रम / उत्सव शाळा व गाव स्तरावर आयोजित करावेत. या कार्यात गावातील तरुण स्वयंसेवक, ग्राम पंचायत, अंगणवाडी कार्यकर्ती, विविध सामाजिक संस्था इत्यादींचे सहकार्य शाळेने घ्यावे. माता गटांना विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करण्यात प्रतिष्ठित सामाजिक संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य घेता येऊ शकते. या कार्यक्रमांच्या मुख्य उद्दीष्ट माता गटांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या माहितीत (मुलांच्या संगोपन, स्वास्थ्य, विकास आणि शिक्षण यावर भर घालणे हे आहे, हे लक्षात घेऊन या कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी

माता गटांना मदत करण्यासाठी राज्य स्तरावरून शाळेबाहेरची शाळा ह्या रेडिओ आधारित कार्यक्रमाद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल. कोविड महामारीमुळे मार्च २०२० मध्ये शाळा बंद कराव्या लागल्या. त्या दरम्यान मुलांचे अध्ययन टिकून राहावे म्हणून शासकीय, शाळा आणि सामाजिक संस्थांच्या स्तरावर अनेक उपक्रम राज्यभर राबविण्यात आले. यापैकी महाराष्ट्रतील नागपूर विभागीय आयुक्त आणि प्रथमच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या शाळेबाहेरची शाळा' ह्या रेडिओ आधारित कार्यक्रमाला चांगले यश मिळाले. यात मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी आणि इतर घटकांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला जातो आणि सर्वाना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते. विशेषतः पालकांना मार्गदर्शन करून छोट्या छोट्या उदाहरणांतून घरी मुलांच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण कसे निर्गमित करावयाचे याबद्दल सांगितले जाते.याला पालकांकडून उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आधाराने देखील माता- गटांना सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल. जेणे करून शिक्षकांना यामध्ये सहकार्य मिळू शकेल.

ह्या अभियानाबद्दलची माहिती, मूल्यांकन, अधिक्षण / संनियंत्रण व इतर अहवाल, फोटो व विडिओ यांचे संकलन करावे. या संदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या स्तरावर ऑनलाईन पोर्टल (संकेतस्थळ) विकसित करून माहिती संकलीत केली जाईल. याबद्दल अधिक माहिती, सूचना राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद. मुंबई यांच्या कार्यालयातून वेळोवेळी दिल्या जातील आणि आवश्यक ते प्रशिक्षण मार्गदर्शन देखील केले जाईल.

या अभियानांचे एकदंरीत मुल्यमापन राज्यस्तरावरुन केले जाईल, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरणांच्या स्तरावरून उपलब्ध संसाधनाच्या मदतीने संशोधनात्मक करण्यात येईल, माता समूहांचे काम आणि या सर्वाचा मुलांच्या सर्वागिण विकासावरील सकारात्मक परिणाम याबद्दल विशेष अध्ययन करता येईल. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम