जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल २ सप्टेंबर २
दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर | Result of 10th and 12th supplementary exam announced
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,
नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय
मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) पुरवणी परीक्षा दिनांक २७
जुलै, २०२२ ते दिनांक १२, ऑगस्ट २०२२ व
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक २१ जुलै, २०२२ ते २४ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात
आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व
त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल २ सप्टेंबर २०२२ रोजी १ वाजता जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी)
पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार,
दि. ०२/०९/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे. या
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत
(प्रिंट आउट) घेता येईल.
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) पुरवणी
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी
विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व
स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या
अधिकृत संकेतस्थळावरुन इ.१० वी साठी(http://verification.mh-ssc.ac.in) व इ. १२ वी साठी ( http://verification.mh-hsc.ac.in) स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध
करून देण्यात आलेली आहे.
गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०९/२०२२ ते
सोमवार, दिनांक १२/०९/२०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार,
दिनांक ०३/०९/२०२२ ते गुरूवार २२/०९/२०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन
पध्दतीने करता येईल.
सन २०२३ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्ता १० वी)
व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट
व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी
प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत
प्रविष्ट होणारे व III ( औद्योगिक प्रशिक्षण संस्था ) द्वारे
Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र
ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर
करण्यात येतील.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS